सॅमसंग इंडियाकडून जगातील पहिले AI-पॉवर्ड टॅब्लेट्स लाँच! क्रिएटिव्ह टूल्स आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज
सॅमसंग या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज गॅलॅक्सी टॅब एस१०+ आणि टॅब एस१० अल्ट्रा लाँच केले. ही फ्लॅगशिप लाइनअप अत्याधुनिक AI वैशिष्ट्यांसह टॅब्लेट अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जाते. हे जगातील पहिले AI-पॉवर्ड टॅब्लेट्स आहेत. जगातील पहिले AI -पॉवर्ड टॅब्लेट्स गॅलॅक्सी टॅब एस१०+ आणि एस१० अल्ट्रामध्ये उल्लेखनीय नाविन्यतांसह फ्लॅगशिप कार्यक्षमता, सुधारित क्रिएटिव्ह टूल्स आणि प्रगत गॅलॅक्सी AI वैशिष्ट्ये आहेत, जी उत्पादकता आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत.
हेदेखील वाचा- युरोपियन युनियनने Meta ला ठोठावला 102 करोड डॉलरचा दंड! नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या
तुम्ही उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न करणारे व्यावसायिक असा किंवा काम सुलभ करणाऱ्या टूल्सचा शोध घेणारे क्रिएटर गॅलॅक्सी टॅब एस१० अल्ट्रा आणि एस१०+ तमच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. गॅलॅक्सी टॅब एस१०+ आणि एस१० अल्ट्रामध्ये उल्लेखनीय व्हिज्युअल्स व सर्वोत्तम मनोरंजन अनुभवासाठी आकर्षक डायनॅमिक एएमओएलईडी २X डिस्प्लेसह अॅण्टी-रिफ्लेक्टिव्ह कोटिंग आहे. गॅलॅक्सी टॅब एस१० अल्ट्रा १४.६-इंच डायनॅमिक एएमओएलईडी २X डिस्प्लेसह वरचढ ठरतो, ज्यामध्ये आकर्षक व्हिज्युअल्स आणि सर्वोत्तम व्युइंग अनुभवासाठी अॅण्टी-रिफ्लेक्टिव्ह कोटिंग आहे, ज्यामुळे प्रखर प्रकाशात देखील स्क्रिनवरील कन्टेन्ट स्पष्ट दिसतो.
या टॅब्लेट्समधील ड्युअल १२ MP सेल्फी कॅमेरे आणि ड्युअल रिअर कॅमेरे (१३ MP मेन व ८ MP अल्ट्रावाइड) व्यावसायिक फोटोग्राफी व व्हिडिओ कॉलससाठी परिपूर्ण टूल आहेत. गॅलॅक्सी टॅब एस१० अल्ट्रा आणि टॅब एस१०+ AI प्रोसेसिंगमधील प्रमुख सुधारणांचा फायदा घेत शक्तिशाली कार्यक्षमता देतात. पूर्वीचा डिवाईस गॅलॅक्सी टॅब एस९ अल्ट्राच्या तुलनेत गॅलॅक्सी टॅब एस१० अल्ट्रामधील सीपीयूमध्ये १८ टक्क्यांहून अधिक वाढ, जीपीयूमध्ये २८ टक्के वाढ आणि एनपीयूमध्ये १४ टक्के सुधारणा करण्यात आली आहे. विस्तारित बॅटरी लाइफ आणि सुपर-फास्ट चार्जिंगसह गॅलॅक्सी टॅब एस१० सिरीज कमी वेळेत चार्जिंगसह दीर्घकाळापर्यंत वापराची खात्री देते.
कीबोर्डवरील समर्पित AI कीज वापरकर्त्यांना शक्तिशाली टूल्स उपलब्ध करून देते, जसे सहजपणे मजकूर व्यवस्थापनासाठी ट्रान्सक्रिप्ट असिस्ट आणि नोट असिस्ट, जे काही सेकंदांमध्ये गणितामधील गुंतागूंतीची उदाहरणे सोडवू शकते. इतर अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत, स्केच टू इमेज आणि जेमिनी, जे प्रभावी मल्टीटास्किंग व क्रिएटिव्हीटीची खात्री देतात. दोन्ही टॅब्लेट्स आयपी ६८-प्रमाणित एस पेनसह येतात, ज्यामुळे क्रिएटर्स व व्यावसायिकांना अचूकता व अद्वितीय उत्पादकता मिळते.
गॅलॅक्सी टॅब एस१० सिरीज होम AI डिवाईस म्हणून देखील काम करते, ज्यामध्ये ३डी मॅप व्ह्यू आहे, जे स्मार्टथिंग्ज इकोसिस्टममधील डिवाईस व्यवस्थापन सुव्यवस्थित करण्यासाठी घर आणि सर्व कनेक्टेड डिवाईसेसचे व्हिज्युअल पुनरावलोकन देते. प्रबळ सॅमसंग नॉक्स सिक्युरिटी डेटा गोपनीयता व नियंत्रणाची खात्री देते, तर नाविन्यपूर्ण मटेरिअल्समधून सॅमसंगची अधिक शाश्वत भविष्याप्रती कटिबद्धता दिसून येते.
