लाँच झाली अनोखी पॉवर बँक, फक्त फोनच नाही तर लॅपटॉपही करणार चार्ज; किंमत केवळ इतकी
आपण अनेकदा कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असतो. त्यामुळे दिवसभर आपल्या फोनचा वापर केला जातो आणि फोनची बॅटरी संपते. अशावेळी आपण आपल्यासोबत असणाऱ्या पावरबँकचा वापर करतो. आपण आपल्या स्मार्टफोनसाठी तर पॉवर बँक वापरतो. पण आपल्या लॅपटॉपचं काय? हल्ली वर्क फ्रॉम होमची क्रेझ बरीच वाढली आहे. मात्र घरी काम करत असताना अचानक लाईट गेली आणि लॅपटॉपला चार्जिंग नसेल, तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तुमची काम रखडू शकतात.
SIM Card Blocked: केंद्र सरकारची मोठी कारवाई! 80 लाख सिमकार्ड अचानक ब्लॉक; का घेतला हा निर्णय?
तुम्हाला देखील फोन आणि लॅपटॉपच्या चार्जिंगची समस्या सतावत असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. अलीकडेच, युनिक्स या इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल ॲक्सेसरीज बनवणाऱ्या कंपनीने नवीन पॉवर बँक लाँच केली आहे. वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन कंपनीने अत्याधुनिक पॉवर बँक आणली आहे. ही हेवी ड्युटी पॉवर बँक जलद चार्जिंगला सपोर्ट करते. युनिक्सने लाँच केलेली ही पॉवर बँक केवळ आपला स्मार्टफोनच नाही तर आपला लॅपटॉप देखील चार्ज करते. चला तर मग या अनोख्या पॉवर बँकच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – UNIX)
युनिक्सच्या नवीन पॉवर बँकेची कॅपिसिटी 20,000 mAh आहे. हे डिव्हाईस 100W पर्यंत जलद चार्जिंग सपोर्ट देऊ शकते. UNIX UX-1522 पॉवरबँक लॅपटॉप, टॅब्लेट आणि इतर अनेक डिव्हाईससोबत कंम्पेटिबल आहे. कंपनी यावर एक वर्षाची वॉरंटी देखील देत आहे. या पॉवर बँकेची किंमत 4,999 रुपये आहे. कंपनीच्या वेबसाइटवरून तुम्ही या पॉवर बँकची खरेदी करू शकता. ही पावर बँक काळ्या रंगात उपलब्ध आहे.
UX-1522 मध्ये तीन चार्जिंग पोर्ट प्रदान केले आहेत. यात दोन टाइप सी इनपुट/आउटपुट पोर्ट आणि एक यूएसबी पोर्ट आहे. याच्या मदतीने एकाच वेळी तीन डिव्हाईस चार्ज करता येतात. कंपनीने पॉवर डिलिव्हरी तंत्रज्ञानासह पॉवर बँक लाँच केली आहे. हे ॲडॅप्टिव्ह क्विक चार्जिंग वैशिष्ट्य देते, जे खास लॅपटॉपसाठी डिझाइन केलेले आहे. टाइप सी-टू-टाइप सी केबल अखंड चार्जिंग देते. रिअल टाइम अपडेट देण्यासाठी यात डिजिटल डिस्प्ले आहे. हे चार्जिंग व्होल्टेज आणि उर्वरित बॅटरी क्षमतेबद्दल माहिती देते.
सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी, UX-1522 स्मार्ट चिप तंत्रज्ञान वापरते, जे डिव्हाईस जास्त गरम होण्यापासून प्रतिबंधित करते. पॉवर बँक लिथियम आयन बॅटरीने सुसज्ज आहे. केवळ 20 मिनिटांत सरासरी फोन 0 ते 50 टक्के चार्ज होऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. प्रवास आणि दैनंदिन वापरासाठी डिझाइन केलेली पॉवर बँक BIS प्रमाणित आहे.
AI व्हॉट्सॲपवरही दाखवणार चमत्कार! रोल आऊट झाले दोन नवीन फीचर्स, अशा प्रकारे ठरतील फायदेशीर
जर तुम्ही पॉवर बँक खरेदी करण्याची तयारी करत असाल तर पॉवर बँकची क्षमता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. जेव्हा तुम्ही पॉवर बँक खरेदी करता तेव्हा हे लक्षात ठेवा की पॉवर बँकची बॅटरी क्षमता तुमच्या फोनच्या बॅटरी क्षमतेच्या अंदाजे दुप्पट असावी. तसेच त्याची गुणवत्ता तपासणं गरजेचं आहे.