
Starlink Update: स्टारलिंकमध्ये काम करण्यासाठी सुरु झाली हायरिंग, LinkedIn वर शेअर केली पोस्ट! लवकरच सुरु होणार नवीन सर्विस
एलन मस्कच्या SpaceX ने भारतातील बंगळुरुमधील स्टारलिंकच्या ऑफीससाठी LinkedIn वर चार जॉब ओपनिंग पोस्ट शेअर केल्या आहेत. मेंट्स मॅनेजर, अकाउंटिंग मॅनेजर, सीनियर ट्रेजरी एनालिस्ट आणि टॅक्स मॅनेजर या पदांसाठी इच्छूक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. जॉब डिस्क्रिप्शनमध्ये लिहीलं आहे की, हे Starlink चे ‘इंटरनेशनल फुटप्रिंट’ वाढवण्याच्या स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे. ज्यामुळे स्टारलिंक जगभरातील लोकांसाठी सेवा सुरु करू शकेल. ही पोस्ट सुमारे एका आठवड्यापूर्वी करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
पेमेंट्स मॅनेजर रोज आणि आठवड्याच्या आधारावर पेमेंट सक्सेस रेट, फ्रॉड रेट, सेटलमेंट्स आणि रीकंसिलेशन डेटा मॉनिटर करणार आहे. टॅक्स मॅनेजर डेटा तयार करणार आहे आणि एक्सटर्नल सर्विस प्रोवाइडर्ससह कोऑर्डिनेट करणार आहे. या जॉबमध्ये मॅनेजरला टॅक्स पेमेंट आणि कॅलकुलेशन देखील सांभाळावे लागणार आहे. याशिवाय, Starlink एक सीनियर ट्रेजरी एनालिस्टच्या मदतीने ग्लोबल ट्रेजरी इंफ्रास्ट्रक्चर बनवण्याची तयारी करत आहे.
याशिवाय असं देखील सांगितलं जात आहे की, SpaceX ची ही सब्सिडियरी भारतात त्यांचे गेटवे स्टेशन सेटअप करण्यासाठी परदेशी टेक्निकल एक्सपर्ट्स आणण्यासाठी देखील प्लॅनिंग करत आहे. रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, सुरुवातीला हे स्टेशन्स केवळ भारतीय नागरिक ऑपरेट करणार आहेत, जोपर्यंत गृह मंत्रालय परदेशी तज्ञांना सुरक्षा मंजुरी देत नाही. कंपनी चंडीगड, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि नोएडा सारख्या ठिकाणी गेटवे म्हणजेच स्टेशन्स उभारण्याची प्लॅनिंग करत आहे. हे स्टेशन पृथ्वीवरील उपग्रह आणि रिसीव्हर्समधील संबंध स्थापित करण्यासाठी आणि राखण्यासाठी रिले पॉइंट्स म्हणून काम करतील.
Starlink म्हणजे काय आणि ही सेवा कोण चालवते?
Starlink ही Elon Musk यांच्या SpaceX कंपनीची उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा आहे, जी जगभरात हाय-स्पीड इंटरनेट पुरवते.
Starlink आणि इतर इंटरनेट सेवा प्रदात्यांमध्ये काय फरक आहे?
पारंपरिक ब्रॉडबँडमध्ये केबल नेटवर्क लागतो, तर Starlink थेट उपग्रहांद्वारे इंटरनेट पुरवते.
Starlink सेवा ग्रामीण भागात वापरता येईल का?
होय, ही सेवा विशेषतः इंटरनेट-कनेक्टिव्हिटी नसलेल्या ग्रामीण आणि दुर्गम भागांसाठीच तयार करण्यात आली आहे.