हेदेखील वाचा- Samsung Galaxy S24 फॅन एडिशन लवकरच लाँच होणार, AI फीचर्सचा समावेश, जाणून घ्या वैशिष्ट्य
पावरफुल ११,२०० एमएएच बॅटरी, १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेजसह गॅलॅक्सी टॅब एस१० अल्ट्रा काम व गेमिंगसाठी अल्टिमेट सोबती आहे. या टॅब्लेटमध्ये त्याच्या पूर्वीच्या टॅब्लेटच्या तुलनेत उच्चस्तरीय वैशिष्ट्ये आहेत. गॅलॅक्सी टॅब एस१०+ मध्ये अधिक कॉम्पॅक्ट १२.३-इंच डायनॅमिक एएमओएलईडी २X डिस्प्ले, १२ मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा आणि तेच प्रगत रिअर कॅमेरा सेटअप आहे. जवळपास १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसह हा टॅब्लेट पोर्टेबल फॉर्म फॅक्टरमध्ये सर्वोच्च कार्यक्षमतेची मागणी करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी डिझाइन करण्यात आला आहे.
या टॅब्लेटमध्ये दिवसभरातील उत्पादकतेसाठी १०,०९० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. प्रगत अॅण्टी-रिफ्लेक्टिव्ह तंत्रज्ञानासह ग्लेअर व रिफ्लेक्शन कमी होत प्रत्येक कन्टेन्ट कोणत्याही अँगलमधून आणि सर्व वातावरणांमध्ये सुस्पष्ट दिसतो. या सिरीजमध्ये AI -पॉवर्ड डायलॉग बूस्टद्वारे सुधारित क्वॉड-स्पीकर सिस्टम देखील आहे, जी पार्श्वभूमीमधील आवाजाला कमी करत अपवादात्मक ऑडिओसह सुस्पष्टपणे ऐकू येण्याची खात्री देते.
गॅलॅक्सी टॅब एस१० सिरीज विनासायास व उत्पादनक्षम अनुभव देते, ज्यामुळे सर्जनशीलतेला वाढवण्यासाठी परिपूर्ण प्लॅटफॉर्म आहे. नोट असिस्ट आणि सर्वोत्तम एस पेनसह मोठ्या डिस्प्लेवर सहजपणे नोट्स घेता येतात. शाळेचा गृहपाठ, नोट-टेकिंग आणि जर्नलिंग यांसारखे टास्क्स एआय-पॉवर्ड ऑटोमॅटिक ट्रान्सक्रिप्शन व सारांशांसह अधिक कार्यक्षम झाले आहेत.
गॅलॅक्सी टॅब एस१० सिरीजमध्ये पीडीएफ ओव्हरले ट्रान्सलेशन देखील आहे, ज्यामुळे ऑन-स्क्रिन ओव्हरलेच्या माध्यमातून पीडीएफचे सहजपणे भाषांतर करता येते. हँडरायटिंग हेल्प गुंतागुंतीच्या नोट्सचे व्हिज्युअल्स सुलभ करते. तसेच, गॅलॅक्सी AI चे स्केच टू इमेज वैशिष्ट्य गॅलॅक्सी टॅब एस१० अल्ट्राला संकल्पनांना वास्तविकतेत आणण्यासाठी अनुकूल टूल आहे, जे क्रिएटिव्ह असिस्टण्ट म्हणून काम करते.
गुगलसह सर्कल टू सर्च वैशिष्ट्य अॅप्सदरम्यान स्विच न होता त्वरित कोणत्याही गोष्टीला सर्च करण्याची सुविधा देते. फक्त दोन टॅप्समध्ये त्वरित इमेजेस्, व्हिडिओज किंवा मजकूर भाषांतरित करता येऊ शकते. सर्कल टू सर्च वैशिष्ट्य गणित व भौतिकशास्त्रामधील उदाहरणे सोडण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप सोल्यूशनसह मदत करते.
AI द्वारे समर्थित गॅलॅक्सी एस पेनचे एअर कमांड त्वरित गॅलॅक्सी AI असिस्टण्ट वैशिष्ट्ये उपलब्ध करून देते, ज्यासाठी मेनू स्विच करण्याची गरज भासत नाही. एआय असिस्टण्ट अॅप्स बुक कव्हर कीबोर्डवरील गॅलॅक्सी एआय कीच्या माध्यमातून सहजपणे उपलब्ध होतात, ज्यामुळे वापरकर्ते वैयक्तिकृत AI अनुभवासाठी सॅमसंगचे बिक्स्बी आणि गुगलचे जेमिनीदरम्यान सहजपणे स्विच करू शकतात. गॅलॅक्सी टॅब एस१० सिरीज २७ सप्टेंबर २०२४ पासून Samsung.com, सॅमसंग स्मार्ट कॅफेज आणि इतर सर्व आघाडीच्या ऑनलाइन व ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.
टॅब एस१०+ मूनस्टोन ग्रे आणि प्लॅटिनम सिल्व्हर रंगात उपलब्ध आहे. तर टॅब एस१० अल्ट्रा मूनस्टोन ग्रे, प्लॅटिनम सिल्व्हर या दोन रंगात उपलब्ध आहे. टॅब एस१०+ २५६ जीबी वायफायच किंमत ७६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर याच्या ५जी वर्जनची किंमत ९०,९९९ आहे. टॅब एस १० अल्ट्राच्या २५६ जीबी वायफायची किंमत ९३,९९९ रुपये आहे, तर ५जी वर्जनची किंमत १,०७,९९९ रुपये आहे. तर टॅब एस १० अल्ट्रा ५१२ जीबी १,०४,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर ५जीची किंमत १,१८,९९९ रुपये आहे.