Year Ender 2024: Apple MacBook Pro ते Lenovo ThinkPad T14s, हे आहेत 2024 मध्ये लाँच झालेले बेस्ट लॅपटॉप
2024 मध्ये अनेक टेक कंपन्यांनी त्यांचे बेस्ट लॅपटॉप लाँच केले. मोठी बॅटरी, स्मार्ट स्क्रीन आणि पॉवरफुल प्रोसेसरसह हे नवीन लॅपटॉप लाँच करण्यात आले. अनेक लॅपटॉप तर AI फिचर्ससह लाँच करण्यात आले आहेत. यातील काही बेस्ट लॅपटॉप बद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, 2024 मध्ये लाँच झालेले हे लॅपटॉप तुमच्यासाठी बेस्ट आहेत.
ॲपलचा हा लॅपटॉप 14 आणि 16 इंच स्क्रीन आकारात लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये Liquid Retina XDR डिस्प्ले आणि 1000 nits चा पीक ब्राइटनेस आहे. याशिवाय कंपनीने व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 12MP कॅमेरा देखील दिला आहे. परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाल्यास, ॲपलच्या या लॅपटॉपमध्ये एक शक्तिशाली M4 चिप देण्यात आली आहे, जी M3 चिपपेक्षा 3 पट वेगवान आहे. त्याची बॅटरी एका चार्जवर 24 तास चालते, असा दावा कंपनीने केला आहे. MacBook Pro 1,69,900 रुपयांचा सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
या डेल लॅपटॉपमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन X1 प्लस प्रोसेसर आहे, ज्याचा क्लॉक स्पीड 3.4GHz आहे आणि एक Hexagon NPU देखील आहे. या लॅपटॉपमध्ये 64GB LPDDR5X रॅम आणि 2TB इंटरनल स्टोरेज आहे. सर्वोत्तम परफॉर्मन्ससाठी, यात 13.4 इंच टच स्क्रीन डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. Dell XPS 13 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, तो 1,39,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.
या Lenovo लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा IPS टच डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची कमाल ब्राइटनेस 400 nits आहे आणि रीफ्रेश रेट 60Hz आहे. यात AMD Ryzen AI 7 PRO 360 प्रोसेसर, AMD Radeon 880M GPU, 1TB स्टोरेज आणि 64GB LPDDR5X रॅम आहे. लॅपटॉपमध्ये डॉल्बी ॲटमॉस स्पीकर देखील आहेत आणि त्याची 58Wh बॅटरी 8-9 तास टिकू शकते. Lenovo ThinkPad T14s ची किंमत 1,37,270 रुपये आहे.
Infinix Zero Book Ultra Laptop सध्या Core Ultra 5, Core Ultra 7 आणि Core Ultra 9 या 3 प्रोसेसर व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Infinix Zero Book Ultra च्या Core Ultra 5 प्रोसेसर व्हेरिअंटची किंमत 59,990 रुपये, तर Core Ultra 7 प्रोसेसर व्हेरिअंटची किंमत 69,990 रुपये आणि Core Ultra 9 प्रोसेसर व्हेरिअंटची किंमत 84,990 रुपये आहे.
Infinix Zero Book Ultra हा विंडोज 11 होमवर चालणारा लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाचा फुल HD+ (1,080 x 1,920 पिक्सल) IPS डिस्प्ले 400 निट्स पीक ब्राइटनेस लेव्हलसह देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये काही AI फिचर्स देखील देण्यात आले आहेत. या लॅपटॉपमध्ये 70 WH ची बॅटरी आहे, जी USB Type-C पोर्टच्या माध्यमातून 100W स्पीडने चार्ज केली जाऊ शकते.
या दोन्ही लॅपटॉपमध्ये HP AI Companion, Copilot+, Poly Camera Pro हे AI फिचर्स देण्यात आले आहेत. दोन्ही लॅपटॉपमध्ये टच स्क्रीन डिस्प्ले आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन X Elite X1E-78-100 आहे.HP EliteBook Ultra 1,69,934 रुपयांचा सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. HP OmniBook X 1,39,999 रुपयांचा सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे.