Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio, Airtel आणि VI च टेन्शन वाढलं! स्टारलिंकची लाँचिंग डेट जवळ; सॅटेलाइट इंटरनेट कधी उपलब्ध होणार?

Elon Musk ची सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंकमुळे खाजगी आणि देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या jio, airtel आणि VI चं टेन्शन वाढलं आहे. स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशावर Jio, Airtel आणि VI ने नाराजी व्यक्त केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 12, 2024 | 10:00 AM
Jio, Airtel आणि VI च टेन्शन वाढलं! स्टारलिंकची लाँचिंग डेट जवळ; सॅटेलाइट इंटरनेट कधी उपलब्ध होणार?

Jio, Airtel आणि VI च टेन्शन वाढलं! स्टारलिंकची लाँचिंग डेट जवळ; सॅटेलाइट इंटरनेट कधी उपलब्ध होणार?

Follow Us
Close
Follow Us:

Elon Musk ची सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंक लवकरच भारतात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. डेटा लोकॅलायझेशन आणि सिक्योरिटी रिक्वायरमेंट्सच्या कराराबद्दल स्टारलिंक आणि दूरसंचार विभाग यांच्यात दीर्घकाळापासून मतभेद होते. मात्र, आता रिपोर्टनुसार स्टारलिंकने दूरसंचार विभागाच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत. त्यानंतर सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवेने लाइसेंस अ‍ॅप्लिकेशनवर पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेदेखील वाचा- सरकारचा सर्वात मोठा Digital Strike! 1.77 कोटी सिम कार्ड ब्लॉक, जाणून घ्या का घेतला हा निर्णय

भारतात Elon Musk च्या स्टारलिंकच्या प्रवेशाचा मार्ग अतिशय सोपा झाला आहे. देशात स्टारलिंकचा सॅटेलाइट ब्रॉडबँड
सेवेने लाइसेंस ऐप्लिकेशनवर पुढे जाणे जवळपास निश्चित आहे. स्टारलिंकने दूरसंचार विभागाच्या (DoT) “डेटा लोकलायझेशन आणि सिक्योरिटी रिक्वायरमेंट्सच्या” कराराचे पालन केले आहे. दोघांनी सुरक्षेशी संबंधित अनेक गोष्टींवर एकमत केले आहे. हे प्रकरण काही दिवस संमतीवर अडकले होते. (फोटो सौजन्य – pinterest)

स्टारलिंकचा भारतातील प्रवेश लवकरच निश्चित

स्टारलिंक आणि जेफ बेझोस यांच्या क्विपरच्या भारतातील प्रवेशासाठी दूरसंचार विभागाच्या कराराचे पालन करणं ही मोठी गोष्ट होती, जी आता स्टारलिंकने स्वीकारली आहे. दूरसंचार विभागाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, जी कोणती सॅटेलाईट कंपनी भारतात काम करेल, त्याला फक्त देशातच डेटा स्टोर करावा लागेल. या सर्व प्रकरणातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारत सरकारने स्टारलिंकसाठी मार्ग खुला केला असला तरी, स्टारलिंकने अद्याप यावर आपले मत व्यक्त केलेले नाही. स्टारलिंकने दूरसंचार विभागाच्या सर्व अटी मान्य केल्या असल्या तरी अद्याप याबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

या प्रकरणातही मार्ग मोकळे

स्टारलिंकने स्पेस रेग्युलेटर इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) कडे देखील अर्ज केला होता. हा अर्ज देखील लवकरच स्वीकारला जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे. अहवालात म्हटले आहे की स्टारलिंक सेवा या वर्षी सुरू होण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. कारण ट्रायने किंमत आणि स्पेक्ट्रम वाटपाचे नियम स्थापित केल्यानंतरच सेवा सुरू होतील. डिसेंबरपर्यंत ट्राय किंमत आणि स्पेक्ट्रम वाटपाचे नियम ठरवेल अशी अपेक्षा आहे.

खासगी ऑपरेटर्सच्या अडचणी वाढल्या

Jio, Airtel आणि Vodafone Idea ने स्टारलिंक भारतात येण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. जिओ आणि एअरटेल या दोन्ही टेलकॉम कंपन्या लिलावाद्वारे स्पेक्ट्रम वाटपासाठी आग्रही आहेत. स्पेक्ट्रम खरेदी करणाऱ्या आणि टेलिकॉम टॉवर्ससारख्या पायाभूत सुविधांची उभारणी करणाऱ्या लेगसी ऑपरेटरना लिलावाने समान संधी दिले पाहिजे असे त्यांचे मत आहे. मात्र, स्टारलिंकचे म्हणणे आहे की, तिची सेवा टेलिकॉम कंपन्यांपेक्षा वेगळी आहे.

हेदेखील वाचा- Inflight Internet: हजारो फुटाच्या उंचीवरून इंटरनेटचा आनंद! काय आहे इनफ्लाइट इंटरनेट, कशी झाली सुरुवात? जाणून घ्या

लिलाव होणार नाही

अलीकडेच, दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एका मुलाखतीत सांगितले की सॅटेलाइट ब्रॉडबँडसाठी स्पेक्ट्रमचे वाटप केले जाईल आणि लिलाव केले जाणार नाही. या विधानानंतर एअरटेल आणि जिओसाठी आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत, तर स्टारलिंकसाठी मार्ग सोपा झाला आहे.

Web Title: Satellite internet starlink may launch soon in india jio airtel and vodafone tension increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 10:00 AM

Topics:  

  • elon musk

संबंधित बातम्या

Xu-Bo : 100 मुलांचा बाप आता मस्कच्या घरी सोयरीकेसाठी धडपड; ‘या’ चिनी अब्जाधीशाचा वेडेपणा की वारसाचा अजब ध्यास
1

Xu-Bo : 100 मुलांचा बाप आता मस्कच्या घरी सोयरीकेसाठी धडपड; ‘या’ चिनी अब्जाधीशाचा वेडेपणा की वारसाचा अजब ध्यास

Silver Prices News: चांदीच्या भावांनी तोडला विक्रम; वाढत्या किमतींमुळे एलोन मस्क चिंतेत 
2

Silver Prices News: चांदीच्या भावांनी तोडला विक्रम; वाढत्या किमतींमुळे एलोन मस्क चिंतेत 

टेक विश्वासाठी ऐतिहासिक ठरलं ‘2025’ चं वर्ष! स्लिम iPhone, AI गॅझेट्स आणि Musk चा रोबोट… प्रत्येक इनोव्हेशनने जगाला केलं थक्क
3

टेक विश्वासाठी ऐतिहासिक ठरलं ‘2025’ चं वर्ष! स्लिम iPhone, AI गॅझेट्स आणि Musk चा रोबोट… प्रत्येक इनोव्हेशनने जगाला केलं थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.