Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Xu-Bo : 100 मुलांचा बाप आता मस्कच्या घरी सोयरीकेसाठी धडपड; ‘या’ चिनी अब्जाधीशाचा वेडेपणा की वारसाचा अजब ध्यास

Billionaire 100 Children: चिनी अब्जाधीश झू बो यांनी आधीच 100 मुलांना जन्म दिला आहे आणि ते आणखी 20 मुलांना जन्म देण्याची योजना आखत आहेत, ज्यामुळे त्यांच्या १.१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे वारसदारांची एक मोठी संख्या निर्माण

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 31, 2025 | 03:01 PM
chinese billionaire xu bo 100 children surrogacy dynasty elon musk family alliance news

chinese billionaire xu bo 100 children surrogacy dynasty elon musk family alliance news

Follow Us
Close
Follow Us:
  •  चिनी गेमिंग टायकून झू बो हे आधीच १०० हून अधिक मुलांचे बाप असून, सरोगसीच्या मदतीने ही संख्या वाढवण्याचे त्यांचे मिशन सुरूच आहे.
  • आपल्या १.१ अब्ज डॉलर्सच्या साम्राज्याला सुरक्षित ठेवण्यासाठी किमान २० ‘हाय-क्वालिटी’ अमेरिकन वारस हवे असल्याचा त्यांचा दावा आहे.
  •  आपली मुले भविष्यात जगावर राज्य करण्यासाठी त्यांनी चक्क एलोन मस्कच्या कुटुंबात सोयरीक करण्याचे अजब स्वप्न पाहिले आहे.

Chinese billionaire Xu Bo 100 children story : जगातील अब्जाधीशांच्या विचित्र सवयी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात, पण चीनमधील एका टेक टायकूनने (Tech Tycoon) जे काही केलं आहे, ते पाहून जगभरातील लोकांचे डोळे विस्फारले आहेत. चीनमधील प्रसिद्ध मोबाईल गेमिंग कंपनी ‘डुओयी नेटवर्क’चे (Duoyi Network) संस्थापक आणि अध्यक्ष झू बो (Xu Bo) सध्या आपल्या संपत्तीमुळे नाही, तर आपल्या १०० हून अधिक मुलांमुळे चर्चेत आले आहेत. ४८ वर्षांच्या या अब्जाधीशाचा दावा आहे की, जितकी जास्त मुले, तितके साम्राज्य सुरक्षित!

सरोगसी आणि मुलांची फौज

वॉल स्ट्रीट जर्नलने प्रसिद्ध केलेल्या एका खळबळजनक अहवालानुसार, झू बो यांनी जगभरात विविध सरोगेट मातांच्या मदतीने १०० पेक्षा जास्त मुलांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक मुले अमेरिकेत जन्माला आली आहेत. झू बो यांच्या मते, ही केवळ मुले नसून त्यांचे ‘लष्करी आणि व्यावसायिक वारस’ आहेत. सध्या अनेक सरोगेट माता त्यांच्या आणखी २० मुलांच्या प्रतीक्षेत आहेत. पावेल दुरोव सारख्या जागतिक व्यक्तींपासून प्रेरित होऊन झू बो यांनी ही “लोकसंख्या वाढवण्याची मोहीम” हाती घेतली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ

मस्कच्या कुटुंबात सोयरीक करण्याचे स्वप्न

झू बो केवळ मुलांची संख्या वाढवून थांबणार नाहीत, तर त्यांना जगातील सर्वात शक्तिशाली लोकांशी संबंध जोडायचे आहेत. एका न्यायालयीन सुनावणी दरम्यान त्यांनी व्यक्त केलेली इच्छा सर्वात जास्त चर्चेत राहिली. झू बो यांना आपल्या मुलांचे लग्न एलोन मस्क (Elon Musk) यांच्या मुलांशी करायचे आहे. मस्कच्या बुद्धिमत्तेचा आणि आपल्या संपत्तीचा वारसा एकत्र आला तर जगावर राज्य करणे सोपे जाईल, असे त्यांचे अजब तर्कशास्त्र आहे. जागतिक स्तरावर एक अभेद्य ‘ब्लडलाईन’ तयार करण्याचे त्यांचे हे स्वप्न आहे.

