Oppo A5 Pro 5G: Oppo चा नवीन प्रिमियम स्मार्टफोन लाँच, स्पेसिफीकेशन्स वाचून व्हाल हैराण
स्मार्टफोन कंपनी Oppo ने त्यांचा नवीन प्रिमियम स्मार्टफोन Oppo A5 Pro 5G मंगळवारी चीनमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP66, IP68 आणि IP69 रेटिंग देण्यात आली आहे. नवीन स्मार्टफोन octa-core MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरवर आधारित आहे, जे 12GB पर्यंत RAM सह जोडलेले आहे. हँडसेटमध्ये 360-डिग्री ड्रॉप रेझिस्टन्स आणि -35 डिग्रीपर्यंत एक्सट्रीम लो टेम्परेचर रेजिस्टेंस असल्याचा दावा कंपनीकडून केला जातं आहे.
Oppo A5 Pro स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W पर्यंत वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने पुष्टी केली आहे की फोनची विक्री या महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. भारतात हा स्मार्टफोन कधी लाँच होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे भारतातील ग्राहकांना या स्मार्टफोनची खरेदी करायची असल्यास बरीच वाट पहावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – X)
Oppo A5 Pro 5G स्मार्टफोन चार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 8GB + 256GB, 8GB + 512GB, 12GB + 256GB आणि 12GB + 512GB यांचा समावेश आहे. चीनमध्ये Oppo A5 Pro 5G ची किंमत 8GB + 256GB मॉडेलसाठी CNY 1,999 म्हणजेच अंदाजे 23,300 रुपयांपासून सुरू होते. त्याच वेळी, फोनचे 8GB + 512GB आणि 12GB + 256GB व्हेरिअंट CNY 2,199 म्हणजेच अंदाजे 25,700 रुपयांना सूचीबद्ध आहेत. टॉप-ऑफ-द-लाइन 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,499 म्हणजेच अंदाजे 29,200 रुपये आहे.
हा फोन सध्या देशात ओप्पो चायना ई-स्टोअरद्वारे प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे आणि 27 डिसेंबरपासून त्याची विक्री सुरू होणार असल्याची महिती कंपनीने दिली आहे. न्यू ईयर रेड, क्वार्ट्ज व्हाइट, रॉक ब्लैक आणि सँडस्टोन पर्पल या चार रंगांच्या पर्यायांमध्ये oppo चा नवीन स्मार्टफोन खरेदी केला जाऊ शकतो.
ड्युअल नॅनो सिम सपोर्टसह Oppo A5 Pro 5G Android 15-आधारित ColorOS 15 स्किनसह येतो. हँडसेटमध्ये 6.7-इंच फुल-एचडी+ (1,080 x 2,412 पिक्सेल) AMOLED स्क्रीन आहे, ज्यामध्ये 120Hz रीफ्रेश रेट, 1200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस लेवल आणि 2,160Hz हाय-फ्रिक्वेंसी PWM डिमिंग रेट आहे.
फोनमध्ये 4nm octa-core MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर आहे, जो 12GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 512GB पर्यंत UFS 3.1 ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडलेला आहे.
फोटोग्राफीसाठी, Oppo A5 Pro 5G च्या मागील बाजूस 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी रीअर सेन्सर आहे, ज्याचे अपर्चर F/1.8 आहे. याशिवाय, यात 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आहे ज्याचे अपर्चर F/2.4 आहे. समोर 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे, ज्याचा अपर्चर F/2.4 आहे.
Oppo A5 Pro 5G मध्ये 6,000mAh बॅटरी आहे जी 80W पर्यंत वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Year Ender 2024: यावर्षी ‘Apple’ चे हे प्रोडक्ट्स झाले बंद, वाचा संपूर्ण लिस्ट
कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G VoLTE, ड्युअल-बँड Wi-Fi 5, ब्लूटूथ 5.4, Beidou, GPS, GLONASS, Galileo, QZSS, NFC आणि USB टाइप-सी पोर्ट समाविष्ट आहे. सुरक्षिततेसाठी, हँडसेटमध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या फोनला डस्ट आणि स्प्लॅश रेझिस्टन्ससाठी IP66, IP68 आणि IP69 रेटिंग देण्यात आली आहे.