नव्या डिझाईनसह लाँच होणार Apple ची आगामी Smartwatch, प्लास्टिक बॉडीसह मिळणार कमाल फीचर्स
टेक दिग्गज कंपनी ॲपल वेळोवेळी आपल्या वापरकर्त्यांसाठी काहीतरी नवीन आणत असते. आता रिपोर्ट्सनुसार, ॲपल लवकरच त्यांच्या लोकप्रिय बजेट-फ्रेंडली स्मार्टवॉचची तिसरी आवृत्ती लाँच करण्याच्या तयारीत आहे, ज्याचे नाव Apple Watch SE 3 असू शकते. त्यात अनेक महत्त्वाचे बदल होऊ शकतात आणि अनेक नवीन फीचर्सचाही समावेश होऊ शकतो.
QR Code Scam: या QR Code स्कॅमबद्दल माहिती आहे का? तुमची एक चूक आणि हॅकर्सकडे पोहोचतील डिटेल्स
टेकजायंट कंपनी अॅपल येत्या काही दिवसांतच नवीन स्मार्टवॉच लाँच करणार आहे. ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनच्या रिपोर्टनुसार, अॅपल 2025 मध्ये Watch SE 3 सोबत Watch 11 आणि Ultra 3 लाँच करणार आहे. Watch SE 3 बद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. Watch SE 3 च्या डिझाइनमध्ये एक मोठा बदल दिसून येणार आहे. 2020 मध्ये लाँच केलेल्या पहिल्या वॉच SE ची रचना वॉच सिरीज 4 द्वारे प्रेरित होती, जी 2018 मध्ये लाँच करण्यात आली होती. पण 2025 मध्ये येणाऱ्या वॉच SE 3 ची रचना कदाचित वॉच सीरीज 7 सारखी असू शकते, जी 2021 मध्ये लाँच करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुरमनने वॉच SE 3 मध्ये प्लास्टिकची बॉडी असू शकते असे संकेतही दिले आहेत. असे झाल्यास, हे घड्याळ अनेक चमकदार आणि आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होऊ शकते, जसे अॅपलने अनेक रंग पर्यायांमध्ये iPhone 5C सादर केले होते. त्याचप्रमाणे वॉच SE 3 मध्ये अनेक रंग पर्याय देखील उपलब्ध असणार आहेत. घड्याळाच्या डिझाईनबद्दल अद्याप बरेच तपशील उघड झाले नसले तरी जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन घड्याळात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे.
ॲपलचे हे पाऊल तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी असू शकते. जर हे घड्याळ स्पोर्टी लूक आणि अनेक रंगांच्या पर्यायांसह लाँच करण्यात आले तर ते तरुणांमध्ये नक्कीच लोकप्रिय होऊ शकते. ॲपलने नेहमीच आपले SE मॉडेल्स परवडणाऱ्या आणि आकर्षक डिझाइनमध्ये लाँच केले आहेत. पण वॉच SE 3 सह हा रेकॉर्ड बदलू शकते. त्याच्या डिझाइनमध्ये केलेल्या बदलांमुळे ते पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम आणि आकर्षक बनू शकते, असा अंदाज आहे.
सर्वच ग्राहक आता अगदी आतुरतेने SE 3 लाँच होण्याची वाट पाहत आहेत. जर हे लीक खरे ठरले, तर हे ॲपलचे आतापर्यंतचे सर्वात स्वस्त आणि स्टायलिश स्मार्टवॉच मॉडेल असू शकते. तथापि, कंपनीने अद्याप त्याची अधिकृत लाँच तारीख जाहीर केलेली नाही. पण रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर कंपनी लवकरच हा डिवाइस बाजारात आणण्याची तयारी करत आहे.
डिझाइन अपडेटसह, ॲपल वॉच SE 3 मध्ये चांगल्या परफॉर्मेससाठी एक नवीन चिप असण्याची शक्यता आहे, जे वापरकर्त्यांसाठी अधिक सुलभ आणि यूजर फ्रेंडली बनविण्यात मदत करेल. अशी अफवा आहे की कंपनी हे नवीन मॉडेल आपल्या इतर उत्पादनांसह सप्टेंबरमध्ये लाँच करू शकते.