
Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट
जर तुम्हाला एयरटेल प्रीपेड आणि पोस्टपेड नंबरबाबत कोणती चौकशी किंवा विनंती करायची असेल तर तुम्ही टोल फ्री नंबर 121 वर कॉल करू शकता. तक्रार करण्यासाठी 198 टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता. हे नंबर प्रत्येक 3 मिनिटांसाठी 50 पैसे प्रति मिनिट चार्जेस आकारतात. जेव्हा तुम्ही एअरटेल सल्लागाराशी बोलत असाल केवळ त्याचवेळी चार्ज आकारला जातो. अन्यथा टोल फ्री नंबरवर सामान्य संभाषणांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
एयरटेल ब्रॉडबँड कस्टमर त्यांच्या लँडलाइन नंबरवरून 121 कस्टमर केयर नंबरवर कॉल करू शकतात. याशिवाय एयरटेल ब्रॉडबँडचा 24*7 कस्टमर केयर सपोर्ट नंबर 9810012345 आहे. या नंबरवर ग्राहक समस्या सोडवण्यासाठी 365 दिवस आणि 24 तास संपर्क साधू शकता आणि त्यांच्या समस्या सांगू शकतात. विद्यमान ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून कॉल करणे आणि त्यांचा लँडलाइन नंबर किंवा एअरटेल रिलेशनशिप नंबर तयार ठेवणे आवश्यक आहे.
एयरटेल यूजर्स DTH साठी 121 वर कॉल करू शकतात आणि एअरटेल यूजर्स नसलेले ग्राहक 1800-103-6065 वर कॉल करून त्यांच्या समस्या सांगू शकतात.
कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी एयरटेल सब्सक्राइबर्स 400 नंबरवर कॉल करू शकतात आणि इतरांसाठी कॉलिंग नंबर 8800688006 आहे. फोन किंवा एयरटेल सिम हरवल्यास किंवा चोरी झाल्यास जर तुम्हाला तुमचा नंबर ब्लॉक करायचा असेल तर तुम्ही 9849098490 किंवा 18001034444 नंबरवर कॉल करू शकता आणि हरवलेला किंवा चोरी झालेला नंबर ब्लॉक करण्याची विनंत करू शकता.