BSNL धमाकेदार प्रीपेड प्लॅन, परवडणाऱ्या किंमतीत मिळणार 160 दिवसांची व्हॅलिडीटी आणि बरचं काही
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या जिओ आणि एअरटेलने त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर स्मार्टफोन युजर्स बीएसएनएलच्या प्लॅनकडे आकर्षित होण्यास सुरुवात झाली. काही दिवसांतच बीएसएनएल युजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. याचं कारण म्हणजे बीएसएनएलचे प्लॅन खूप परवडणारे आहेत आणि आता कंपनीने देशभरात अनेक ठिकाणी 4G सेवा देखील सुरू केली आहे. इतर कंपन्यांच्या वाढत्या किंमतींच्या प्लॅन्सच्या शर्यतीत बीएसएनएल अजूनही त्यांच्या युजर्ससाठी परवडणारे रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. बीएसएनएलच्या अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
बीएसएनएलच्या या प्रीपेड प्लॅनची किंमत एक हजार रुपयांपेक्षा कमी आहे. परंतु, हे दीर्घ व्हॅलिडीटी आणि दैनंदिन डेटा यासारखे अनेक उत्तम फायदे देते. आता आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या 997 रुपयांच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज अमर्यादित डेटा देखील ऑफर केला जाणार आहे. पण, 2GB दैनंदिन डेटा मर्यादेनंतर, वेग कमी होऊन 40 Kbps होतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगचाही फायदा ग्राहकांना घेता येणार आहे. लोकल आणि एसटीडी व्यतिरिक्त, मुंबई आणि दिल्लीमध्ये कॉलिंग फायदे देखील उपलब्ध आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
बीएसएनएलच्या या 997 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कमध्ये वापरण्यासाठी दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. हा प्लॅन 160 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह येतो. Hardy Games + Challenger Arena Games + GameOn आणि Astrotel + Gameium Zing Music + Wow Entertainment आणि BSNL Tunes Listen Podcast सारखे फायदे देखील या प्लॅनमध्ये देण्यात आले आहेत.
तुम्हाला दीर्घ व्हॅलिडीटीसह कॉलिंग प्लॅन पाहिजे असल्यास, बीएसएनएलचा 999 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी खूपच आश्चर्यकारक असू शकतो. कारण, यामध्ये ग्राहकांना 200 दिवसांची व्हॅलिडीटी देण्यात आली आहे. या काळात ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स दिले जातात. हे कॉल सर्व नेटवर्कसाठी आहेत.
याशिवाय, पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन (PRBT) देखील ग्राहकांना ऑफर केली जाते. तथापि, येथे कोणतेही एसएमएस किंवा डेटा लाभ दिले जात नाहीत. हा प्लॅन फक्त कॉलिंगसाठी असणार आहे. तुम्हाला केवळ तुमचे सिम सक्रीय ठेवायचे असेल तर बीएसएनएलचा हा प्लॅन खूप चांगला आणि किफायतशीर आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
लाहौल स्पिती या आदिवासी जिल्ह्याच्या पिन व्हॅलीमध्ये बीएसएनएल सेवा सुरु करण्यात आली आहे. स्पिती खोऱ्यातील अनेक भागात बीएसएनएलने टॉवर उभारले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण स्पिती खोऱ्यात बीएसएनएलची 4जी सेवाही सुरू झाली आहे. स्पिती हे दुर्गम गाव आता मोबाईल कनेक्टिव्हिटीने जोडले गेले आहे. बीएसएनएलने आता स्पिती परिसरात सुमारे 30 टॉवर स्थापित केले आहेत. त्यामुळे आता दुर्गम भागातही मोबाईल कनेक्टिव्हिटी असणार आहे.