iPhone आणि Mac युजर्ससाठी धोक्याची घंटा! Apple च्या चिपमध्ये सुरक्षा त्रुटी, डेटा चोरी होण्याची शक्यता
तुमच्याकडे देखील आयफोन, मॅक किंवा आयपॅड असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आयफोन, मॅक किंवा आयपॅडमध्ये वापरल्या जाणाऱ्या ॲपलच्या सेल्फ-मेड चिप्समध्ये सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. यामुळे युजर्सची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. शिवाय युजर्सचा पर्सनल डेटा देखील चोरी होण्याची शक्यता आहे. याबाबतचा एक अहवाल देखील सादर करण्यात आला आहे. या अहवालाने आयफोन, मॅक किंवा आयपॅड युजर्सची चिंता वाढवली आहे. चिप्समध्ये आढळेल्या सुरक्षा त्रुटींमुळे युजर्सचा पर्सनला डेटा हॅकर्सच्या हाती लागला तर युजर्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.
Google Photos दिसणार नव्या अंदाजात! डेस्कटॉप वर्जनमध्ये आलं नवीन अपडेट, Image Flip सह करा फोटो एडीट
ॲपल चिपसेटसोबत पावर एफिशिएंसी आणि परफॉर्मेंसबाबतीत कोणीही स्पर्धा करू शकत नाही. ॲपल सेल्फ-मेड चिप्सची पावर एफिशिएंसी आणि परफॉर्मेंस अत्यंत कमाल आहे. पण आता सादर करण्यात आलेल्या एका अहवालाने सर्व आयफोन, मॅक किंवा आयपॅड युजर्सची झोप उडवली आहे. या अहवालामुळे वापरकर्त्यांची चिंता वाढली आहे. खरं तर, एका रिपोर्टनुसार, ॲपलच्या सेल्फ-मेड चिप्समध्ये दोन मोठ्या सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या त्रुटींच्या मदतीने हॅकर्स युजर्सचे ईमेल, लोकेशन आणि क्रेडिट कार्डची माहिती मिळवू शकतात. ज्यामुळे युजर्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. (फोटो सौजन्य – Pinterest)
अमेरिकेच्या जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि जर्मनीच्या रुहर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना ॲपलच्या ए- आणि एम-सिरीज चिप्समध्ये सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. कंपनी या चिप्स Macs, iPhones आणि iPads मध्ये वापरते. संशोधकांचे म्हणणे आहे की हॅकर्स आयक्लॉड कॅलेंडर, जीमेल आणि गुगल मॅप्ससारख्या ॲप्सद्वारे वापरकर्त्यांची संवेदनशील माहिती चोरू शकतात.
संशोधकाने ॲपलच्या उपकरणांची यादी देखील दिली आहे जी या त्रुटींमुळे प्रभावित होऊ शकतात. यामध्ये 2022 नंतर लाँच केलेले मॅक लॅपटॉप, 2023 नंतरचे मॅक डेस्कटॉप, 2021 नंतरचे सर्व आयपॅड प्रो, एअर आणि मिनी मॉडेल इ. या व्यतिरिक्त, सप्टेंबर 2021 नंतर रिलीज झालेल्या सर्व iPhones देखील या सुरक्षा त्रुटींमुळे प्रभावित होऊ शकतात आणि यामुळे वापरकर्त्यांचा डेटा चोरीला जाण्याची भीती आहे. याचा अर्थ या त्रुटींमुळे मोठ्या संख्येने ॲपल वापरकर्त्यांना धोका आहे.
संशोधकाने सांगितले की त्यांनी ॲपलला माहिती दिली आहे जेणेकरून या त्रुटी दूर करता येतील. कंपनीनेही याला दुजोरा दिला असून या कमतरतेमुळे वापरकर्त्यांना तात्काळ धोका नसल्याचे सांगितले आहे. कंपनीने संशोधकाला आश्वासन दिले आहे की ते लवकरच या त्रुटी दूर करेल, ज्यामुळे युजर्सना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. कंपनी लवकरात लवकर या सुरक्षा त्रुटी दूर करेल अशी आशा युजर्सनी व्यक्त केली आहे.