रबर की डिस्प्ले? LG ची कमाल! लाँच केला जगातील पहिला स्ट्रेचेबल डिस्प्ले
फोल्डेबल डिस्प्लेचा ट्रेंड फार वाढला आहे. डबल आणि ट्राय फोल्ड स्मार्टफोननंतर आता चक्क स्ट्रेचेबल डिस्प्ले लाँच करण्यात आला आहे. टेक कंपनी LG ने ही कमाल केली आहे. LG ने जगातील पहिला स्ट्रेचेबल डिस्प्ले लाँच केला आहे. हा डिस्प्ले तुम्ही एखाद्या रबरप्रमाणे स्ट्रेच करू शकता. मात्र तरी देखील यातील पिक्चर क्वॉलिटी खराब होणार नाही. फोल्डेबल डिस्प्ले हे सध्या नवीनतम आणि सर्वात प्रगत डिस्प्ले तंत्रज्ञान आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही LG ने लाँच केलेला स्ट्रेचेबल डिस्प्ले एकदा बघाच.
हेदेखील वाचा- Jio, Airtel आणि VI च टेन्शन वाढलं! स्टारलिंकची लाँचिंग डेट जवळ; सॅटेलाइट इंटरनेट कधी उपलब्ध होणार?
LG ने लाँच केलेला हा डिस्प्ले त्याच्या आकाराच्या 50% स्ट्रेच करू शकतो. कंपनीने लाँच केलेला हा डिस्प्ले 12-इंचाच्या आकारात येतो आणि तो 18-इंचापर्यंत स्ट्रेच करता येतो. सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की 18-इंचापर्यंत स्ट्रेच केल्यानंतरही, डिस्प्ले 100 पिक्सेल प्रति इंचाचं हाय रिझोल्यूशन आणि पूर्ण RGB कलर मेंटेन करण्यास सक्षम असणार आहे. स्ट्रेच केल्यानंतर देखील डिस्प्लेवरील ईमेज क्वालिटी खराब होणार नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, डिस्प्ले 18-इंचापर्यंत स्ट्रेच केल्यानंतर रिलीझ केले गेले तर, डिस्प्ले कोणत्याही नुकसानाशिवाय त्याच्या मूळ आकारात परत येतो. (फोटो सौजन्य – X)
टेक कंपनी LG ने दावा केला आहे की, हा स्ट्रेचेबल डिस्प्ले इमेज क्वालिटी खराब न करता त्याच्या आकाराच्या 50 टक्केपर्यंत स्ट्रेच करता येतो. स्ट्रेचेबल डिस्प्लेचा प्रोटोटाइप सादर करताना, कंपनीने सांगितले आहे की हा 12-इंचाचा डिस्प्ले आहे, जो 18 इंचापर्यंत स्ट्रेच केला जाऊ शकतो. हा स्ट्रेचेबल डिस्प्ले 100 पिक्सेल प्रति इंच रेझोल्यूशन राखू शकतो. याआधी कंपनीने 2022 मध्ये स्ट्रेचेबल डिस्प्लेपैकी एक प्रोटोटाइप प्रदर्शित केला होता.
हेदेखील वाचा- सरकारचा सर्वात मोठा Digital Strike! 1.77 कोटी सिम कार्ड ब्लॉक, जाणून घ्या का घेतला हा निर्णय
कंपनीच्या मते, हा स्ट्रेचेबल डिस्प्ले पूर्णपणे अनोखा आहे. याला अल्टिमेट डिस्प्ले तंत्रज्ञान म्हणता येईल. इतर स्ट्रेचेबल डिस्प्लेप्रमाणे, ते फक्त वाकत नाही किंवा दुमडत नाही तर ते टॉवेलसारखे ताणू शकते. एलजीचा हा स्ट्रेचेबल डिस्प्ले मायक्रो एलईडीने बनलेला आहे. हे सतत 10 हजार वेळा ताणले जाऊ शकते. हा डिस्प्ले एक्सट्रीम तापमानातही काम करतो असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने या डिस्प्लेच्या फीचर्सबद्दलही सांगितले आहे.
हा डिस्प्ले टच जेस्चरने नियंत्रित केला जाऊ शकतो. हा डिस्प्ले अतिशय स्वस्त आणि हलका आहे. आगामी काळात, एलजीचा स्ट्रेचेबल डिस्प्ले अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा वियरेबल डिव्हाइसमध्ये वापरला जाऊ शकतो. डिस्प्लेला रबरासारखे स्ट्रेच करून मोठे करणं ही एक अनोखी प्रगती आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ऑटोमोबाईल आणि एव्हिएशन इंडस्ट्रीमध्येही स्ट्रेचेबल डिस्प्लेचा वापर केला जाऊ शकतो. हा डिस्प्ले एका विशेष सिलिकॉन सब्सट्रेटवर तयार केला आहे जो कॉन्टॅक्ट लेन्ससाठी देखील वापरला जातो.