Philo-Semitism! WSJ: Chinese billionaire Xu Bo reportedly has 100+ sons born through surrogacy+IVF. He prefers eggs from Jewish women. Elites are aggressively using IVF + embryo screening technology. What do they know that you don’t? pic.twitter.com/x8bCJjbK16 — steve hsu (@hsu_steve) December 14, 2025

credit : social media and Twitter

१.१ अब्ज डॉलर्सची संपत्ती अन् २० खास वारस

झू बो यांची एकूण संपत्ती सुमारे १.१ अब्ज डॉलर्स (सुमारे ९१०० कोटी रुपये) आहे. एवढ्या मोठ्या साम्राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी त्यांना किमान २० अत्यंत हुशार आणि ‘हाय-क्वालिटी’ अमेरिकन वारस हवे आहेत. झू बो यांच्या मते, समाजात आणि व्यवसायात येणाऱ्या सर्व समस्यांवर एकच जालीम उपाय आहे, तो म्हणजे ‘मुलांची संख्या वाढवणे’. त्यांनी आपल्या वेइबो (Weibo) पोस्टमध्ये वारंवार अशा स्त्रियांचा शोध घेण्याबद्दल भाष्य केले आहे ज्या “उच्च दर्जाच्या” मुलांना जन्म देऊ शकतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sydney Fireworks: सिडनीचा शांतता संदेश; Bondi हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ आकाशात होणार जगातील सर्वात मोठी आतिषबाजी

माजी प्रेयसीचे धक्कादायक दावे अन् कायदेशीर वाद

झू बो यांच्या खासगी आयुष्यात वादांचे मोहोळ उठले आहे. त्यांच्या एका माजी प्रेयसीने असा दावा केला आहे की, झू बो यांना प्रत्यक्षात ३०० मुले आहेत. अर्थात, त्यांच्या कंपनीने हा दावा नाकारला असला तरी त्यांनी १०० मुलांची कबुली दिली आहे. त्यापैकी १२ मुले अमेरिकन नागरिक आहेत. हा संपूर्ण प्रकार आता केवळ वैयक्तिक राहिला नसून चीन आणि अमेरिकेत कायदेशीर आणि नैतिक वादाचा विषय बनला आहे. सरोगसीच्या माध्यमातून अशा प्रकारे मुलांची फौज तयार करणे नैतिक की अनैतिक, यावर सोशल मीडियावर दोन तट पडले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: झू बो (Xu Bo) कोण आहेत?

    Ans: झू बो हे चीनमधील आघाडीच्या डुओयी नेटवर्क (Duoyi Network) या मोबाईल गेमिंग कंपनीचे संस्थापक आणि अब्जाधीश अध्यक्ष आहेत.

  • Que: झू बो यांना नक्की किती मुले आहेत?

    Ans: अधिकृत माहितीनुसार त्यांना १०० मुले आहेत, मात्र त्यांच्या माजी प्रेयसीने ही संख्या ३०० असल्याचा दावा केला आहे.

  • Que: त्यांनी एलोन मस्क यांच्याबद्दल काय विधान केले?

    Ans: आपले व्यावसायिक साम्राज्य जागतिक स्तरावर मजबूत करण्यासाठी त्यांना आपल्या मुलांचे लग्न एलोन मस्कच्या मुलांशी लावून मोठी युती करायची आहे.

Web Title: Chinese billionaire xu bo 100 children surrogacy dynasty elon musk family alliance news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • China
  • elon musk
  • international news
  • richest person

संबंधित बातम्या

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ
1

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ

भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था ठरताच चीनला झोंबली मिरची; 16 वर्षे अजूनही मागे असल्याचा दावा, जपानवरही हल्ला
2

भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था ठरताच चीनला झोंबली मिरची; 16 वर्षे अजूनही मागे असल्याचा दावा, जपानवरही हल्ला

भारताचा चीनला दणका! स्वस्त स्टील आयातींवर लादले भारीभरकम टॅरिफ ; 3 वर्षे भरावा लागणार कर
3

भारताचा चीनला दणका! स्वस्त स्टील आयातींवर लादले भारीभरकम टॅरिफ ; 3 वर्षे भरावा लागणार कर

Saudi vs UAE: युएईचा ‘एक्झिट’ प्लॅन! सौदीला एकटे पाडून अमिरातीला काय करायचे आहे साध्य? वाचा विशेष रिपोर्ट
4

Saudi vs UAE: युएईचा ‘एक्झिट’ प्लॅन! सौदीला एकटे पाडून अमिरातीला काय करायचे आहे साध्य? वाचा विशेष रिपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.