Android युजर्स आत्ताच करा हे काम, नाहीतर हॅकर्सच्या हाती जाईल फोनचा कंट्रोल; Google ने जारी केला Alert
टेक जायंट कंपनी असलेल्या गूगलने अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्ससाठी जानेवारी 2025 साठी सुरक्षा अपडेट जारी केले आहे. या अपडेटसह गुगलने युजर्सना अलर्ट केले आहे की जर तुम्ही अँड्रॉईड फोन वापरत असाल तर लवकरात लवकर हे अपडेट तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल करणं गरजेचं आहे. या अपडेटमध्ये अनेक त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तुमचा फोन हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यात मदत होईल. त्यामुळे तुम्हाला तुमचा स्मार्टफोन हॅकर्सपासून सुरक्षित ठेवायचा असेल, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये गूगलने जानेवारी 2025 साठी जारी केलेले सुरक्षा अपडेट इंस्टॉल करणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या स्मार्टफोनचा कंट्रोल हॅकर्सकडे जाऊ शकतो.
गूगलने जारी केलेले सुरक्षा अपडेट दोन भागांमध्ये विभागले गेले आहे. ज्यामध्ये 2025-01-01 आणि 2025-01-05 सुरक्षा पॅच स्तर यांचा समावेश आहे. 2025-01-01 पॅच स्तरामध्ये, अँड्रॉईड सिस्टम आणि फ्रेमवर्कमधील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. तर 2025-01-05 पॅच स्तरामध्ये, हार्डवेअर संबंधित त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये चिपसेटमधील उपस्थित त्रुटींचा देखील समावेश आहे. गूगलने म्हटले आहे की एकूण 50 पेक्षा जास्त सुरक्षा त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. यातील काही त्रुटी अँड्रॉईड 12, 13, 14 आणि 15 च्या सर्व आवृत्त्यांवर परिणाम करतात. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगलच्या म्हणण्यानुसार, अपडेटमध्ये असलेल्या काही गंभीर त्रुटीही दूर करण्यात आल्या आहेत, ज्याद्वारे हॅकर्स तुमचा फोन रिमोट पद्धतीने नियंत्रित करू शकतात. या कमतरतांचा फायदा घेऊन हॅकर्स फोनमध्ये मालवेअर टाकू शकतात, त्यानंतर तुमचा फोन हॅकर्सच्या ताब्यात जाईल. अँड्रॉईडने सुरक्षा अपडेटमध्ये पाच गंभीर त्रुटी शोधल्या आहेत, ज्याचे लेबल खालीलप्रमाणे आहे:
अँड्रॉईडने सुरक्षा अपडेटमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्यात आल्या असून आता गूगलने देखील अँड्रॉईड युजर्ससाठी सुरक्षा अपडेट जारी केले आहेत. त्यामुळे आता अँड्रॉईड युजर्सची सुरक्षा बरीच वाढत आहे. मात्र तरी देखील हॅकर्सपासून सुरक्षित राहण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या स्मार्टफोनचा कंट्रोल हॅकर्सकडे जाऊ शकतो.
गूगलने अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्ससाठी जानेवारी 2025 साठी जारी केलेले सुरक्षा अपडेट तुम्हाला तुमच्या फोनमध्ये इंस्टॉल करण्यासाठी काही महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. ज्यामुळे तुम्ही अगदी काही क्षणात हे लेटेस्ट अँड्रॉईड स्मार्टफोन सुरक्षा अपडेट तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल करू शकाल.
POCO X7 Pro Iron Man लिमिटेड एडिशन लाँच, कमालीचे डिझाईन आणि युनिक फीचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत