हॅकर्सच्या निशाण्यावर Amazon Prime मेंबर्स! कंपनीने जारी केली वॉर्निंग, अशा प्रकारे स्वत:ला ठेवा सुरक्षित
तुम्ही देखील ॲमेझॉन प्राइम मेंबर आहात का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ॲमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी वॉर्निंग जारी करण्यात आली आहे. हॅकर्स ॲमेझॉन प्राइम मेंबर्सना निशाणा बनवत आहेत. त्यामुळे तुमच्याकडे ॲमेझॉन प्राइम मेंबरशिप असेल तर तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. कंपनीने यासंबंधित काही अपडेट शेअर करत युजर्स स्वत: ला कशा प्रकारे सुरक्षित ठेऊ शकतात, याबद्दल माहिती दिली आहे.
‘BSNL’ च्या या मॅसेजना युजर्सचा संताप, कंपनी ‘हे’ 3 स्वस्त प्लॅन बंद करण्याच्या तयारीत
कंपनीने सांगितलं आहे की, एक हॅकर्स ग्रुप ॲमेझॉन प्राइम मेंबरना टार्गेट करत आहे. तो केवळ वापरकर्त्यांची संवेदनशील माहिती चोरण्याचा प्रयत्न करत नाही तर क्रेडिट कार्ड डेटावरही त्याची नजर आहे. एकदा ही माहिती हॅकर्सच्या हाती लागली की, मोठे नुकसान होण्याचा धोका असतो. जर एखाद्या युजरची माहिती हॅकरच्या हाती लागली तर त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन बँक खातं रिकामं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युजर्सनी स्वत:ला सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सायबर सिक्योरिटी प्रोटेक्शनसाठी काम करणाऱ्या पालो अल्टोच्या युनिट 42 रिसर्च डिवीजनने या हॅकिंग प्रकरणाची पुष्टी केली आहे. प्राइम मेंबरशिप संपण्याची भीती दाखवून हॅकर्स ॲमेझॉन युजर्सना टार्गेट करत असल्याचं या विभागाने म्हटलं आहे. ॲमेझॉनचे प्रतिनिधी म्हणून हॅकर्स वापरकर्त्याला पीडीएफ डॉक्युमेंट पाठवत आहेत. या पीडीएफ डॉक्युमेंटमध्ये वापरकर्त्यांना अकाऊंट डेटा आणि क्रेडिट कार्ड तपशील भरण्यास सांगितलं जातं.
युजर्सनी त्यांचा संपूर्ण डेटा फॉर्म भरल्यानंतर कंपनीकडे जाण्याऐवजी हा डेटा हॅकर्सच्या हातात जातो. वास्तविक हा फिशिंग हल्ला असल्याचं रिसर्च डिवीजनने सांगितलं आहे. या हॅकर्सनी Amazon सारखी दिसणारी 1,000 हून अधिक डोमेन नावे नोंदवली आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांना अडकवणे सोपे होते. हॅकर्सनी पाठवलेला फॉर्म भरून युजर्सनी तो सबमिट केला की त्यांची संपूर्ण माहिती हॅकर्सच्या हाती लागते. आणि काही काळातच संपूर्ण बँक अकाऊंट रिकामं होतं.
तुमच्या iPhone मध्ये आधीच TikTok इंस्टॉल आहे? थांबा डिलीट करू नका, मिळवा लाखो रुपये कमवण्याची संधी
सध्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. हॅकर्स आणि सायबर फसवणूक करणारे वेगवेगळ्या प्रकारे लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करतात. असे हल्ले टाळण्यासाठी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही संशयित किंवा अनोळखी व्यक्तीकडून मिळालेली कोणतीही लिंक, मेसेज, ईमेल किंवा डॉक्युमेंट ओपन करू नका. जर कोणी अज्ञात व्यक्ती तुम्हाला OTP, खाते तपशील किंवा इतर संवेदनशील माहिती विचारत असेल, तर ही माहिती त्याच्यासोबत शेअर करू नका. याशिवाय सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या आकर्षक जाहिराती आणि ऑफर्सपासूनही दूर राहा. तुमची एक चूक तुमचं बँक अकाऊंट रिकामं करू शकते. कोणतेही आर्थिक व्यवहार करताना योग काळजी घ्या, कारण तुमची सुरक्षा तुमच्या हातात आहे.