HMD Arc: AI कॅमेऱ्यासह HMD च्या नवीन स्मार्टफोनची एंट्री, दमदार प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीने सुसज्ज
स्मार्टफोन कंपनी HMD Global ने त्यांचा नवीन स्मार्टफोन HMD Arc लाँच केला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे. ज्या लोकांना कमी किंमतीत आवश्यक फीचर्सची आवश्यकता आहे, अशा लोकांसाठी हा नवीन HMD Arc स्मार्टफोन डिझाईन करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल कंपनीने माहिती दिली आहे.
Mozi: लाँच झालं नवीन सोशल मीडिया अॅप, रिल्स आणि फोटो अपलोडिंग नाही इथे फक्त मुद्द्याचं बोला
मात्र HMD Arc स्मार्टफोनची किंमत आणि त्याची उपलब्धता याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. सर्व माहिती कंपनी लवकरच शेअर करू शकते. स्पेक्सच्या आधारावर, हा नवीन स्मार्टफोन एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. हा फोन थायलंडमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ब्रँडच्या थायलंड वेबसाइटवर सूचीबद्ध करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
HMD च्या नवीन Nokia HMD Arc स्मार्टफोनमध्ये 6.52-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये स्टँडर्ड 60Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशियो आहे. डिस्प्लेमध्ये टीयरड्रॉप नॉच आहे, ज्यामध्ये फ्रंट कॅमेरा आहे.
फोनमध्ये परफॉर्मंससाठी Unisoc 9863A प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेज आहे, जे microSD द्वारे वाढवता येते. हा फोन ब्राउझिंग, सोशल मीडिया आणि लाइट गेमिंग सारखी कामे हाताळण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
हा स्मार्टफोन अँड्रॉईड (Go एडिशन) वर आधारित आहे, जे एंट्री-लेव्हल हार्डवेअरवर उत्कृष्ट परफॉर्मंस सुनिश्चित करते. कमी किमतीत फोन खरेदी करणाऱ्यांसाठी अँड्रॉईडचे हे स्ट्रिप-डाउन वर्जन सर्वोत्तम आहे.
HMD Arc मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी एका चार्जवर एक दिवस सहज टिकते.
HMD Arc स्मार्टफोनच्या मागील बाजूस असलेल्या ड्युअल-कॅमेरा सेटअपमध्ये 13MP मुख्य सेन्सर आणि सेकेंडरी सेन्सर समाविष्ट आहे. मूलभूत सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी स्मार्टफोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
धूळ आणि स्प्लॅशपासून संरक्षण करण्यासाठी नवीन स्मार्टफोनमध्ये साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि IP52/IP54 रेटिंग आहे. एचएमडी ग्लोबल दोन वर्षांसाठी सुरक्षा अपडेट प्रदान करण्याचे वचन देते.
HMD ने गेल्या महिन्यात भारतात HMD Fusion लाँच केला. हा अनोख्या मॉड्युलर स्मार्ट आउटफिटसह लाँच करण्यात आला. या जबरदस्त स्मार्टफोनमध्ये सेल्फ रिपेरेबिलिटी फीचर आहे. या फीचरच्या मदतीने जर तुमचा फोन खराब झाला असेल तर तुम्ही तो घरीच दुरुस्त करू शकता. कंपनी हा फोन परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये नवीन इनोव्हेशनसह ऑफर करते. फोनमध्ये 108MP रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी, फोनमध्ये 50MP सेल्फी सेन्सर देण्यात आला आहे. फोटोग्राफीचा अनुभव सुधारण्यासाठी, यात नाईट मोड 3.0, गेस्चर बेस्ड कंट्रोल आणि अॅडवांस लो-लाइट कॅपिबिलिटीज प्रदान करण्यात आल्या आहेत.