यूएस नेव्हीनंतर आता या देशांमध्येही DeepSeek AI वर बंदी; भारत सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा कायम
DeepSeek हा असा एक AI प्लॅटफॉर्म आहे, ज्याची संपूर्ण टेक जगात चर्चा आहे. DeepSeek सध्या डेटा सुरक्षा आणि चीनशी असलेल्या त्याच्या संबंधांबाबत वादात सापडले आहे. DeepSeek वर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांनंतर यूएस नेव्हीने त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यूएस नेव्हीनंतर आता इटली आणि आयर्लंडमध्ये देखील DeepSeek वर बंदी घालण्यात आली आहे. DeepSeek वर बंदी घालणारे इटली आणि आयर्लंड पहिले देश ठरले आहेत. हे ॲप आता इटली आणि आयर्लंडमधील Apple ॲप स्टोअर किंवा Google Play Store वरून डाउनलोड केले जाऊ शकत नाही.
अखेर DeepSeek वर बंदी, यूएस नेव्हीचा मोठा निर्णय! AI मॉडेलबाबत जारी केले हे कठोर नियम
DeepSeek बाबत सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपानंतर यूएस नेव्हीने चीनी AI मॉडेल DeepSeek वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यूएस नेव्हीने आपल्या सदस्यांना डीपसीकचा वापर न करण्याची सक्त ताकीद दिली आहे. यूएस नेव्हीनंतर आता इटली आणि आयर्लंड या दोन्ही देशांनी देखील DeepSeek वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. दोन्ही देशांतील नियामक DeepSeek च्या डेटा धोरणांची तपासणी करत आहेत. DeepSeek लाँच होताच त्याच्या प्रायव्हसी पॉलिसीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (फोटो सौजन्य –सोशल मीडिया)
DeepSeek ने ॲप स्टोअर आणि Google Play Store वर डाउनलोडच्या बाबतीत ChatGPT ला मागे टाकले, परंतु त्याच्या डेटा हार्वेस्टिंग धोरणांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. DeepSeek इतर अनेक चिनी ॲप्सप्रमाणे वापरकर्त्यांचा डेटा चोरतो असा आरोप केला जात आहे. IP एड्रेससह, डीपसीकद्वारे वापरकर्त्याच्या चॅट देखील गोळा केल्या जात आहेत. या कारणामुळे ॲपला चीनशिवाय इतर देशांत टिकून राहणे कठीण होऊ शकते.
रोममधील नियामकांनी कंपनीकडून वापरकर्त्याचा डेटा कसा हाताळला जातो याबद्दल उत्तरे मागितली आहेत. इटालियन डेटा रेग्युलेटरचे प्रमुख पास्क्वाले स्टॅन्झिओन यांनी इटालियन न्यूज एजन्सी एएनएसएला सांगितले की, “ॲप EU डेटा संरक्षण नियमांचे किती चांगले पालन करते हे पाहण्यासाठी आम्ही तपासणी सुरू करण्याची योजना आखत आहोत.” अहवालानुसार, डब्लिनमधील आयरिश डेटा प्रोटेक्शन कमिशनच्या प्रवक्त्याने आयर्लंडमधील डेटा विषयांच्या संदर्भात केलेल्या डेटा प्रक्रियेबद्दल माहिती मागण्यासाठी डीपसीकला पत्र लिहिले आहे.
भारत सरकार DeepSeek प्लॅटफॉर्मच्या संभाव्य धोक्यांकडे विशेष लक्ष देत आहे, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि वापरकर्त्याची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. DeepSeek चे गोपनीयता धोरण हे उघड करते की ते वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा, वैयक्तिक माहिती आणि अपलोड केलेल्या फाइल्ससह, चीनमधील सर्व्हरवर स्टोअर करते. त्यामुळे सरकार आणि सायबर सुरक्षा तज्ञांची चिंता वाढली आहे.
Alibaba ने लाँच केलं नवीन AI मॉडेल, DeepSeek V3 पेक्षा किती प्रगत? कंपनीचा परफॉर्मेंसबाबत मोठा दावा
भारताने यापूर्वीच चिनी ॲप्स आणि कंपन्यांवर कडक कारवाई केली आहे. TikTok आणि PUBG वर समान सुरक्षा चिंतेमुळे बंदी घालण्यात आली होती, तर Huawei आणि ZTE सारख्या चीनी कंपन्यांना दूरसंचार पायाभूत सुविधा प्रकल्पांपासून दूर ठेवण्यात आले होते. तज्ज्ञांचे मत आहे की, DeepSeek चाही राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे मानले जात असेल, तर त्यालाही बंदीला सामोरे जावे लागू शकते.