आजच्या डिजीटल काळात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. स्मार्टफोनच्या मदतीने आपण आपली अनेक काम अगदी सहज आणि चुटकीसरशी पूर्ण करू शकतो. अनेक लोकं झोपताना त्यांचा स्मार्टफोन उशीजवळ ठेवतात. मात्र ही सवय आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकते. झोपताना फोन डोक्याजवळ ठेवल्यास आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: तुम्हीही स्मार्टफोन जवळ ठेवून झोपता? थांबा, तुमची ही सवय आरोग्यासाठी ठरू शकते घातक
झोपताना फोन डोक्याजवळ ठेवणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकते. स्मार्टफोन सतत रेडिओफ्रिक्वेन्सी (RF) रेडिएशन उत्सर्जित करतात, जे दीर्घकाळ शरीराच्या संपर्कात राहिल्यास आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात.
हे रेडिएशन झोपेची गुणवत्ता खराब करू शकते आणि डोकेदुखी, थकवा आणि तणाव यासारख्या समस्या वाढवू शकते.
जर तुम्ही झोपण्यापूर्वी तुमचा फोन वापरलात किंवा फोन जवळ ठेऊन झोपलात तर तुमची झोप अपूरी राहते. यामुळे दुसऱ्या दिवशी तंद्री, मूड स्विंग आणि एकाग्रतेचा अभाव निर्माण होतो.
आपल्या फोनवरून सतत येणाऱ्या नोटिफिकेशन, वाइब्रेशन किंवा कॉल अलर्टचा आपल्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
चार्जिंगला लावलेला फोन उशाखाली ठेवल्यास बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा किंवा आग लागण्याचा धोका असतो.