युरोपियन युनियनने Meta ला ठोठावला 102 करोड डॉलरचा दंड! नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या
Mark Zuckerberg च्या Meta ला युरोपियन युनियनने 102 करोड डॉलरचा दंड ठोठावला आहे. 2019 च्या फेसबुक युजर्स संबंधित असणाऱ्या एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. युरोपियन युनियनच्या प्रायव्हसी रेग्युलेटरने शुक्रवारी फेसबुक युजर्सच्या पासवर्डशी संबंधित सुरक्षा त्रुटी प्रकरणी Meta ला 102 करोड डॉलरचा दंड ठोठावला आहे.
हेदेखील वाचा- कोणत्या देशात मिळणार सर्वात स्वस्त iPhone 16? जाणून घ्या प्रत्येक देशतील iPhone 16 ची किंमत
2019, पासून या प्रकरणाची चौकशी सुरु होती, आता अखेर या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. आयरिश डेटा प्रोटेक्शन कमिशनने आपल्या आदेशात म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्यांनी मेटा या अमेरिकन कंपनीवर 91 दशलक्ष युरो म्हणजेच 101.6 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
Meta शी संबंधित या प्रकरणाची चौकशी 2019 साली सुरु झाली होती. काही फेसबुक युजर्सचे पासवर्ड अनवधानाने इंटरनल स्टोरेज झाले होते. म्हणजेच, युजर्सचे पासवर्ड फेसबुक कर्मचाऱ्यांना सहज सापडू शकतात. यामुळे युजर्सची प्राव्हसी आणि सुरक्षा धोक्यात येऊ शकते. ही माहिती समोर येताच या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली.
याप्रकरणी Meta ने उत्तर देत म्हटलं होतं की, फेसबुक युजर्सच्या पासवर्ड संबंधित ही चूक दूर करण्यासाठी त्वरित कारवाई करण्यात आली होती. या पासवर्डचा गैरवापर किंवा अयोग्यरित्या प्रवेश केला गेल्याचा कोणताही पुरावा नाही. आम्ही या प्रकरणाच्या तपासादरम्यान आयरिश डेटा प्रोटेक्शन कमिशनशी अर्थपूर्णपणे सहभाग घेतला आहे.
हेदेखील वाचा- Ranveer Allahbadia सारखी चूक तुम्ही करू नका, तुमच्या YouTube चॅनलला अशा प्रकारे हॅकर्सपासून सुरक्षित ठेवा
उपायुक्त ग्रॅहम डॉयल म्हणाले की, “दुरुपयोगाचे धोके लक्षात घेऊन वापरकर्ता संकेतशब्द साध्या मजकुरात साठवले जाऊ नयेत हे सर्वमान्य आहे. तर मेटा म्हणाले की, ही त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही तात्काळ कारवाई केली आणि या पासवर्डचा गैरवापर केला गेला किंवा अयोग्यरित्या प्रवेश केला गेला असा कोणताही पुरावा नाही. आम्ही ही समस्या आमच्या लीड रेग्युलेटर, आयरिश डेटा प्रोटेक्शन कमिशनकडे सोपवली आहे.
Meta चे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲपसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. या फ्लॅटफॉर्मचे करोड युजर्स देखील आहेत. Meta वर कोणत्या कारणासाठी दंड ठोठावला जाणं ही नवीन गोष्ट नाही. यापूर्वी, युजर्सचा डेटा चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल इंस्टाग्रामला 405 दशलक्ष युरो, व्हॉट्सॲपला 5.5 दशलक्ष युरो आणि ट्रान्सअटलांटिक डेटा पाठवल्याबद्दल मेटाला 1.2 अब्ज युरोचा दंड ठोठावण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा Meta वर एक नवीन दंड ठोठावण्यात आला आहे. फेसबुक वापरकर्त्यांच्या पासवर्ड सुरक्षा त्रुटीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. Meta वर ठोठावण्यात आलेल्या नवीन दंडामुळे आता पुन्हा एकदा Mark Zuckerberg ला एक मोठा धक्का बसला आहे.