Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करताय? थांबा, नाहीतर तुम्हीही व्हाल Juice Jacking चे शिकार, अशा प्रकारे घ्या काळजी

सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या चार्जिंग पॉईंटमध्ये स्मार्टफोन चार्ज केल्यास आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. यूएसबीच्या मदतीने हॅकर्स फोन हॅक करतात. या हॅकिंगला ज्यूस जॅकिंग म्हणतात. अशावेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 17, 2024 | 07:45 PM
सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करताय? थांबा, नाहीतर तुम्हीही व्हाल Juice Jacking चे शिकार, अशा प्रकारे घ्या काळजी

सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करताय? थांबा, नाहीतर तुम्हीही व्हाल Juice Jacking चे शिकार, अशा प्रकारे घ्या काळजी

Follow Us
Close
Follow Us:

आपल्यासाठी आपला स्मार्टफोन जीव की प्राण आहे. आपण आपल्या स्मार्टफोनशिवाय एक दिवस देखील राहू शकत नाही. सध्याच्या काळात स्मार्टफोन आपली गरज बनली आहे. स्मार्टफोनच्या मदतीने आपण केवळ एका क्लिकवर आपली अनेक कामं करू शकतो. आपल्या स्मार्टफोनमध्ये आपली वैयक्तिक माहिती, फोटो आणि इतर अनेक महत्त्वाचे डॉक्युमेंट सेव्ह केले असतात. आपण स्मार्टफोनच्या मदतीने वैयक्तिक आणि व्यावसायिक कामे देखील करू शकतो.

लाँच झाली अनोखी पॉवर बँक, फक्त फोनच नाही तर लॅपटॉपही करणार चार्ज; किंमत केवळ इतकी

सार्वजनिक चार्जिंग पॉईंट

एकूणच काय तर आपल्याला दिवसभर आपला स्मार्टफोन वापरावा लागतो. अशा परिस्थितीत फोनची बॅटरी लवकर संपते. आपण घरी किंवा ऑफीसमध्ये असल्यास तात्काळ आपला फोन चार्ज करू शकतो. पण आपण जेव्हा प्रवासात असतो तेव्हा आपला फोन चार्जिंगचं आपल्याला मोठं टेंशन असतं. अशावेळी आपण आपला फोन चार्ज करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या चार्जिंग पॉईंटचा वापर करतो. आपल्या फोनची चार्जिंग संपत असेल आणि आपल्याला एखादा चार्जिंग पॉईंट दिसला तर आपला आनंद गगनात मावेनासा होतो. (फोटो सौजन्य – pinterest)

फोन चार्जरवरूनही मिळणार तुमची माहिती

पण आपला हाच आनंद आपल्या नुकसानीचे कारण ठरू शकतो. सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या चार्जिंग पॉईंटचा वापर आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. स्मार्टफोन चार्जिंगला लावल्यानंतर अगदी काही क्षणातच आपलं बँक अकाऊंट हॅक होऊ शकतं. होय, हे खरं आहे. सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या चार्जिंग पॉईंटमध्ये स्मार्टफोन चार्ज केल्यास आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. याला Juice Jacking असं म्हणतात. स्कॅमर फोन चार्जरवरूनही तुमची माहिती मिळवू शकतात, आणि तुमच्याकडून पैसे उकळू शकतात.

फोन चार्जर रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

स्कॅमरसाठी फोन चार्जरमधूनही डेटा चोरणे सोपे आहे. वास्तविक, ज्यूस जॅकिंगच्या मदतीने, घोटाळेबाजांना तुमची आणि तुमच्या बँकेची माहिती मिळते, ज्यामुळे बँक खाते देखील रिकामे केले जाऊ शकते. यामुळे, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने सार्वजनिक ठिकाणी फोन चार्जर वापरू नये अशी माहिती दिली आहे.

Year Ender 2024: व्हॉट्सॲपने यावर्षी लाँच केले हे टॉप फीचर्स, Meta AI पासून स्टेटस टॅगपर्यंत सविस्तर वाचा

ज्यूस जॅकिंग म्हणजे काय?

रेल्वे स्थानके, बस स्टँड, विमानतळ, बाजारपेठ किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग पॉइंट उपलब्ध आहेत. असे काही पॉइंट आहेत जेथे चार्जर देखील अटॅच केले जातात, परंतु हे लोकांना मदत करण्यासाठी नसून त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी असू शकते. यूएसबीच्या मदतीने हॅकर्स फोन हॅक करतात. या हॅकिंगला ज्यूस जॅकिंग म्हणतात. ज्यूस जॅकिंग हे सायबर गुन्हे करण्यासाठी सोपे माध्यम बनले आहे.

या गोष्टींची काळजी घ्या

  • तुम्ही सार्वजनिक ठिकाणी तुमचा फोन चार्ज करत असाल तर चार्जिंग करताना कोणत्याही नोटिफिकेशनवर क्लिक करू नका.
  • सार्वजनिक ठिकाणी आधीपासून अटॅच केलेला चार्जर वापरू नका.
  • तुमचा फोन चार्जर कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका.
  • सार्वजनिक चार्जिंग पॉइंटवरून फोन चार्ज करण्यापूर्वी डेटा ट्रान्सफर पर्याय बंद करा.
  • कोणतेही अज्ञात अडॅप्टर किंवा चार्जिंग केबल वापरू नका.

Web Title: Tech guide be aware of juice jacking avoid to charge your smartphone at public charging stations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: OTP, बँक अलर्ट, चॅट्स… सगळंच लॉक स्क्रीनवर? वाढतोय प्रायव्हसीचा धोका, अशा हाइड करा नोटिफिकेशन
1

Tech Tips: OTP, बँक अलर्ट, चॅट्स… सगळंच लॉक स्क्रीनवर? वाढतोय प्रायव्हसीचा धोका, अशा हाइड करा नोटिफिकेशन

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! अल्‍ट्रा-स्लिम प्रोफाइलसह Galaxy Book 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! अल्‍ट्रा-स्लिम प्रोफाइलसह Galaxy Book 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन
3

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन

Free Fire Max: ‘HEARTROCKER’ रिंग इव्हेंटने जिंकली गेमर्सची मनं! प्रीमियम बंडलसोबत क्लेम करा एक्सक्लूसिव स्किन
4

Free Fire Max: ‘HEARTROCKER’ रिंग इव्हेंटने जिंकली गेमर्सची मनं! प्रीमियम बंडलसोबत क्लेम करा एक्सक्लूसिव स्किन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.