
Instagram Data Leak Alert: कोट्यवधी अकाउंट्सचा डेटा लीक! तुम्हालाही पासवर्ड रीसेटचा मेसेज आलाय? थांबा, ही चूक करू नका
जर तुम्हाला देखील तुमच्या मागणीशिवाय इंस्टाग्रामचा पासवर्ड रिसेट करण्यासाठी ईमेल आणि नोटिफिकेशन्स आल्या असतील, तर सावध राहा. सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण थेट अकाऊंट हॅकिंगसंबंधित आहे. हॅकर्स यूजर्सची दिशाभूल करून त्यांच्या अकाऊंटवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणांमध्ये पाठवले जाणारे ईमेल आणि नोटिफिकेशन्स अगदी खऱ्याप्रमाणे वाटतात. याशिवाय हे ईमेल आणि नोटिफिकेशन्स इंस्टाग्रामच्या ऑफिशियल ID वरून पाठवले जात असल्याचा दावा केला जात आहे. ज्यामुळे यूजर्स अगदी सहज यावर विश्वास ठेऊ शकतील आणि हॅकर्सच्या जाळ्यात अडकू शकतील. (फोटो सौजन्य – Pinterest)
मीडिया रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, BreachForums नावाच्या एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर 17.5 मिलियन इंस्टाग्राम अकाऊंटचा डेटा उपलब्ध आहे. यासंबंधित हॅकर्सने एक नवा डाव टाकला आहे, ज्याला पासवर्ड रीसेट अटॅक असं म्हटलं जात आहे. यामध्ये हॅकर्स थेट तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत. तर कथित ऑफिशियल इंस्टाग्राम ID वरून यूजर्सना पासवर्ड रीसेट रिक्वेस्ट पाठवली जाते. जेव्हा यूजर्सना पासवर्ड रीसेट रिक्वेस्टसंबंधित ईमेल आणि नोटिफिकेशन्स मिळतो, तेव्हा काहींना वाटते हा मेसेज इंस्टाग्राम अलर्ट संबधित आहे आणि यूजर्स या मेसेजमधीसल लिंकवर क्लिक करातात. यामुळे त्यांचं अकाऊंट धोक्यात येतं. बऱ्याच प्रकरणांमध्ये, हॅकर्स अकाऊंटवर पूर्ण नियंत्रण मिळवतात.
जर तुम्ही तुमच्या अकाऊंटवरून पासवर्ड बदलण्यासाठी कोणतीही रिक्वेस्ट पाठवली नसेल तर तुम्हाला आलेले ईमेल आणि नोटिफिकेशन्स पूर्णपणे दुर्लक्षित करा. तुम्ही तुमच्या अकाऊंटची सुरक्षा वाढवण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) चा देखील वापर करू शकता. जेव्हा हे वैशिष्ट्य सक्षम केले जाते, तेव्हा जरी हॅकरला तुमचा पासवर्ड मिळाला तरीही, तुमच्या खात्यात लॉग इन करण्यापूर्वी त्यांना अतिरिक्त सुरक्षा तपासणी करावी लागेल.
Ans: होय, पण यूजरने Two-Factor Authentication (2FA) चालू केल्यास सुरक्षा अधिक वाढते.
Ans: होय. फिशिंग लिंक्स, बनावट पासवर्ड रीसेट मेसेज किंवा OTP शेअर केल्यास अकाउंट हॅक होऊ शकते.
Ans: मेसेजमधील लिंकवर क्लिक करण्याआधी पाठवणारा अधिकृत आहे का हे तपासा. शंका असल्यास थेट Instagram अॅपमधूनच पासवर्ड बदला.