Photo Credit- Social होणार
सध्या सायबर गुन्ह्यांचं प्रमाणात फार वाढलं आहे. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी असे अनेक मार्ग शोधतात, ज्यामध्ये सामान्य लोकं अगदी सहज अडकली जाऊ शकतात. मात्र आता सायबर गुन्हेगारांनी जो मार्ग वापरला आहे, त्यामुळे सामान्य माणसांपासून अगदी सुप्रिम कोर्ट देखील चिंतेत आहे. सायबर फ्रॉडर्सनी सुप्रिम कोर्टाच्या अधिकृत वेबसाईटसारखी बनावट वेबसाईट तयारी केली आहे, ज्यामुळ लोकांची फसवूणक केली जाऊ शकते.
Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात हरवेलल्या लोकांना शोधणं आता होईल सोपं! AI ची ही सुविधा करणार मदत
सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी करून लोकांना आपल्या अधिकृत वेबसाइट सारख्या बनावट वेबसाइटपासून सावध राहण्यास सांगितले आहे. अशा वेबसाइट्स वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती चोरत असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, अशा फिशिंग हल्ल्यांची माहिती कायदेशीर संस्थांना देण्यात आली आहे आणि त्यांना त्यांची चौकशी करण्यास सांगितले आहे. नागरिकांनी देखील कोणत्याही वेबसाईटला भेट देताना सावध राहा, असं आवाहन देखील नोटीसमध्ये करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
बनावट वेबसाइट वैयक्तिक माहिती चोरत असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे अशा वेबसाइट्सपासून सावध राहा आणि त्यावर कोणतीही वैयक्तिक किंवा संवेदनशील माहिती शेअर करू नका. याशिवाय कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या लिंकवर क्लिक करू नका. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर वैयक्तिक माहिती, आर्थिक आणि इतर संवेदनशील माहिती कधीही विचारली जात नाही, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत संकेतस्थळ www.sci.gov.in हे आहे . म्हणून नेहमी URL व्हेरिफाईड करा आणि नंतरच वेबसाईटला भेट द्या.
सावधान! सुप्रीम कोर्ट की वेबसाइट पर अपनी कोई जानकारी शेयर करने से पहले रुकिए! ये वेबसाइट फेक हो सकती है! #SupremeCourt @news24tvchannel pic.twitter.com/udbOlGULSP
— Prabhakar Kumar Mishra (@PMishra_Journo) January 10, 2025
रजिस्ट्रीने जारी केलेल्या नोटीसमध्ये, कोणीही फिशिंग हल्ल्याला बळी पडल्यास त्यांनी त्यांच्या सर्व अकाऊंटचे पासवर्ड त्वरित बदलून टाकावेत, असा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच त्यांनी त्यांच्या बँक आणि क्रेडिट कार्ड कंपनीला अनधिकृत प्रवेशाबाबत कळवावे. ज्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत होऊ शकते.
इंटरनेटच्या विस्तारामुळे सायबर फसवणूक चिंतेचं कारण बनलं आहे. दररोज लोकांना सायबर फसवणुकीचा सामना करावा लागतो. अलीकडच्या काळात डिजिटल अटकेसारख्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामध्ये लोकांना वर्चुअलपद्धतीने बंदी बनवून फसवणूक केली जाते. याशिवाय ओटीपी, केवायसी आणि व्हेरिफिकेशन आदींच्या नावाने अनेक घोटाळे सुरू आहेत. हे टाळण्यासाठी लोकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.