जाहिरातीवीना व्हिडीओ पाहण्याची मजा येणार! फ्रीमध्ये मिळणार YouTube प्रीमियम सब्सक्रिप्शन, काय आहे Jio ची ऑफर?
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या युट्यूबचा वापर तर प्रत्येकजण करतो. पण युट्यूबवर व्हिडीओ बघताना सर्वात मोठी समस्या म्हणजे जाहिरीत. जाहिरातीशिवाय व्हिडीओ पाहण्याची मजा घ्यायची असेल तर तुम्हाला युट्यूब सबस्क्रिप्शन खरेदी करावे लागेल. पण प्रचंड किंमतीमुळे लोकं युट्यूब सबस्क्रिप्शन खरेदी करणं टाळतात. पण आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही फ्रीमध्ये युट्यूब प्रीमियम सब्सक्रिप्शनचा आनंद घेऊ शकता. ही खास ऑफर जिओने त्यांच्या युजर्ससाठी आणली आहे.
रिलायन्स जिओने पुन्हा एकदा त्यांच्या युजर्ससाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. कंपनी JioFiber आणि AirFiber पोस्टपेड प्लॅनसह 2 वर्षांसाठी युट्यूब प्रीमियम सब्सक्रिप्शन सेवा पूर्णपणे मोफत देत आहे. यासह, AirFiber आणि JioFiber वापरकर्ते कोणत्याही जाहिराती किंवा इतर व्यत्ययाशिवाय 2 वर्षांसाठी युट्यूबच्या प्रीमियम सब्सक्रिप्शनचा आनंद घेऊ शकतील. या सेवेमध्ये, व्हिडिओच्या सुरुवातीला 10-20 सेकंदाच्या जाहिराती देखील दिसत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जाहिरातींशिवाय व्हिडीओ पाहण्याची मजा घेता येणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
युट्यूब प्रीमियम सब्सक्रिप्शन फक्त JioFiber आणि AirFiber च्या निवडक योजनांवर मोफत उपलब्ध आहे. 888, 1199, 1499, 2499 आणि 3499 रुपयांच्या प्लॅनवर यूजर्स ही सेवा मोफत मिळवू शकतात. तुम्ही JioFiber आणि AirFiber युजर असाल आणि तुम्हाला देखील मोफत युट्यूब प्रीमियम सब्सक्रिप्शनचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला वर दिलेले प्लॅन खरेदी करावे लागणार आहेत.
जाहिरात-मुक्त व्हिडिओंसोबत, युट्यूब प्रीमियम सब्सक्रिप्शनमध्ये बॅकग्राउंड प्ले आणि अमर्यादित डाउनलोड सारखे फायदे देखील उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात युट्यूब प्रीमियम सब्सक्रिप्शनची मासिक सदस्यता विद्यार्थ्यांसाठी 89 रुपये आणि इतर व्यक्तींसाठी 149 रुपये आहे. फॅमिली प्लॅनसाठी दरमहा 299 रुपये भरावे लागतात. मात्र जिओ त्यांच्या युजर्सनी ही सेवा मोफत ऑफर करत आहे.
सरकारी दूरसंचार कंपनी BSNL आपल्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि विनामूल्य OTT सदस्यता देखील प्रदान करते. BSNL च्या सुपरस्टार प्रीमियम प्लस प्लॅनमध्ये, ग्राहकांना 150Mbps स्पीडसह दरमहा 2,000GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग सारखे फायदे देण्यात आले आहेत. याशिवाय, कंपनी डिस्ने हॉटस्टार, शेमारू, हंगामा, Zee5 आणि सोनी लाइव्ह सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे विनामूल्य सदस्यता देखील ऑफर करत आहे.
Jio आणि BSNL प्रमाणे, Airtel देखील आपल्या फायबर वापरकर्त्यांसाठी उत्तम योजना ऑफर करते. कंपनी दरमहा 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 200 Mbps च्या स्पीडने इंटरनेट पुरवते. याशिवाय वापरकर्त्यांना प्राइम व्हिडिओ, डिस्ने हॉटस्टारसह 20 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.