काऊंटडाऊन झाला सुरु! Samsung Galaxy Unpacked ईव्हेंटसाठी तयार आहात ना? Galaxy Z Fold 7 सह हे गॅझेट्स ठरणार मुख्य आकर्षण
साऊथ कोरियन टेक कंपनी Samsung पुन्हा एकदा त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास आणि मोठं सरप्राईज घेऊन येणार आहे. कंपनीचा सर्वात मोठा ईव्हेंट Samsung Galaxy Unpacked Event 2025 च्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांच्या फोल्ड आणि फ्लिपफोनसह धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. हा ईव्हेंट 10 जुलै रोजी ब्रुकलिन, न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
Jio-Airtel-Vi यूजर्सच्या खिशाला पुन्हा बसणार फटका! रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता
सॅमसंगचा आगामी ईव्हेंट अत्यंत खास असणार आहे. कारण या ईव्हेंटमध्ये कंपनी Galaxy Z Fold 7, Galaxy Z Flip 7 आणि एक अफॉर्डेबल वर्जन Galaxy Z Flip 7 FE लाँच करण्याची शक्यता आहे. याशिवाय अशी देखील चर्चा आहे की, कंपनीचा बहुप्रतीक्षित Triple-Fold Phone देखील याच ईव्हेंटमध्ये टिझ केला जाऊ शकतो. हा सॅमसंगचा पहिला ट्रिपल फोल्ड असणार आहे. लाँचिंगपूर्वी कंपनीच्या आगामी स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Samsung Galaxy Z Fold 7 हा आतापर्यंतचा सर्वात पातळ फोल्डेबल फोन असणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा आउटर डिस्प्ले आणि 8.2-इंचाचा इनर डिस्प्ले असणार आहे. दोन्ही स्क्रीन AMOLED पॅनलसह उत्तम ब्राइटनेस आणि रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे. आगामी डिव्हाईस Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरने सुसज्ज असण्याची शक्यता आहे. यामध्ये 12GB रॅम दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असणार आहे, ज्यामध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 10MP चा टेलीफोटो कॅमेरा दिला जाणार आहे. स्मार्टफोनमध्ये 4400mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे, जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट असू शकते. या फोनची किंमत भारतात 1,69,000 रुपये असू शकते.
Galaxy Z Flip 7 एक क्लॅमशेल फोल्डिंग फोन असाणार आहे, ज्यामध्ये 4.1-इंचाचा आउटर डिस्प्ले आणि 6.9-इंचाचा इनर डिस्प्ले असणार आहे. दोन्ही डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 2600 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करू शकतात. Flip 7 मध्ये Samsung चा इन-हाउस Exynos 2500 प्रोसेसर असण्याचा दावा केला जात आहे. या फोनमध्ये 4300mAh बॅटरी दिली जाणार आहे. Galaxy Z Flip 7 भारतात 1,10,000 रुपयांच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. हा फोन खास अशा युजर्ससाठी तयार करण्यात आला आहे, ज्यांना फोल्डेबल टेक्नोलॉजीसह स्टाइल आणि कॉम्पॅक्ट डिझाइनची आवश्यकता आहे.
Samsung यावेळी Flip सीरीजमध्ये एक बजेट व्हेरिअंट Galaxy Z Flip 7 FE देखील लाँच करण्याची शक्यता आहे. हा फोन अशा लोकांसाठी आहे, ज्यांना बजेट फोन खरेदी करायचा आहे. Galaxy Z Flip 7 FE मध्ये 3.4-इंचाचा आउटर डिस्प्ले आणि 6.7-इंच इनर डिस्प्ले असणार आहे. फोनमध्ये 3700mAh बॅटरी असू शकते. भारतात या फोनची किंमत 92,000 रुपये असू शकते.
सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटची लाईव्ह स्ट्रीम 10 जुलै रोजी संध्याकाळी 7:30 वाजता (IST) YouTube आणि सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल. चाहत्यांसाठी आणि तंत्रज्ञान प्रेमींसाठी हा एक मोठा दिवस असेल.