
काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळवा JioHotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, तुम्हाला मिळणार का फायदा?
लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या JioHotstar चे करोडो युजर्स आहेत. JioHotstar प्लॅटफॉर्मवर सिरीअल्सपासून अगदी चित्रपट आणि सिरीजपर्यंत सर्व काही पाहायला मिळते. यासाठी सबस्क्रिप्शनची गरज असते. JioHotstar त्यांच्या युजर्ससाठी सतत नवीन ऑफर्स घेऊन येत असते. ज्यामुळे युजर्सना JioHotstar चे सबस्क्रिप्शन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळते. आता देखील JioHotstar च्या सबस्क्रिप्शनबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, युजर्सना केवळ 1 रुपयांत सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करता येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये JioHotstar च्या सबस्क्रिप्शन प्लॅनचा स्क्रिनशॉट शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, JioHotstar प्रिमियम सब्सक्रिप्शन केवळ 1 रुपयात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या स्क्रीनशॉटमुळे इतर युजर्सची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. अनेकजण या ऑफरचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ऑफर प्लॅनबाबत Jio आणि JioHotstar या दोघांनीही कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे ऑफरचा फायदा घेताना युजर्सनी काळजीपूर्वक लक्ष देऊन व्यवहार करा. (फोटो सौजन्य – Pinterest)
🚨 Jio Hotstar Offer Alert! 🚨 Got 1 Month Disney+ Hotstar Premium Subscription Trial at just ₹1 Maybe User Specific. Limited-time offer. Grab it before it’s gone 🙌🥳 pic.twitter.com/sMxUM90iiV — Aɳυραɱ Mαɳɳα (@AnuQuester_108) October 31, 2025
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर गेल्या अनेक दिवसांपासून काही स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. या स्क्रीनशॉट्समध्ये असा दावा केला जात आहे की, युजर्सना Jio Hotstar चे प्रीमियम सब्सक्रिप्शन केवळ 1 खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय स्क्रीनशॉट्समध्ये असं देखील पाहायला मिळत आहे की, ही ऑफर 3 महिन्यांच्या सबस्क्रिप्शनवर आणि 1 वर्षापर्यंतच्या सबस्क्रिप्शनवर उपलब्ध आहे.
1 रुपयांत खरेदी केले जाणारे प्रीमियम सब्सक्रिप्शन केवळ 30 दिवसांसाठी व्हॅलिड असणार आहे. 30 दिवसांनंतर, जर तुम्ही 3 महिन्यांची ऑफर घेतली तर तुम्हाला 3 महिन्यांच्या सबस्क्रिप्शन पॅकची किंमत द्यावी लागेल, जी 499 रुपये आहे. जर तुम्ही 1 वर्षाची ऑफर घेतली तर तुम्हाला 30 दिवसांनंतर 1499 रुपये द्यावे लागतील. ही कंपनीची एक लिमिटेड-टाइम ऑफर असल्याचं मानलं जात आहे. ही ऑफर काही निवडक युजर्ससाठी उपलब्ध असू शकते.
JioHotstar म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो?
JioHotstar ही Reliance Jio आणि Disney+ Hotstar यांची भागीदारी असलेली ऑफर आहे, ज्याद्वारे Jio ग्राहकांना Hotstar चे प्रीमियम किंवा मोबाइल प्लॅन फ्री किंवा डिस्काउंटमध्ये मिळतात.
Jio SIM वापरकर्त्यांना Hotstar मोफत मिळतो का?
काही निवडक Jio प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनमध्ये Hotstar Mobile Subscription मोफत मिळते.
Jio Prepaid आणि Postpaid दोघांसाठी Hotstar ऑफर लागू आहे का?
होय, पण ऑफरचे प्रकार वेगवेगळे असतात. काही प्लॅन फक्त प्रीपेडसाठी आणि काही फक्त पोस्टपेडसाठी उपलब्ध असतात.
Hotstar प्रीमियम कंटेंट Jio वर फ्री कसा पाहता येईल?
जर तुमचा रिचार्ज Hotstar असलेल्या प्लॅनमध्ये केला असेल, तर Hotstar अॅपमध्ये तुमचा Jio नंबरने लॉगिन करा – प्रीमियम कंटेंट आपोआप अनलॉक होतो.