Google Map Update: गुगल मॅपचे हे 12 सीक्रेट फीचर्स तुमच्यासाठी ठरतील वरदान!
आपल्या प्रत्येक प्रवासात गुगल मॅप आपल्याला मदत करते. गुगल मॅपने त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स रोल आऊट केले आहेत. काही फीचर्स युजर्ससाठी मजेशीर आणि फायद्याचे ठरत आहेत. तर असे देखील काही फीचर्स आहेत ज्यामुळे युजर्स नाराज झाले आहेत. पण आता आम्ही तुम्हाला गुगल मॅपच्या अशा काही फीचर्सबद्दल सांगणार आहोत, जे युजर्ससाठी वरदान ठरू शकतात. गुगल मॅपच्या या फीचर्समुळे युजर्सचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. चला तर जगातील लोकप्रिय नेव्हिगेशन ॲप असलेल्या गुगल मॅपच्या 12 सीक्रेट फीचर्सबद्दल जाणून घेऊया.
काळ सत्य उघड! iPhone चोरीला गेल्यानंतर त्याचं नक्की काय होतं? A टू Z माहिती जाणून घ्या
गुगल मॅपमधील लाइव व्यू फीचर कॅमेऱ्याच्या मदतीने तुमच्या सभोवतालचा परिसर स्कॅन करते आणि तुम्हाला रिअल-टाइममध्ये जवळपासच्या ठिकाणांची माहिती देते. गुगल मॅप ओपन करताच शीर्षस्थानी असलेल्या कॅमेरा आयकॉनवर टॅप केल्यानंतर तात्काळ लाइव व्यू फीचर सुरु होईल. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगल मॅपमधील द पिन मॅन हे एक मजेदार फीचर आहे. हे फीचर स्ट्रीट व्यूमध्ये वापरलं जातं. तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, तर प्रवासापूर्वी तुम्ही येलो पॅग मॅनला त्या ठिकाणी पाठवू शकता.
गुगल मॅपमध्ये तुम्ही 360 डिग्री व्हिडिओ अपलोड करू शकता आणि इतरांनी अपलोड केलेले व्हिडीओ पाहू शकता.
गूगल मॅप वॉयस गाइडंसला अधिक चांगला बनवण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा स्मार्टफोनमध्ये दाखवलेले नेव्हिगेशन पाहण्यासाठी आपल्याला त्रास होत असेल तर अशावेळी आपण वॉयस गाइडंसची मदत घेऊ शकतो.
गुगल मॅपमधील कन्वर्सेशनल सर्च तुमच्यासोबत एखाद्या माणसाप्रमाणे संवाद साधू शकतो. हे फीचर AI आधारित आहे. तुम्ही गुगल मॅपवर नवीन ठिकाणं शोधत असाल तर अशावेळी कन्वर्सेशनल सर्च फीचर तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
गुगल मॅपमध्ये AI आधारित फीचर्स अपग्रेड केले जात आहेत. यामध्ये एआय अपडेट्स आणि नो-कोड टूल्स यांचा समावेश आहे.
गुगल मॅप तुम्हाला अगदी सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देत आहे. एखाद्या ठिकाणी प्रवास करण्यापूर्वी ते ठिकाण दिव्यांग लोकांसाठी कंफर्टेबल आहे की नाही, याबाबत देखील तुम्ही माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला गुगल मॅपवरील व्हील चेयर आयकॉनवर टॅप करावं लागणार आहे.
3डी इमर्सिव व्यू फीचर एखाद्या ठिकाणाचे 3D मॉडेल पाहण्याची परवानगी देते. याच्या मदतीने तुम्हाला कोणत्याही ठिकाणाची सविस्तर माहिती मिळते.
लेन्स इन मॅप्स फीचरमध्ये AI चा वापर केला जातो. हे फीचर तुम्हाला तुमचा कॅमेरा वापरून कोणत्याही ठिकाणाची किंवा वस्तूची माहिती देते.
तुम्ही अशी ठिकाणं शोधत असाल जिथे तुम्हाला गाडी चालवण्याची गरज नाही. तर तुम्ही डू नॉट ड्राइव फीचरचा वापर करू शकता. डू नॉट ड्राइवच्या मदतीने तुम्ही राइड-शेअरिंगद्वारे तुमच्या लोकेशनपर्यंत पोहोचू शकता.
लाँच झाली अनोखी पॉवर बँक, फक्त फोनच नाही तर लॅपटॉपही करणार चार्ज; किंमत केवळ इतकी
गुगल मॅपमधील एआय पावर्ड सर्च विथ फोटोज तुम्हाला फोटोंच्या मदतीने कोणतेही ठिकाण शोधण्याची परवानगी देतात.
गुगल मॅप तुम्हाला फ्लाइट प्राइस शोधण्यासाठी देखील मदत करतो. ज्यामुळे तुमच्या पिकनीकचे प्लॅनिंग अधिक सोपं होतं.