Spotify Diwali Blast: म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! 500 रुपयांहून कमी किमतीत खरेदी करा Spotify चा वार्षिक प्लॅन
तुम्ही देखील गाणे ऐकण्यासाठी म्युझिक ॲप्स Spotify चा वापर करता का? तुम्हाला देखील गाणी ऐकताना आलेल्या जाहिराती ऐकून वैताग येतो का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीच्या सणानिमित्त Spotify ने त्यांच्या ग्राहकांना एक उत्तम सरप्राईज दिलं आहे. ग्राहकांसाठी Spotify ने एक नवीन आणि धमाकेदार ऑफर लाँच केली आहे. अंतर्गत ग्राहकांना Spotify चे वर्षभराचे प्रीमियम सबस्क्रीप्शन 500 रुपयांहून कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Tech Tips: तुम्हीही स्मार्टफोन जवळ ठेवून झोपता? थांबा, तुमची ही सवय आरोग्यासाठी ठरू शकते घातक
खरं तर या म्युझिक ॲपचे वर्षभराचे सबस्क्रीप्शनची किंमत 1390 रुपये आहे. मात्र कंपनीच्या दिवाळी ऑफर अंतर्गत हे सबस्क्रीप्शन 500 रुपयांहून कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकते. तुम्हाला देखील जाहिरांतीशिवाय अनलिमिटेड गाणी ऐकायची असेल तर तुम्हीच Spotify च्या या ऑफरचा फायदा घेऊ शकता. मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकांना आता दिवाळी ऑफरअंतर्गत Spotify चे प्रीमियम सबस्क्रीप्शन केवळ 499 च्या किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच ग्राहकांना 891 रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सबस्क्रीप्शने सांगितलं आहे की, ही एक लिमिटेड टाइम ऑफर आहे, कंपनीच्या वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे की, युजर ऑफरचा फायदा 12 नोव्हेंबरपर्यंत घेऊ शकतात. यासोबतच Spotify ची ही ऑफर केवळ नवीन युजरसाठी आहे. म्हणजेच या ऑफरचा फायदा असे युजर्स घेऊ शकणार आहे ज्यांनी आतापर्यंतच Spotify अकाउंट तयार केलं नाही. जर तुम्ही प्रीमियम प्लॅन शिवाय Spotify चा वापर करत असाल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकत नाही. ही ऑफर केवळ पहिल्यांदाच साइन इन करणारे युजरसाठी लाँच करण्यात आली आहे.
ही पहिलीच वेळ नाही की जेव्हा Spotify ने प्राईस कट ऑफ लाँच केली आहे. यापूर्वी देखील अशी ऑफर अनेकदा लाँच करण्यात आली आहे. म्युझिक स्टीमिंग सर्विस कंपनी Spotify थेट एप्पल म्युझिक आणि you tube म्युझिकला टक्कर देत आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांना मागे टाकण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी सतत नवीन ऑफर्स लाँच करत असते. एप्पल म्युझिक आणि youtube म्युझिकशी तुलना केली तर Spotify च्या प्रीमियम प्लॅनची किंमत खूप जास्त आहे. Spotify प्लॅनच्या एका महिन्याची किंमत 139 रुपये आणि फॅमिली शेयरिंग प्लॅनची किंमत 229 रुपये प्रति महिना आहे. तर एप्पल म्युझिक आणि youtube म्युझिकचे मंथली सबस्क्रीप्शन केवळ 119 रुपये आहे.
Spotify ने त्यांची ही नवीन ऑफर नेटफ्लिक्ससह पार्टनरशिप केल्यानंतर लॉन्च केले आहे. स्पॉटीफायचे पॉडकास्ट व्हिडिओ नेटफ्लिक्सवर आढळू शकतात. या पॉडकास्टमध्ये क्रीडा, संस्कृती, जीवनशैली आणि गुन्हेगारीसह सर्व प्रकारांचा समावेश असेल. हे पॉडकास्ट स्पॉटिफाय स्टुडिओ आणि द रिंगर यांनी तयार केले आहेत. ही सामग्री प्रथम 2026 मध्ये अमेरिकेत नेटफ्लिक्सवर उपलब्ध असेल आणि त्यानंतर इतर देशांमध्ये उपलब्ध असेल.