Smartphones Launched In October: ऑक्टोबरमध्ये झाली 'या' स्मार्टफोन्सची धडाकेबाज एंट्री, कोणते डिव्हाईस ठरले होते गेम चेंजर?
ऑक्टोबर महिन्यात भारतात अनेक नवीन आणि दमदार स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. हे स्मार्टफोन्स मोठ्या टेकं ब्रँड्सनी लाँच केले आहेत. स्मार्टफोन्सच्या किंमती बजेट रेंजपासून अगदी प्रिमियम रेंजपर्यंत आहेत. Samsung Galaxy M17 5G, Vivo X300 Series, Honor Magic 8 यासह अनेक स्मार्टफोन्स ऑक्टोबर महिन्यात लाँच करण्यात आले होते.
य फोनची 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये, 8GB रॅम + 256GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये आणि 12GB रॅम + 256GB स्टोरेज या टॉप व्हेरिअंटची किंमत 33,999 रुपये आहे. फोनमध्ये 6.77-इंचाचा क्वाड कर्व्ड AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 1,600 निट्सची पीक ब्राइटनेस, Android 15-बेस्ड FuntouchOS 15 आणि मीडियाटेक 7360-टर्बो चिपसेट आहे. फोनमध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी आहे.
हा फोन 15 हजार रुपयांच्या बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. फोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ Super AMOLED डिस्प्ले, पीक ब्राइटनेस 1100 निट्स, इन-हाउस 6nm Exynos 1330 प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. Galaxy M17 5G मध्ये कंपनीने 5000mAh बॅटरी दिली आहे. (फोटो सौजन्य – X)
W26 च्या 512GB मॉडेलची किंमत CNY 16,999 म्हणजेच सुमारे 2,12,000 रुपये आहे. या फोनमध्ये सॅटेलाइट कॉलिंग आणि मेसेजिंगचा सपोर्ट आहे.
फोनची सुरुवातीची किंमत 4,399 युआन म्हणजेच सुमारे 54,700 रुपये आहे. फोनमध्ये 6.78 इंच डिस्प्ले, रिफ्रेश रेट 120Hz, MediaTek Dimensity 9500 चिपसेट, Android 16 वर आधारित OriginOS 6, 50-मेगापिक्सल Sony LYT-828 प्राइमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सल Samsung JN1 अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 200-मेगापिक्सल पेरिस्कोप टेलीफोटो लेंस दिला आहे. फोनमध्ये 6,510mAh बॅटरी आणि 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.
स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 1,339 युआन म्हणजेच सुमारे 17 हजार रुपये आहे. फोनमध्ये 6.72-इंचाचा Full HD+ LCD डिस्प्ले, रेजोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल आणि 120Hz रिफ्रेश रेट, डुअल स्टीरियो स्पीकर, Snapdragon 7s Gen 2 चिपसेट आहे. स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी आहे जी 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत CNY 4,499 म्हणजेच सुमारे 55,000 रुपये आहे. फोनमध्ये 6.71-इंच 1.5K (1,256×2,808) LTPO OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 6,000nits HDR पीक ब्राइटनेसप, Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 50MP चा 1/1.3-इंच प्रायमरी सेंसर, 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 200MP चा 1/1.4-इंच टेलीफोटो कॅमेरा (f/2.6 अपर्चर, 3.7x ऑप्टिकल झूम आणि 100x डिजिटल झूम), AIMAGE Honor Nox Engine दिले आहे.
स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत CNY 3,388 म्हणजेच सुमारे 41,900 रुपये आहे. फोनमध्ये 6.94 इंचाचा फुल-HD+ (2690×1136 पिक्सेल) OLED फोल्डेबल इंटरनल स्क्रीन 2.14 इंचाचा OLED कवर डिस्प्ले, आउटर स्क्रीनमध्ये 480×480 पिक्सेल रेजॉल्यूशन, मुख्य स्क्रीन P3 वाइड कलर गैमट सपोर्ट आणि 120Hz LTPO एडाप्टिव रिफ्रेश रेट, 1440Hz हाई-फ्रिक्वेंसी PWM डिमिंग आणि 300Hz टच सँपलिंग रेट आहे.






