Google Photos दिसणार नव्या अंदाजात! डेस्कटॉप वर्जनमध्ये आलं नवीन अपडेट, Image Flip सह करा फोटो एडीट
Google ने त्यांच्या Photos ॲपमध्ये एक नवीन फीचर जोडलं आहे. हे नवीन फीचर इमेज फ्लिप या नावाने अॅड करण्यात आलं आहे. शिवाय कंपनीने त्यांच्या आधीच्या फीचरचे काही अपडेट देखील शेअर केले आहेत. त्यामुळे आता युजर्सना गुगल फोटो वापरताना एक वेगळा अनुभव मिळणार आहे. Google Photos ॲपमध्ये इमेज फ्लिप नावाचे नवीन फीचर अॅड करण्यात आलं असून याचा युजर्सना प्रचंड फायदा होणार आहे.
यूएस नेव्हीनंतर आता या देशांमध्येही DeepSeek AI वर बंदी; भारत सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा कायम
अनेक युजर्स असे आहेत जे थर्ड पार्टी अॅपच्या मदतीने त्यांचे फोटो मिरर करतात. पण आता अॅड करण्यात आलेल्या नवीन फीचरमुळे युजर्सा फोटो मिरर करण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी अॅपची गरज नाही. युजर्स इमेज फ्लिपच्या मदतीने आता कोणत्याही थर्ड पार्टी ॲपच्या मदतीशिवाय त्यांचे फोटो मिरर करू शकतात. हे वैशिष्ट्य विशेषतः समोरच्या कॅमेऱ्याने घेतलेल्या सेल्फीसाठी उपयुक्त ठरेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
जेव्हा आपण फ्रंट कॅमेरा वापरून सेल्फी किंवा एखादा फोटो क्लिक करतो तेव्हा त्यामध्ये मजकूर अनेकदा उलटा दिसतो. हाच मजकूर व्यवस्थित दिसावा यासाठी आपण थर्ड पार्टी अॅपचा वापर करतो. पण आता फोटो मिररसाठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅपची गरज भासणार नाही. तुम्ही ईमेज फ्लिपच्या मदतीने गुगल फोटोमध्येच फोटो मिरर करू शकता. याशिवाय, Google Photos च्या डेस्कटॉप वर्जनसाठी हळूहळू डार्क मोड देखील जारी जात आहे. त्यामुळे युजर्सची मजा आणखी वाढणार आहे.
Google ने आपल्या सपोर्ट पेजवर माहिती दिली आहे की, Google Photos ॲपमध्ये इमेज मिररिंगचा पर्याय आता उपलब्ध आहे. हे फीचर सध्या फक्त अँड्रॉइड यूजर्ससाठी रिलीझ करण्यात आले आहे. आता वापरकर्ते इन-बिल्ट एडिटरच्या मदतीने त्यांच्या ईमेज थेट ॲपमध्ये फ्लिप करू शकतात, जेणेकरून त्यांना कोणत्याही वेगळ्या फोटो एडिटर ॲपची गरज भासणार नाही.
या फीचरची माहिती सर्वप्रथम टेक एक्सपर्ट मिशाल रहमान यांनी सप्टेंबरमध्ये दिली होती, पण त्यावेळी ते काही यूजर्ससाठीच उपलब्ध होते. आता हे अपडेट सर्व अँड्रॉईड युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. हे फीचर आयफोन युजर्ससाठी कधी उपलब्ध होणार, याबबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
Google Photos च्या डेस्कटॉप आवृत्तीमध्ये डार्क मोड देखील आणला जात आहे. 9to5Google ने अहवाल दिला की डेस्कटॉप ॲपच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात एक बॅनर दिसत आहे, ज्यावर लिहिले आहे – “डार्क मोड आला आहे! तुम्ही आता फोटोवर डार्क थीम लागू करू शकता.”
वापरकर्ते Google Photos सेटिंग्जमध्ये जाऊ शकतात आणि लाइट, डार्क किंवा Use device default थीम यापैकी एक निवडू शकतात. तथापि, हे वैशिष्ट्य हळूहळू आणले जात आहे, आणि अद्याप सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. Google Photos चे इमेज मिररिंग फीचर विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल ज्यांना सेल्फी घेताना उलटा मजकूर दुरुस्त करायचा आहे. त्याच वेळी, डेस्कटॉपवरील डार्क मोड फीचर कमी प्रकाशात काम करणाऱ्या वापरकर्त्यांना आवडेल.