Xiaomi चा नवीन टॅबलेट भारतात लाँच, 8,850mAh च्या मोठ्या बॅटरीने सुसज्ज! 'एवढी' आहे किंमत
टेक कंपनी Xiaomi चा नवीन टॅबलेट भारतात लाँच करण्यात आला आहे. Xiaomi Pad 7 या नावाने हा नवीन टॅबलेट भारतात लाँच करण्यात आला आहे. Xiaomi चा नवीन टॅबलेट 8,850mAh च्या मोठ्या बॅटरीने सुसज्ज आहे. शिवाय यामध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत. या नवीनतम टॅबलेटमध्ये Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसर आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या नवीनतम टॅबलेटची किंमत काय आहे आणि हा कुठून खरेदी केला जाऊ शकतो, याबद्दल जाणून घेऊया.
भारतात Xiaomi Pad 7 हा 8GB + 128GB आणि 12GB + 256GB या दोन पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. Xiaomi Pad 7 च्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 30,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा नवीन टॅबलेट हाय व्हेरिअंट नॅनो टेक्सचर डिस्प्ले एडिशनमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्याची किंमत 32,999 रुपये आहे. ग्रेफाइट ग्रे, मिराज पर्पल आणि सेज ग्रीन कलर पर्यायांमध्ये हा नवीन टॅबलेट खरेदी केला जाऊ शकतो. हा टॅबलेट ग्राहकांना Amazon, Xiaomi India e-store आणि Xiaomi च्या ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून 13 जानेवारीपासून खरेदीसाठी उपलब्ध असेल. ICICI बँकेच्या ग्राहकांना 1,000 रुपयांची सूट मिळू शकेल. (फोटो सौजन्य – X)
डिस्प्ले – Xiaomi Pad 7 मध्ये 11.2-इंच 3.2K LCD स्क्रीन आहे आणि ती Android 15-आधारित HyperOS 2.0 वर चालते. ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सॅम्पलिंग रेट, 800nits पीक ब्राइटनेस लेव्हल देण्यात आला आहे. तसेच डॉल्बी व्हिजन आणि HDR10 सपोर्ट आहे. डिस्प्लेला TUV Rhineland Triple Eye Protection प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे. हे कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 द्वारे देखील संरक्षित आहे. टॅबलेटमध्ये डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह क्वाड-स्पीकर सिस्टीम आहे. तसेच यामध्ये AI लेखन आणि AI लाइव्ह सबटायटल्स यांसारखी अनेक AI-समर्थित वैशिष्ट्ये आहेत.
The all-new #XiaomiPad7 is here to redefine what a tablet can do!
📍 Nano Texture Display for glare-free brilliance
📍 Powered by Snapdragon 7+ Gen 3 Mobile Platform for unstoppable performance
📍 Quad speakers with Dolby Vision® & Atmos® for immersive sound
📍 AI… pic.twitter.com/Hb1bd9Svpl— Xiaomi India (@XiaomiIndia) January 10, 2025
प्रोसेसर – Xiaomi चा हा नवीन टॅबलेट Qualcomm च्या Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसरवर चालतो, जो 12GB पर्यंत LPDDR5x RAM आणि 256GB पर्यंत UFS 4.0 ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडलेला आहे. हे Android 15-आधारित HyperOS 2.0 ऑपरेटिंग सिस्टमसह येते.
कॅमेरा – फोटोग्राफीसाठी या टॅबलेटमध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर, टॅबलेटमध्ये 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामुळे फोटोग्राफी देखील मजेदार होते. Xiaomi Pad 7 मध्ये क्वाड-माइक सेटअप आणि डॉल्बी ॲटमॉससह क्वाड-स्पीकर सिस्टम देखील आहे.
सावधान! Supreme Court च्या नकली वेबसाईटने होतेय लोकांची फसवणूक; 15 फिशिंग साइट्ची लिस्ट जारी
बॅटरी – Xiaomi Pad 7 मध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,850mAh बॅटरी आहे.
फीचर्स – कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, यात Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.4 आणि USB 3.2 Type-C Gen 1 पोर्ट समाविष्ट आहे. हे इन्फ्रारेड ट्रान्समीटरने देखील सुसज्ज आहे. टॅब्लेटची परिमाणे 251.22 x 173.42 x 6.18 मिमी आहे आणि त्याचे वजन 500 ग्रॅम आहे.