HMD Fusion भारतात लाँच! स्वतःच दुरुस्त करू शकाल, कमाल फिचर्स मिळणार केवळ इतक्या किमतीत
सर्व स्मार्टफोन यूजरसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांना ज्या स्मार्टफोनची प्रतीक्षा होती, तो फोन अखेर आता लाँच झाला आहे. HMD Fusion ने अखेर भारतात एंट्री केली आहे. एका युनिक फीचरसह हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन स्वत: दुरुस्त करू शकता. हा स्मार्टफोन यूनीक मॉड्यूलर स्मार्ट आउटफिटसह लाँच झाला आहे. स्मार्टफोनचं डिझाईन सर्वांना आकर्षित करत आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
स्मार्टफोनमध्ये सेल्फ रिपेरेबिलिटी फीचर देण्यात आलं आहे. जर तुमचा फोन खराब झाला असेल तर तुम्ही ते घरीच दुरुस्त करू शकता, यासाठी तुम्हाला कोणत्याही रिपेअर शॉपमध्ये जाण्याची गरज नाही. कंपनीने परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये नवीन इनोव्हेशनसह हा स्मार्टफोन लाँच केला आहे. म्हणजेच तुम्हाला अगदी कमी किंमतीत युनिक फिचर्स अनुभवायला मिळणार आहेत. 29 नोव्हेंबरपासून या स्मार्टफोनची विक्री Amazon वर लाईव्ह होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर आणखी दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. (फोटौ सौजन्य – HMD)
नवीनतम फोनमध्ये 108MP रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी, फोनमध्ये 50MP सेल्फी सेन्सर आहे. फोटोग्राफीचा अनुभव सुधारण्यासाठी, यात नाईट मोड 3.0, गेस्चर बेस्ड कंट्रोल आणि एडवांस लो-लाइट कॅपिबिलिटीज देण्यात आल्या आहेत.
फोन स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 2 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. फ्यूजन 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह स्मूथ मल्टीटास्किंग ऑफर करते. वापरकर्ते स्टोरेज वाढवू शकतात.
HMD Fusion मध्ये 33W चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000 mAh बॅटरी आहे.
यात 90Hz रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो गेमिंग आणि स्ट्रीमिंग करताना जबरदस्त व्हिज्युअल प्रदान करतो. गेमिंग आउटफिटर्स डिव्हाइसला फिजिकल बटणे आणि जॉयस्टिकसह गेमिंग कंट्रोलरमध्ये बदलतात. डिजिटल टर्बाइन आणि ऍप्टॉइड सोबतची भागीदारी समर्पित गेमिंग स्टोअर आणि स्मूथ ॲप इंस्टॉलेशनमध्ये प्रवेश प्रदान करते.
HMD Fusion 15,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे, जे त्याच्या 17,999 रुपयांच्या नियमित किमतीपेक्षा कमी आहे. त्याची विक्री Amazon आणि HMD च्या अधिकृत वेबसाइटवर 29 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. लाँच कालावधी दरम्यान हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 5,999 रुपये किमतीचे तीनही ‘स्मार्ट आउटफिट्स’ कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळतील.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
एचएमडी इंडियाचे सीईओ रवी कुंवर यांनी HMD Fusion च्या लाँच इव्हेंटमध्ये कंपनीच्या भविष्यातील व्हिजनबद्दल सांगितले. ते म्हणाले, HMD Fusion हे केवळ एक स्मार्टफोन नसून अधिकाधिक कार्यासाठी डिझाइन केलेले आहे, जे तुमच्या जीवनाशी जुळवून घेते, मग ते गेमिंग असो, कंटेट क्रिएटिंग असो किंवा दैनंदिन कामे असोत. HMD Fusion च्या मदतीने तुमचं प्रत्येक काम व्यवस्थित होईल.