Black Friday Sale: Amazon वर सुरु झालाय ब्लॅक फ्रायडे सेल! ऑफर्ससह शॉपिंग करण्याची संधी
गेल्या अनेक दिवसांपासून आपण सगळे ज्याची वाट बघत होतो, तो दिवस आता अखेर आला आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर ब्लॅक फ्रायडे सेल सुरू झाला आहे. अॅमेझॉनवर हा सेल 29 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे, जो 2 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलदरम्यान ॲपल, सॅमसंग, सोनी, एलजी आणि इतर ब्रँडच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देण्यात येत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना डिस्काऊंट आणि ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अॅमेझॉनच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोनपासून होम अप्लायन्सेसपर्यंत अनेक गोष्टी ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करू शकता. अॅमेझॉन इंडियावर सुरु झालेल्या या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, फॅशन आणि इतर उत्पादनांवरही मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देण्यात येत आहे. यासोबतच अॅमेझॉनवर बँक डिस्काउंट देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे हा सेल प्रत्येकासाठीच फायद्याचा ठरणार आहे. सेलमध्ये तुम्हाला प्रत्येक वस्तू कमी किंमतीत खरेदी करण्याची संधि मिळणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
अॅमेझॉनने भारतात प्रथमच ब्लॅक फ्रायडे सेल सुरु केला आहे. ब्लॅक फ्रायडे सेल जागतिक बाजारात जोरदार लोकप्रिय आहे. एचडीएफसी, इंडसइंड, बँक ऑफ बडोदा आणि एचएसबीसी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के झटपट सूट आणि EMI सारखे फायदे देखील अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध आहेत.
यासोबतच या सेलमध्ये शॉपिंग करणाऱ्या अॅमेझॉन इंडिया प्राइम सदस्यांना अॅमेझॉन को-ब्रँडेड कार्डवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच, को-ब्रँडेड कार्डवर नॉन-प्राइम ग्राहकांना 3 टक्के कॅशबॅक ऑफर केला जात आहे. अॅमेझॉन इंडिया सोबतच, 29 नोव्हेंबरपासून फ्लिपकार्टवरही ब्लॅक फ्रायडे सेल सुरू झाला आहे. येथे देखील तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काऊंटसह शॉपिंग करण्याची संधी मिळणार आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अॅमेझॉन इंडियावर 29 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान, Samsung Galaxy Buds, Amazfit Active 42mm AMOLED, Apple MacBook Air, Samsung Galaxy S23 Ultra, Panasonic smart AC आणि इतर गॅझेट्सवर बंपर डिस्काऊंट उपलब्ध आहे.
गेल्या महिन्यात संपलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान कंपनी अनेक उत्पादनांवर डील देखील देत आहे. यासोबतच ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म साइटवर सोनी प्लेस्टेशन 5 तसेच विविध ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.
अॅमेझॉनने सांगितलं आहे की ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान, Nike, Adidas, Tommy Hilfiger, Jean-Paul, Calvin Klein सारख्या लाइफस्टाइल ब्रँड्सवरही मोठ्या प्रमाणात सूट उपलब्ध आहे. अॅमेझॉनने अद्याप या सेल दरम्यान उपलब्ध असलेल्या सर्व डील आणि ऑफर्सचा खुलासा केलेला नाही. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर हा सेल 2 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.