ग्राहकांच्या फसवणुकीची ऑनलाइन तक्रार करणं अधिक सोपं होणार; 'ई-जागृती ॲप' या दिवशी लाँच होण्याची शक्यता
आपण दुकानातून वस्तू खरेदी केल्यानंतर अनेकदा आपली फसवणूक होते. अशावेळी आपण दुकानदार, कंपनी किंवा सेवा पुरवठादाराकडे जाऊन याविषयी तक्रार करतो. पण काही दुकानदार, कंपनी, किंवा सेवा पुरवठादार ग्राहकांची तक्रार घेणं टाळतात. त्यामुळे ग्राहकांना मोठया प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं. अशावेळी दुकानदार, कंपनी, किंवा सेवा पुरवठादार यांची तक्रार करण्यासाठी आपल्याकडे एकमेव मार्ग असतो तो म्हणजे ग्राहक मंच. पण असे अनेक लोकं आहेत, जे हा मार्ग देखील वापरत नाहीत. त्यामुळे दुकानदार, कंपनी, किंवा सेवा पुरवठादार यांचा फायदा होतो आणि ग्राहकांचं मात्र नुकसान होतं.
Tech Tips: तुमचे खराब फोटोही बनतील एचडी! एडिटिंगसाठी हे बेस्ट AI टूल ठरतील फायदेशीर
पण आता अस होणार नाही. कारण ई- जागृती ॲप लवकरच लाँच होणार आहे. खरं तर हा ॲप वर्षभरापूर्वीच सुरू करण्यात आला होता. मात्र अद्याप हा ॲप सर्वांसाठी उपलब्ध नव्हता. मात्र आता लवकरच हा ॲप सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांची फसवणूक करणे यापुढे सोपे राहणार नाही. सध्या सर्वसामान्य ग्राहक कोणत्याही दुकानदार, कंपनी किंवा सेवा पुरवठादाराकडून फसवणुक होऊन देखील ग्राहक मंचावर त्याची तक्रार करण्याचे टाळतात. कारण त्यांना ही तक्रार करण्याची प्रक्रिया माहीत नसते. या कामात त्यांना लेखी वस्तू द्याव्या लागतात. पण आता फसवणुकीची तक्रार करणे अधिक सोपे होणार आहे. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)
विमा क्षेत्र, ई-कॉमर्स कंपन्या आणि इतर कंपन्यांच्या उत्पादनांविरुद्ध जागरूक ग्राहकांकडून लाखो तक्रारी ग्राहक मंचावर दाखल केल्या जात असल्या तरी, सुनावणीला होणारा विलंब आणि सतत पाठपुरावा करण्यात येत असलेल्या त्रासामुळे अनेक वेळा ग्राहकांना न्याय मिळत नाही. त्यामुळे अनेकजण या फसवणुकीची तक्रार करणे टाळतात.
ग्राहकांना वेळेवर न्याय मिळवून देण्याच्या आणि तक्रारींसाठी सर्वसामान्यांना पुढे येण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने, ग्राहक व्यवहार मंत्रालय 24 डिसेंबर रोजी ग्राहक दिनानिमित्त ई-जागृती ॲप लाँच करण्याची शक्यता आहे. ई-जागृती पोर्टल गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी सुरू करण्यात आले होते, परंतु हे पोर्टल अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेले नाही. 24 डिसेंबरपासून हे पोर्टल पूर्णपणे कार्यान्वित होऊ शकते. ई-जागृती पोर्टल कार्यान्वित झाल्यानंतर, ग्राहकांना तक्रारींसाठी राज्य आणि जिल्हा ग्राहक न्यायालयाकडे जावे लागणार नाही.
ग्राहक त्यांच्या मोबाईल फोन किंवा ईमेल आयडीने लॉग इन करून दुकानदार, कंपनी किंवा सेवा पुरवठादार यांच्या विरोधात संपूर्ण तक्रार नोंदवू शकतील. शुल्कासह इतर संबंधित कागदपत्रेही अपलोड करण्यात येणार असून त्यांना पोर्टल आणि ॲपवरच सुनावणीची माहिती मिळणार आहे. व्हर्च्युअल सुनावणीची सुविधा असेल आणि प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नाही, ग्राहक कोठूनही त्याची केस सतत पाहू शकणार आहेत.
Vivo X200 Series: विवोची नवीन स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच, अपग्रेड डिस्प्लेसह केली एंट्री
सध्या देशभरातील ग्राहक न्यायालये आणि संबंधित मंचांवर दरवर्षी पाच लाखांहून अधिक तक्रारी दाखल होतात. यातील अनेक प्रकरणे विविध कारणांमुळे अनेक महिने प्रलंबित राहतात. त्यामुळे ग्राहक तक्रार करणे टाळतात. मात्र आता असं करण्याची गरज नाही.
ई-जागृती पोर्टल कार्यान्वित झाल्यानंतर, प्रकरणे निकाली काढणे सोपे होईल आणि ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव होईल. ग्राहक दिनानिमित्त झोमॅटो, अजिओ, बिग बास्केट यांसारख्या अनेक ऑनलाइन कंपन्या ग्राहकांच्या संरक्षणाची शपथ घेऊ शकतात. कंपन्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांसाठी असुरक्षित आणि धोकादायक वस्तू विकणार नाहीत अशी शपथ घेतील. आणि यांचं दिवशी ई – जागृती ॲप देखील लाँच होऊ शकते.