Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सॅमसंग गॅलेक्सी Watch Ultra2 व Watch9 ची भारतात धामाकेबाज एंट्री; पाहा किंमत आणि फीचर्स! पाहा आकर्षक प्री-ऑर्डर ऑफर्स

सॅमसंगने भारतात गॅलेक्सी वॉच अल्ट्रा२ आणि वॉच९ ची प्री-ऑर्डर सुरू केली असून, प्रगत AI आरोग्य ट्रॅकिंग व स्नॅपड्रॅगन एलिट प्लॅटफॉर्मसह ही घड्याळे बाजारात आली आहेत. ग्राहकांसाठी २२ जुलैपासून प्री-ऑर्डरवर खास सवलती, सुलभ EMI पर्याय आणि मोफत सॅमसंग केअर+ प्लॅन उपलब्ध करण्यात आला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 26, 2026 | 05:38 PM
सॅमसंग गॅलेक्सी Watch Ultra2 व Watch9 ची भारतात धामाकेबाज एंट्री; पाहा किंमत आणि फीचर्स! पाहा आकर्षक प्री-ऑर्डर ऑफर्स
Follow Us
Follow Us:
  • सॅमसंगने AI ट्रॅकिंग फीचर्ससह गॅलेक्सी वॉच अल्ट्रा२ आणि वॉच९ ची प्री-ऑर्डर भारतात सुरू केली.
  • या स्मार्टवॉचेसवर आकर्षक डिस्काउंट, सॅमसंग ॲक्सेसरीज ऑफर्स आणि सुलभ ईएमआयचे (EMI) पर्याय उपलब्ध आहेत.
  • वॉच खरेदीवर ग्राहकांना पहिल्या तीन महिन्यांसाठी सॅमसंग केअर+ चे मोफत संरक्षण मिळेल.

सॅमसंगने आपल्या वॉच लाइनअपमधील सर्वात नवीन श्रेणी गॅलेक्सी वॉच अल्ट्रा२ आणि गॅलेक्सी वॉच९ भारतामध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाल्याची घोषणा केली आहे. हे दोन्ही मॉडेल्स दररोज २४ तास वापरण्यायोग्य असण्यासोबत सतत आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. ते आरोग्याशी संबंधित माहितीचे रूपांतर झोप, शारीरिक हालचाली, हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य आणि रिकव्हरी यांसारख्या उपयुक्त मार्गदर्शनामध्ये करतात.

”आरोग्य सेवा प्रतिबंधात्मक, निरंतर आणि वैयक्तिक गरजांनुसार तयार केलेली असणारे भविष्य घडवण्यासाठी एआयच्या क्षमतेचा वापर करणे हे आमचे ध्येय आहे. गॅलेक्सी वॉच अल्ट्रा२ आणि गॅलेक्सी वॉच९ या संकल्पनेला प्रत्यक्षात आणतात. यामध्ये प्रगत आरोग्य ट्रॅकिंग वैशिष्ट्ये दिली आहेत, जी वापरकर्त्यांसाठी एक विश्वासू साथीदार म्हणून काम करतात आणि त्यांच्या आरोग्याच्या प्रवासात सक्रिय माहिती व वेळेवर सूचना पुरवतात,” असे सॅमसंग इंडियाचे एमएक्स बिझनेसचे व्हाईस प्रेसिडेंट आदित्य बब्बर म्हणाले.

बाहेरील उपक्रम आणि धावण्यासारख्या खेळांसाठी डिझाइन केलेले गॅलेक्सी वॉच अल्ट्रा२ टायटॅनियम सिल्व्हर व टायटॅनियम ग्रे रंगांत ४७ मिमी आकारात उपलब्ध असेल. टायटॅनियम बनावट आणि मऊ पट्ट्या असलेल्या या घड्याळात अंतर्गत फेररचनेमुळे ३५ टक्के मोठी (८०० एमएएच) बॅटरी असूनही ते १२ टक्के अधिक बारीक आहे. यात क्वालकॉमचा नवीन स्नॅपड्रॅगन एलिट प्लॅटफॉर्म आणि प्रखर उन्हात स्पष्ट दिसणारा ५००० नीट्स ब्राइटनेस डिस्प्ले दिला आहे. यात उंची आणि चढाई मोजणारा ‘ट्रेल रन’ मोड आणि घामाच्या आधारे पाण्याची गरज सांगणारे ‘न्यूट्रिशन अलर्ट’ हे पर्याय आहेत. तसेच, आयपी६९के, १० एटीएम आणि इएन१३३१९ प्रमाणनासह हे घड्याळ ‘मारेस’ ॲपद्वारे पाण्याचे तापमान, खोली, वेळ आणि सुरक्षित डायव्हिंग मर्यादा आपोआप नोंदवून उत्तम डायव्हिंग सुविधा प्रदान करते.

