TRAI New Rule: आजपासून लागू झाल्या ट्रॉयच्या नवीन ट्रेसबिलिटी गाइडलाइन्स! मोबाईल युजर्सवर काय परीणाम?
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या नविन ट्रेसबिलिटी गाइडलाइन्स आजपासून म्हणजेच 1 डिसेंबर 2024 पासून लागू होणार आहेत. स्पॅम मॅसेज आणि कॉल्समुळे स्मार्टफोन युजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, याच सगळ्याचा विचार करून आता ट्रायने त्यांची नवीन ट्रेसिबिलिटी गाइडलाइन्स लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश स्पॅम आणि फसवे संदेश रोखणे आणि ग्राहकांची सुरक्षा वाढवणे हा आहे. ट्रायच्या या नियमांचा मोबाईल युजर्सना फायदा होणार असला तरी त्यांची चिंता देखील काही प्रमाणात वाढणार आहे. कारण ट्रायच्या या नवीन नियमामुळे OTP (वन-टाइम पासवर्ड) मिळण्यासाठी उशीर होणार आहे, असं गेल्या अनेक दिवसांपासून सांगितलं जात आहे. ट्रायचे हे नवीन नियम महत्त्वपूर्ण संदेशांना विलंब होण्याचे कारण मानले जात आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
या ट्रेसबिलिटी गाइडलाइन्सनुसार, सर्व टेलीकॉम ऑपरेटर आणि मॅसेजिंग सर्विस प्रोवाइडर्सना प्रत्येक मॅसेजचे ओरिजिन आणि ऑथेंटिसिटी तपासावी लागणार आहे. यामध्ये ओटीपी देखील ट्रेस केला जाणार आहे. ही सर्व पावले डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी (DLT) सिस्टम अंतर्गत उचलली जात आहेत, जी स्पॅम टाळण्यासाठी आणि मॅसेज शोधण्याची क्षमता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत, व्यवसायाला टेलिकॉम ऑपरेटरकडे सेंडर आईडी (हेडर) आणि संदेश टेम्पलेट्सची नोंदणी करावी लागेल. जर एखादा संदेश रजिस्टर्ड टेम्पलेट किंवा हेडरशी जुळत नसेल, तर तो ब्लॉक किंवा फ्लॅग केला जाऊ शकतो.
TRAI ने अलीकडेच एका पोस्टमध्ये म्हटले आहे की नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे OTP संदेशांमध्ये कोणताही विलंब होणार नाही. नवीन नियमांमुळे ओटीपी वितरणात विलंब होऊ शकतो, असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता, परंतु ट्रायने हे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. त्याने सांगितलं आहे की, “ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. संदेशाच्या ट्रेसिबिलिटीसाठी कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची आम्ही खात्री देत आहोत.”
डिजिटल ट्रांजॅक्शंस, ऑथेंटिकेशन आणि सिक्योर लॉगिनसाठी OTP संदेश खूप महत्वाचे आहेत. आपण कुठेही लॉग इन करताना आपल्याला एक ओटपी दिला जातो. प्रत्येक OTP ची टाईम लिमिट वेगवेगळी असते. नवीन नियमांनुसार, सर्विस प्रोवाइडर्सना हे सुनिश्चित करावे लागेल की OTP संदेश नोंदणीकृत टेम्पलेट आणि हेडरशी सुसंगत आहेत. त्याचा प्रभाव थोडा विलंबाच्या स्वरूपात असू शकतो.
ट्रांजिशन पीरियड: DLT सिस्टममध्ये ट्रांजिशन होत असलेल्या व्यवसायांसाठी, संदेश प्रक्रियेस थोडा वेळ लागू शकतो.
वेरिफिकेशन प्रोसेस: आता प्रत्येक ओटीपीला वेरिफिकेशन प्रोसेसमधून जावे लागेल, ज्यामुळे पीक टाइममध्ये थोडा विलंब होऊ शकतो.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट ठेवा: तुमचा मोबाइल नंबर सर्व सेवांशी बरोबर जोडला गेला आहे याची खात्री करा.
ॲप-बेस्ड ऑथेंटिकेशन वापरा: जेथे शक्य असेल तेथे, OTP साठी ॲप-बेस्ड ऑथेंटिकेशनसाठी बॅकअप पर्याय ठेवा.
धीर धरा: सुरुवातीला थोडा विलंब होऊ शकतो, परंतु व्यवसाय आणि टेलीकॉम ऑपरेटर नवीन प्रणालीशी जुळवून घेत असल्याने परिस्थिती सुधारेल.
सुरुवातीला काही अडथळे येत असले तरी देखील, ही ट्राय मार्गदर्शक तत्त्वे ग्राहकांसाठी अधिक सुरक्षित संदेश प्रणाली तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही प्रणाली स्पॅम आणि फसवे संदेश रोखण्यासाठी मदत करेल. व्यवसाय आणि दूरसंचार ऑपरेटर नवीन नियमांचे पालन करत असल्याने, OTP मध्ये थोडा विलंब होऊ शकतो.