Smartphone Tips: ऑनलाइन किंवा ऑफलाइन! कुठून खरेदी करताय तुमचा नवीन स्मार्टफोन?
आजच्या काळात स्मार्टफोन ही सर्वात मोठी गरज आहे. नवीन मोबाईल घेताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. मोबाईल ऑफलाईन घ्यावा की ऑनलाईन असा पेचही काही जणांना पडला आहे. दोन्ही ठिकाणांहून फोन खरेदी केल्याने त्याचे फायदे आणि तोटे आहेत. स्मार्टफोन खरेदी करताना काही गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.
हेदेखील वाचा- गुगल मॅपचे फ्युएल इकॉनॉमी फीचर तुम्हाला ट्रीपचे पैसे वाचवण्यासाठी करेल मदत, आताच करा ही सेटिंग
नवीन मोबाइल खरेदी करताना ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन पर्याय उपलब्ध असतात. दोन्हीचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. ऑनलाइन शॉपिंगमध्ये अधिक पर्याय बँक ऑफर आणि युजर्स रिव्ह्यु यांची मदत घेता येता. परंतु ऑनलाईन शॉपिंगमध्ये घोटाळा होण्याची शक्यता देखील अधिक आहे. तर ऑफलाइन शॉपिंगमध्ये एखादे डिव्हाइस अनुभवण्याची आणि कॅमेरा गुणवत्ता तपासण्याची संधी मिळते. त्यामुळे फोन ऑनलाईन खरेदी करावा की ऑफलाईन असा पेच अनेकांना असतो. (फोटो सौजन्य – pinterest)
तुम्ही फोन तुमच्या जवळच्या दुकानातून विकत घ्या किंवा Flipkart-Amazon सारख्या ई-कॉमर्स साइटवरून, दोन्हीमध्ये कोणतीही अडचण नाही. जर तुम्ही ऑनलाइन फोन खरेदी केला तर तुमच्यासमोर अनेक पर्याय आहेत. ऑफलाइनच्या तुलनेत बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील येथे अधिक उपलब्ध आहेत. त्यामुळे ऑनलाईन साईटवरून फोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळते. तसेच, तुम्ही अनेक उपकरणांची तुलना करू शकता आणि स्वतःसाठी सर्वोत्तम फोन निवडू शकता. चांगली गोष्ट अशी आहे की तुम्हाला येथे युजर्सचे रिव्ह्यू देखील मिळतात. त्यामुळे फोन खरेदी केला पाहिजे की नाही हे तुम्ही रिव्ह्यू पाहून ठरवू शकता.
ऑनलाइन फोन ऑर्डर करण्याचे अनेक फायदे असले तरी त्याचे काही तोटे देखील आहेत, जसे की फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते, विशेषतः जे टेक फ्रेंडली नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन फोन खरेदी करताना मोठ्या प्रमाणात पेच निर्माण होतो.
हेदेखील वाचा- Google ने लाँच केलं नवीन टूल, आता AI जनरेट इमेज आणि डीपफेक ओळखणं होईल अधिक सोपं
तुम्ही तुमच्या जवळच्या स्टोअरमधून नवीन फोन विकत घेतल्यास, येथे तुम्हाला डिव्हाइस अनुभवण्याची संधी मिळेल. तुम्ही ते हातात धरून त्याची पोर्टेबिलिटी आणि इतर गोष्टी तपासू शकता. तर ही सुविधा ऑनलाइन उपलब्ध नाही. फोन ऑफलाइन खरेदी करण्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे तुम्ही आरामात कॅमेरा गुणवत्ता तपासू शकता. जर तुम्हाला फोन प्रत्यक्ष पाहिल्यानंतर खरेदी करायचा असेल तर तुम्ही ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन खरेदीला प्राधान्य द्यावे.
तुम्हाला पाहिजे तिथून तुम्ही नवीन फोन खरेदी करू शकता. चांगले डिल्स ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीकडे उपलब्ध आहेत, परंतु ऑनलाइनमध्ये आपल्याकडे बरेच पर्याय आहेत, तर ऑफलाइनमध्ये कमी पर्याय आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइनमधील सर्वात मोठा फरक अनेकदा किमतीत दिसून येतो. त्यामुळे त्या ठिकाणाहून फोन विकत घ्यावा. जिथे तुमचा नफा जास्त आहे.