Realme P3x 5G: कमी किंमतीत खरेदी करा Realme चा हा 5G स्मार्टफोन, 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
जर तुम्ही 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. फ्लिपकार्टवर Realme P3x 5G ची किंमत प्रचंड कमी झाली आहे, त्यामुळे हा स्मार्टफोन आता ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग बचत डेज सेल सुरु झाला आहे आणि हा सेल 5 नोव्हेंबरपर्यंत सुरु असणार आहे. या सेलदरम्यान अनेक स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठ्या ऑफर्स आणि डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे ग्राहकांना महागडे स्मार्टफोन्स देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Jio Recharge Plan: फ्रीमध्ये पाहा IND W vs SA W फायनल! जियो यूजर्ससाठी हा आहे बेस्ट रिचार्ज प्लॅन
फ्लिपकार्ट सेलमध्ये Realme P3x 5G च्या खरेदीवर 5000 रुपयांचं फ्लॅट डिस्काऊंट दिलं जात आहे. एवढंच नाही तर या फोनच्या खरेदीवर स्पेशल बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या डिव्हाईसमध्ये मोठी 6000 mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि IP69 रेटिंग देण्यात आली आहे, ज्यामुळे हे डिव्हाईस कमी किंमतीत एक बेस्ट ऑप्शन आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सेलदरम्यान, फ्लिपकार्ट Realme P3x 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर उत्तम ऑफर्स उपलब्ध आहेत. खरं तर कंपनीने हा स्मार्टफोन 16,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता या स्मार्टफोनची किंमत केवळ 11,499 रुपये झाली आहे. म्हणजेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर प्लॅट 5 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जाणार आहे. याशिवाय, कंपनी Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डसह या फोनवर 5% पर्यंत कॅशबॅक देखील देत आहे, ज्यामुळे ही डील आणखी आकर्षक बनते.
यासोबतच या स्मार्टफोनवर जबरदस्त एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना 10,350 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. तथापि, ही सवलत पूर्णपणे तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही बजेट फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला एक्सचेंज व्हॅल्यूमध्ये 3,000 रुपये ते 3,000 रुपयांपर्यंत मिळू शकते. एक्सचेंज ऑफरनंतर, तुम्ही Realme फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.
Realme च्या या डिव्हाईसमध्ये 6.72-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये IP69 रेटिंग आहे. फोनमध्ये MediaTek 6400 प्रोसेसर देखील आहे, जो अत्यंत पावरफुल आहे. कॅमेऱ्यांच्या बाबतीत, या डिव्हाइसमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे, तर 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. शिवाय, फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh ची मोठी बॅटरी आहे.
फ्लिपकार्ट बिग बचत डेज सेल म्हणजे काय?
फ्लिपकार्ट बिग बचत डेज सेल हा एक खास शॉपिंग इव्हेंट आहे ज्यामध्ये ग्राहकांना मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, होम अप्लायन्सेस आणि इतर प्रॉडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट्स मिळतात.
फ्लिपकार्ट बिग बचत डेज सेल 2025 कधी सुरू होणार आहे?
हा सेल साधारणपणे प्रत्येक दोन-तीन महिन्यांनी आयोजित केला जातो. पुढील सेल नोव्हेंबर 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे.
फ्लिपकार्ट बिग बचत डेज सेलची तयारी कशी करावी?
विशलिस्ट तयार ठेवा, प्राईज अलर्ट सेट करा, बँक ऑफर्स आणि कूपन आधी तपासा, सेल सुरू होताच खरेदी करा कारण लिमिटेड स्टॉक लवकर संपतो,
फ्लिपकार्ट बिग बचत डेज सेलमध्ये एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे का?
होय, स्मार्टफोन्स आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी एक्सचेंज ऑफर उपलब्ध असते. जुन्या डिव्हाइसच्या बदल्यात डिस्काउंट मिळतो.






