Alibaba ने लाँच केलं नवीन AI मॉडेल, DeepSeek V3 पेक्षा किती प्रगत? कंपनीचा परफॉर्मेंसबाबत मोठा दावा
सध्या सर्वत्र चिनी AI मॉडेल DeepSeek ची चर्चा सुरु आहे. DeepSeek ने इतर चॅटबोट्सना मागे टाकत यशाचा नवीन टप्पा गाठला आहे. जगातील टॉप AI कंपन्यांना DeepSeek टक्कर देत आहे. त्यामुळे अनेकांनी DeepSeek चं कौतुक केलं आहे, तर अनेकांनी DeepSeek वर आरोप केले आहेत. DeepSeek बाबत अनेक दावे प्रतिदावे सुरु असतानाच आता एक नवीन AI मॉडेल लाँच करण्यात आला आहे. चीनी टेक कंपनी Alibaba 9988.HK ने बुधवारी त्यांच्या Qwen 2.5 AI मॉडेलचे नवीन वर्जन लाँच केले आहे. त्यामुळे आता इतर कंपन्यांना टक्कर देत असताना DeepSeek ला Qwen 2.5 AI चा देखील सामना करावा लागणार आहे.
DeepSeek नंतर आता Kimi ची एंट्री, चिनी कंपनीच्या AI मॉडेल्सची जगभरात चर्चा! हे चॅटबोट पडले मागे
चीनी टेक कंपनी Alibaba 9988.HK ने दावा केला आहे की ते लोकप्रिय DeepSeek-V3 पेक्षा चांगले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेकडून ही माहिती मिळाली आहे. Qwen 2.5-Max च्या रिलीज करण्याची वेळ काहीशी असामान्य आहे कारण काल लूनर न्यू ईयर पहिला दिवस होती आणि ही अशी वेळ आहे जेव्हा अनेक चीनी नागरिक सुट्टी घेतात आणि मित्र आणि नातेवाईकांसोबत असतात. मात्र अशावेळी Qwen 2.5-Max चे नवीन वर्जन लाँच करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य –सोशल मीडिया)
चायनीज AI स्टार्टअप DeepSeek च्या अचानक वाढीमुळे दबाव निर्माण झाला आहे आणि याच दबावात Qwen 2.5-Max चे नवीन वर्जन लाँच करण्यात आलं. डीपसीकने केवळ परदेशीच नव्हे तर देशांतर्गत स्पर्धकांवरही दबाव वाढवला आहे.”Qwen 2.5-Max ने GPT-4o, DeepSeek-V3 आणि Llama-3.1-405B जवळजवळ सर्वांना क्षेत्रांमध्ये मागे टाकले आहे,” अलीबाबाच्या क्लाउड युनिटने त्यांच्या अधिकृत WeChat अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे. ही पोस्ट OpenAI आणि Meta च्या सर्वात प्रगत ओपन-सोर्स AI मॉडेल्सची चर्चा करते.
10 जानेवारी रोजी, DeepSeek-V3 मॉडेलद्वारे समर्थित, DeepSeek चा AI सहाय्यक आला. त्यानंतर 20 जानेवारीला त्याचे R1 मॉडेल रिलीज झाले. यामुळे सिलिकॉन व्हॅलीला धक्का बसला आहे आणि टेक स्टॉक्समध्येही घसरण झाली आहे. चीनी स्टार्टअप्सच्या कमी विकास आणि वापर खर्चामुळे गुंतवणूकदारांनी युनायटेड स्टेट्समधील आघाडीच्या AI कंपन्यांच्या मोठ्या खर्चाच्या योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डीपसीकच्या परदेशातील यशामुळे त्यांच्या देशांतर्गत स्पर्धकांमध्ये त्यांचे स्वतःचे AI मॉडेल्स अपग्रेड करण्याची शर्यत निर्माण झाली आहे.
DeepSeek च्या V3 मॉडेलची जुनी आवृत्ती DeepSeek-V2 गेल्या मे महिन्यात लाँच झाल्यापासून चीनमध्ये प्राइस वॉरला सुरुवात झाली आहे. DeepSeek-V2 हे ओपन सोर्स आणि स्वस्त होते. प्रत्येक 1 दशलक्ष टोकनसाठी फक्त 1 युआन ($0.14) आकारले जात होते. यामुळे, अलीबाबाच्या क्लाउड युनिटने अनेक मॉडेल्सच्या किंमतींमध्ये 97 टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली.
DeepSeek AI चा भारताला धोका? सरकारने सर्व काही केले स्पष्ट, जाणून घ्या सविस्तर
Baidu 9888.HK सह इतर चिनी टेक कंपन्यांनी त्याचे अनुसरण केले. कंपनीने मार्च 2023 मध्ये चीनचे पहिले ChatGPT-सारखे AI मॉडेल जारी केले. देशातील सर्वात वॅल्यूबल इंटरनेट कंपनी Tencent 0700.HK देखील या यादीत समाविष्ट आहे. सध्या, Baidu चे Ernie Bot 4.0, ByteDance चे Doubao 1.5 Pro आणि Moonshot AI चे Kimi k1.5 सारखे AI मॉडेल्स चीनमध्ये उपलब्ध आहेत.