बंपर ऑफर! Samsung Galaxy M17 5G वर मोठी सूट, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दमदार 5G फोन

दैनंदिन वापर, आराम, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि सतत आरोग्य ट्रॅकिंगवर भर देऊन डिझाइन केलेले गॅलेक्सी वॉच९ ॲल्युमिनियम केस आणि सॅमसंगच्या कुशन-आकाराच्या डिझाइनसह येते. सुधारित फिटिंग आणि बदलता येणाऱ्या मऊ पट्ट्यांमुळे (सॉफ्ट-टच बँड्स) हे घड्याळ दीर्घकाळ घालणे सोपे होते. हे वॉच क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन एलिट प्लॅटफॉर्मवर चालते आणि यात ३००० नीट्सपर्यंतचा ब्राइटनेस डिस्प्ले दिला आहे, ज्यामुळे प्रखर प्रकाशातही स्क्रीन स्पष्ट दिसते. यात दिवसभराच्या वापरासाठी ४० मिमी मॉडेलमध्ये ३९० एमएएच आणि ४४ मिमी मॉडेलमध्ये ४४५ एमएएच ची बॅटरी दिली आहे. हे वॉच दोन आकारांमध्ये उपलब्ध असेल—४० मिमी व्हर्जन ग्रॅफाइट आणि क्रीम रंगात, तर ४४ मिमी व्हर्जन ग्रॅफाइट आणि सिल्व्हर रंगात सादर करण्यात आले आहे.

सॅमसंगने दोन्ही घड्याळांमध्ये एआय-आधारित नवीन आरोग्य वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत, जिथे बायोसेन्सर्स जीवनशैली व बायोमेट्रिक माहिती गोळा करतात आणि एआय मॉडेल्स त्यांचे रुपांतर व्यावहारिक आरोग्य सल्ल्यांमध्ये करतात. जागतिक प्रसिद्ध संस्थांच्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असणाऱ्या या वैशिष्ट्यांमध्ये—झोपेतील आरोग्यावर लक्ष ठेवणारे व्हाइटल्स, जीवनशैली सल्ल्यांसह हार्ट हेल्थ स्कोअर, व्यायामाची तीव्रता व्यवस्थापित करणारे डेली कार्डिओ लोड, शारीरिक तंदुरुस्ती मोजणारा फिटनेस इंडेक्स आणि असुरक्षित आवाजाबद्दल अलर्ट करणारे हिअरिंग यांचा समावेश आहे. यासोबतच सॅमसंगने नवीन बँड्स सादर केले असून, गॅलेक्सी वॉच अल्ट्रा२ साठी मरीन बँड, पीकफॉर्म बँड आणि ट्रेल बँड हे आऊटडोअर पर्याय दिले आहेत; तर गॅलेक्सी वॉच९ साठी स्पोर्ट्स बँड, मिस्टी बँड आणि फॅब्रिक बँड हे दैनंदिन वापराचे पर्याय उपलब्ध केले आहेत.

गॅलेक्सी वॉच अल्ट्रा२ आणि गॅलेक्सी वॉच९ हे २२ जुलैपासून पूर्व-नोंदणीसाठी (प्री-ऑर्डर) उपलब्ध असतील, तर त्यांची सर्वसाधारण विक्री ७ ऑगस्टपासून सुरू होईल. सॅमसंग आपल्या ‘सॅमसंग केअर+’ सपोर्टचा विस्तार करत असून, Samsung.com द्वारे नवीन घड्याळ खरेदी करून मासिक प्लॅन निवडणाऱ्या ग्राहकांना पहिल्या तीन महिन्यांचे संरक्षण विनामूल्य दिले जाईल. तसेच, वन युआय ९ वापरणारे ग्राहक थेट घड्याळाच्या वॉरंटी व केअर मेनूद्वारे वॉरंटी माहिती, स्व-निदान, दुरुस्ती विनंत्या आणि रिमोट सपोर्टचा लाभ घेऊ शकतील.

Samsung Foldables: भारतीय बाजारात सॅमसंगचा धमाका; नव्या पिढीसाठी Galaxy Z Fold8 Ultra, Fold8 आणि Flip8 ची एंट्री

किंमत आणि उपलब्धता: सॅमसंगच्या गॅलेक्सी वॉच अल्ट्रा२ चे ४७ मिमी (एलटीई) मॉडेल टायटॅनियम सिल्व्हर आणि टायटॅनियम ग्रे रंगांमध्ये ६४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. तसेच गॅलेक्सी वॉच९ च्या ४० मिमी आकारातील एलटीई व्हेरियंटची किंमत ४१,९९९ रुपये आणि BT व्हेरियंटची किंमत ३७,९९९ रुपये असून ते ग्रॅफाइट आणि क्रीम रंगांत सादर करण्यात आले आहे. याशिवाय गॅलेक्सी वॉच९ च्या ४४ मिमी आकारातील एलटीई व्हेरियंटची किंमत ४४,९९९ रुपये आणि BT व्हेरियंटची किंमत ४०,९९९ रुपये असून हे मॉडेल ग्रॅफाइट आणि सिल्व्हर रंगांमध्ये उपलब्ध आहे.

प्री-ऑर्डर ऑफर्स: सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्रा२ च्या प्री-ऑर्डरवर ग्राहकांसाठी खास सवलती आणि सोपे ईएमआय पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्राहकांना केवळ सॅमसंग अॅक्सेसरीजवर रिडिम करता येणारा १,५०० रुपयांचा प्री-ऑर्डर लाभ मिळेल. याशिवाय, खरेदीदार ९,५०० रुपयांची मल्टीबाय ऑफर, ३,५०० रुपयांची अपग्रेड ऑफर किंवा ३,५०० रुपयांची बीसीबी ऑफर यांपैकी एकाचा लाभ घेऊ शकतात. सोबतच, हे घड्याळ शून्य डाउन-पेमेंटसह २४ महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट एनबीएफसी ईएमआय किंवा बँक ईएमआय पर्यायावरदेखील खरेदी करता येईल.

Web Title: Samsung galaxy watch ultra 2 watch 9 pre order offers india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 05:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.