Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: स्मार्टफोन हॅक होण्यापूर्वी देतो हे सिग्नल, अशा प्रकारे स्वत:ला ठेवा सुरक्षित

तुमचा फोन अचानक जास्त गरम होऊ लागल्यास, बॅकग्राउंडमध्ये स्पाय ॲप चालू असण्याची शक्यता आहे. अशावेळी तुम्हाला योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुमची एक चुक देखील तुमचा डेटा लिक करण्यासाठी पुरेशी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 10, 2024 | 10:00 AM
Tech Tips: स्मार्टफोन हॅक होण्यापूर्वी देतो हे सिग्नल, अशा प्रकारे स्वत:ला ठेवा सुरक्षित

Tech Tips: स्मार्टफोन हॅक होण्यापूर्वी देतो हे सिग्नल, अशा प्रकारे स्वत:ला ठेवा सुरक्षित

Follow Us
Close
Follow Us:

सध्या डिजीटल क्षेत्रात प्रचंड प्रगती होत आहे. एका क्लिकवर आपली अनेक काम होत आहेत. या सगळ्या कामांसाठी आपला स्मार्टफोन आपल्याला मदत करतो. शाळा, कॉलेज किंवा ऑफीसची काम असो किंवा ऑनलाइन शॉपिंग आपला स्मार्टफोन आपल्याला सर्व कामांसाठी मदत करतो. आपण आपल्या बँकेचे बरेच व्यवहार देखील स्मार्टफोनच्या मदतीने करतो. यामुळे आपली सर्व माहिती आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह असते.

आपले फोटो, बँकेचे डिटेल्स आणि आपले महत्त्वाचे डॉक्युमेंट ही माहिती आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह केलेली असते. यामुळे आपला स्मार्टफोन हॅकर्सपासून सुरक्षित राहावा, असं आपल्याला नेहमी वाटतं असतं. अनेकदा आपल्या छोट्या चुका हॅकर्सना आमंत्रण देतात आणि आपला स्मार्टफोन हॅक झाला आहे, हे आपल्याला समजत देखील नाही. पण तुम्हाला माहित आहे का आपला स्मार्टफोन हॅक होण्यापूर्वी काही सिग्नल देतो. हे सिग्नल तुम्ही ओळखले तर तुम्ही तुमचा स्मार्टफोन हॅक होण्यापासून वाचवू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)

जास्त गरम होणे

तुमचा फोन अचानक जास्त गरम होऊ लागल्यास, बॅकग्राउंडमध्ये स्पाय ॲप चालू असण्याची शक्यता आहे. सामान्य ॲप फोनमध्ये वापरताना गरम होण्याची कोणतीही समस्या सहसा निर्माण होत नाही. पण जेव्हा फोनवर स्पाय ॲप्स परवानगीशिवाय चालू असतात, तेव्हा त्रास होतो. स्पाय ॲप्स तुमची हेरगिरी करण्याचे काम करते. या ॲप्समुळे तुमचा डेटा लिक होऊ शकतो.

परफॉर्मंस

जर तुमचा फोन मंद गतीने काम करत असेल किंवा बऱ्याचदा क्रॅश होत असेल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. हॅकर्स तुमच्या फोनमधील डेटाचा गैरवापर करू शकतात, ज्यामुळे तुमच्या फोनची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि तुमचा फोन बंद होऊ शकते. जर तुम्हाला फोनमध्ये असे सिग्नल मिळत असतील तर तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे.

पॉप-अप आणि अनावश्यक जाहिराती

जर अचानक तुम्ही फोनवर कोणता ॲप ओपन केला आणि अशावेळी तुम्हाला स्क्रीनवर पॉप-अप आणि अनावश्यक जाहिराती दिसू लागल्या, तर फोनच्या बँकग्राऊंडमध्ये काही चुकीची क्रिया घडण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या स्मार्टफोनला ॲडवेअरचा धोका निर्माण होऊ शकतो. जर तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही सिग्नल मिळत असेल तर तुम्ही ताबडतोब तुमचा फोन तपासावा. कारण तुम्ही केलेल्या दुर्लक्षामुळे तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं.

सुरक्षिततेसाठी काय करावे?

जर तुमचा फोन काही संशयास्पद अ‍ॅक्टिव्हिटींशी संबंधित सिग्नल देत असेल तर महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

मजबूत पासवर्ड – अशा परिस्थितीत तुम्ही बँकिंगशी संबंधित ॲप्सचे पासवर्ड ताबडतोब बदलावे आणि सर्व ॲप्ससाठी एकच पासवर्ड ठेवणे टाळावे. सर्व अ‍ॅप्ससाठी मजबूत पासवर्ड सेट करा, ज्यामध्ये नंबर, कॅपिटल लेटर्स यांचा समावेश असेल.

अनावश्यक ॲप्स हटवा – फोनमध्ये अनावश्यक ॲप्स असतील तर ते लगेच डिलीट करा.

बॅकअप घ्या आणि रीसेट करा – तुम्हाला तुमच्या फोनमध्ये हॅकींग संबंधित काही क्रिया आढळल्या तर, तुम्ही डेटाचा बॅकअप घेऊ शकता आणि डिव्हाइस रीसेट करू शकता.

मालवेअर स्कॅन – संशयास्पद सॉफ्टवेअरसाठी तुमचा फोन स्कॅन करण्यासाठी सुरक्षा ॲप वापरा. बहुतेक अँटीव्हायरस प्रोग्राम विनामूल्य फोन स्कॅन देतात.

Web Title: Tech guide smartphone gives you signal before hacking know how to stay protected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 10:00 AM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Huawei ने उडवली सर्वांची झोप… 100W चार्जिंग सपोर्टसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
1

Huawei ने उडवली सर्वांची झोप… 100W चार्जिंग सपोर्टसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Free Fire Max: गेममधील नव्या इव्हेंटने प्लेअर्स झाले खुश… सुपर लेग पॉकेटसह मिळणार हे रिवॉर्ड्स, असे करा अनलॉक
2

Free Fire Max: गेममधील नव्या इव्हेंटने प्लेअर्स झाले खुश… सुपर लेग पॉकेटसह मिळणार हे रिवॉर्ड्स, असे करा अनलॉक

Galaxy Buds4 vs Galaxy Buds4 Pro: कोणता Samsung ईयरबड तुमच्यासाठी ठरणार बेस्ट ऑप्शन? वाचा डिव्हाईसच्या फीचर्समधील फरक
3

Galaxy Buds4 vs Galaxy Buds4 Pro: कोणता Samsung ईयरबड तुमच्यासाठी ठरणार बेस्ट ऑप्शन? वाचा डिव्हाईसच्या फीचर्समधील फरक

Free Fire Max: होळीनिमित्त प्लेअर्सना मिळणार खास रिवॉर्ड्स! गेममध्ये लाईव्ह झाला स्पेशल ईव्हेंट, जाणून घ्या
4

Free Fire Max: होळीनिमित्त प्लेअर्सना मिळणार खास रिवॉर्ड्स! गेममध्ये लाईव्ह झाला स्पेशल ईव्हेंट, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.