Samsung Galaxy S24 फॅन एडिशन लवकरच लाँच होणार, AI फीचर्सचा समावेश, जाणून घ्या वैशिष्ट्य
Samsung Galaxy S24 फॅन एडिशन येत्या काही दिवसांतच लाँच होणार आहे. Galaxy Tab S10 सीरीजसोबत Samsung Galaxy S24 फॅन एडिशन लाँच केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. Samsung Galaxy S24 फॅन एडिशन हा Galaxy S23 फॅन एडिशनचा उत्तराधिकारी म्हणून लाँच केला जात आहे. Samsung Galaxy S24 फॅन एडिशनमध्ये AI फीचर्सचा समावेश असण्याची देखील शक्यता आहे. Samsung Galaxy S24 फॅन एडिशनसोबतच Galaxy Tab S10 सिरीज देखील लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा- Tecno PoP 9 5G: 48MP Sony AI कॅमेरा असलेला Tecno फोन या दिवशी होणार लाँच
26 सप्टेंबर रोजी गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट होणार असल्याचे अहवाल समोर आले आहेत. या इव्हेंटमध्ये, सॅमसंग त्यांच्या इतर डिव्हाइससाठी AI वैशिष्ट्ये देखील घोषित करेल. याच्याशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये या तारखेवर शिक्कामोर्तब झाले आहे. पण हा व्हिडिओ सॅमसंगच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर करण्यात आला नसून एका यूजरने शेअर केला आहे. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)
व्हिडिओनुसार, लाँच इव्हेंट व्हिएतनाममध्ये 26 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता होणार आहे. हा ईव्हेंट भारतातील प्रेक्षक IST रात्री 8:30 वाजता लाईव्ह पाहू शकतील. लक्षात ठेवा की सॅमसंगने त्याच्या पुढील Galaxy Unpacked लाँच इव्हेंटची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, त्यामुळे 26 सप्टेंबरच्या तारखेवर विश्वास ठेवता येत नाही.
हेदेखील वाचा- Netflix च्या अडचणीत वाढ, वांशिक भेदभाव आणि करचुकवेगिरीच्या आरोपांमुळे निर्माण झाल्या समस्या
या आठवड्याच्या सुरुवातीला, सॅमसंगने भारतात आपल्या आगामी टॅबलेटसाठी ‘प्री-रिझर्वेशन’ सुरु केलं आहे. ज्यामुळे ग्राहकांना लवकर ऍक्सेस ऑफरच्या बदल्यात टॅबलेट खरेदी करण्यासाठी मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना 1,000 रुपये भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही जाहिरात सॅमसंग वेबसाइट, सॅमसंग इंडिया स्मार्ट कॅफे, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसह ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला जर कपंनीच्या या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सॅमसंग वेबसाइट, सॅमसंग इंडिया स्मार्ट कॅफे, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसह ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना भेट देऊ शकता.
Samsung Galaxy S24 फॅन एडिशन एक Exynos 2400e प्रोसेसरद्वारे समर्थित असेल. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले असू शकतो. Samsung Galaxy S24 फॅन एडिशनमध्ये 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये 25W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4,565mAh बॅटरी दिली जाऊ शकते. ज्यामुळे फोन लवकर चार्ज होण्यासाठी मदत होईल. आणि युजर्स फोनचा दिर्घकाळ वापर करू शकतील.
Galaxy Tab S10+ आणि Galaxy Tab S20 Ultra या स्मार्टफोनमध्ये 12.3-इंच आणि 14.6-इंच डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले दिला जाऊ शकतो. Galaxy Tab S10+ आणि Galaxy Tab S20 Ultra या स्मार्टफोनमध्ये पूर्वीचा 12MP सेल्फी कॅमेरा असू शकतो, तर अल्ट्रा मॉडेलमध्ये ड्युअल 12MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा असल्याचे म्हटले जाते.