Apple AirPods: गाणी ऐकण्यासोबतच आता हेल्थ अपडेटही मिळणार, Apple चं नवीन गॅझेट बरंच फायद्याचं ठरणार
टेक जायंट कंपनी अॅपल एक नवीन आणि खास गॅझेट लाँच करण्याच्या तयारीत आहे. अॅपल एक असं गॅझेट लाँच करणार आहे, जे अनेक प्रकारे फायद्याचे ठरू शकतं. खरं तरं अॅपल नवीन AirPods लाँच करण्याच्या तयारीत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की AirPods मध्ये काय खास असणार? तर अॅपलचे हे AirPods केवळ गाणी ऐकण्यासाठी नाही तर हेल्थ अपडेट देण्यासाठी देखील मदत करणार आहेत.
काय सांगता! चार्जरशिवायही होईल तुमचा फोन चार्ज, या स्मार्ट ट्रीक्स तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर
म्हणजेच तुम्हाला गाणी ऐकण्यासोबतच तुमच्या आरोग्याबाबत माहिती देखील मिळणार आहे. हे नवीन AirPods कधी लाँच होणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्याती आली नसली तरी नवीन वर्षात अॅपलचं हे युजर्ससाठी खास गिफ्ट असू शकतं. हेल्थ अपडेट देणारे AirPods लाँच होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगितलं जात आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या AirPods मध्ये केवळ हेल्थ अपडेटचं नाही तर कॅमेरा देखील असणार आहे. थोडक्यात सांगायचं तर AirPods एकचं आहेत पण त्याचे फायदे प्रचंड असणार आहेत. त्यामुळे हे AirPods युजर्ससाठी बरंच उपयोगी ठरणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
पुढील काही वर्षांमध्ये, तुम्ही फक्त गाणी ऐकण्यासाठी किंवा सिनेमा पाहण्यासाठी AirPods वापरणार नाही, तर या AirPods मध्ये कॅमेरा आणि हेल्थ सेन्सर यांसारख्या अनेक नवीन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अलीकडील अहवालात असे दिसून आले आहे की Apple AirPods मध्ये कॅमेरा आणि हार्ट रेट मॉनिटर सारखे सेन्सर स्थापित करण्याचा विचार करत आहे. या कामाचा प्राधान्य प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. यावरून असे दिसून येते की Apple याबाबत गंभीर आहे आणि AirPods पुढील काही वर्षांत केवळ गाणी ऐकण्यासाठी नाही, तर अनेक प्रकारे उपयोगी ठरणार आहे.
ॲपल याआधी वायरलेस इअरबड्समध्ये कॅमेरे बसवण्याचे काम करत होते, पण हा प्रकल्प मध्यंतरी थांबवण्यात आला होता. आता AI आल्यानंतर पुन्हा यावर काम सुरू झाले आहे. ॲपल पहिल्यांदाच असे प्रोडक्ट घेऊन येत असले तरी, हे एकमेव प्रकरण असेल असे नाही. मेटा कॅमेरासह AI असिस्टेड इयरबड्स बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. हे जनरेटिव्ह एआयने सुसज्ज असेल आणि त्यात भाषा ट्रांसलेशन आणि ऑब्जेक्ट ओळख यांसारखी वैशिष्ट्ये असतील.
या दिवशी लाँच होणार Redmi चा बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन! सोशल मिडीयावर शेअर केला टीझर
कॅमेऱ्यासोबतच, Apple एअरपॉड्सला हेल्थ सेन्सरने सुसज्ज करण्याचा विचार करत आहे. सर्व प्रथम, त्यांच्यामध्ये हार्ट रेट मॉनिटर स्थापित केला जाईल. भविष्यात, अशा प्रकारचे बायोसेन्सर त्यांच्यामध्ये देखील स्थापित केले जाऊ शकतात, जे टेंपरेचर लेवल आणि फिजिकल एक्टिविटींच्या पॅटर्नवर लक्ष ठेवतील. अनेक रिसर्च पेपरनी हे दाखवून दिले आहे की हार्ट रेटवर लक्ष ठेवण्यासाठी इयरबड हे विश्वसनीय उपकरण असू शकते. सध्या बाजारात अनेक कंपन्या हार्ट रेट मॉनिटर्स असलेले इअरबड्स विकत आहेत.
काही अहवाल सूचित करतात की Apple AirPods Pro 3 अपडेट करेल. यावर काम सुरू असून पुढील वर्षी ते सुरू होऊ शकते. या अपडेटमध्ये हार्ट रेट मॉनिटर आणला जाऊ शकतो. मात्र, कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.