
BSNL युजर्सना महागाईचा मोठा झटका! कमी झाली स्वस्त रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी, इथे वाचा संपूर्ण यादी
BSNL च्या सर्व युजर्ससाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. वाढत्या महागाईमुळे कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम कंपनीच्या सर्वच युजर्सवर होणार आहे. BSNL कंपनीला आता महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सरकारी टेलीकॉम कंपनीने त्यांच्या काही स्वस्त रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व युजर्सवर आता मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारी टेलीकॉम कंपनीने त्यांच्या युजर्सना झटका देत काही स्वस्त रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी कमी केली आहे. यासोबतच अनेक प्लॅन्समधील डेटा आणि एसएमएस फायदे देखील कमी करण्यात आले आहेत. म्हणजेच आता ग्राहकांना काही प्लॅन्समध्ये आधीपेक्षा कमी व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. तर काही प्लॅन्समध्ये युजर्सना कमी डेटा आणि कमी एसएमएस फायदे मिळणार आहेत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा कोणत्या रिचार्ज प्लॅनवर परिणाम होणार आहे, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
1499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन – यापूर्वी कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 336 दिवसांची होती. मात्र आता या प्लॅनची व्हॅलिडीटी 300 दिवसांची करण्यात आली आहे. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 24GB डेटा मिळत होता. मात्र आता हा डेटा वाढवून 32GB करण्यात आला आहे. कॉलिंग आणि SMS बेनेफिट आधीसारखेच आहेत.
997 रुपयांचा रिचार्ज प्लॅन – यापूर्वी कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 160 दिवसांची होती. मात्र आता या प्लॅनची व्हॅलिडीटी 150 दिवसांची करण्यात आली आहे.
897 रुपयांचा रिचार्ज प्लॅन – या प्लॅनची व्हॅलिडीटी 15 दिवसांनी कमी करण्यात आली आहे, आणि हा प्लॅन 165 दिवस व्हॅलिड असणार आहे. या प्लॅनमध्ये डेटा बेनेफिटमध्ये कपात करण्यात आली आहे. यापूर्वी या प्लॅनमध्ये 90GB डेटा उपलब्ध होता, मात्र आता या प्लॅनमध्ये 24GB डेटा उपलब्ध असणार आहे.
599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन – या प्लॅनची व्हॅलिडीटी 14 दिवसांनी कमी करून 70 दिवस करण्यात आली आहे. या प्लॅनच्या इतर फायद्यांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
439 रुपयांचा रिचार्ज प्लॅन – यापूर्वी या प्लॅनची व्हॅलिडीटी 90 दिवसांची होती. मात्र आता या प्लॅनमध्ये 80 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे.
319 रुपयांचा रिचार्ज प्लॅन – आता या प्लॅनमध्ये 65 दिवसांऐवजी 60 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे. या प्लॅनच्या इतर फायद्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
197 रुपयांचा रिचार्ज प्लॅन – आता कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये 54 दिवसांची नाही तर 48 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. या प्लॅनच्या इतर फायद्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. या प्लॅनमध्ये पूर्वीप्रमाणेच 4GB डेटा आणि 100 फ्री एसएमएस मिळणार आहे.
BSNL चा मुख्यालय कुठे आहे?
BSNL चे मुख्यालय नवी दिल्ली, भारत मध्ये आहे.
BSNL मध्ये कोणत्या प्रकारच्या रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत?
BSNL मध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत, ज्यात डेटा, कॉल, SMS, आणि वैयक्तिक सेवांसाठी विविध पर्याय आहेत.
BSNL Broadband किंवा FTTH कसा कनेक्ट करावा?
नजिकच्या BSNL ऑफिसमध्ये फॉर्म भरा. ऑनलाईन पोर्टल किंवा कॉल सेंटरवरून अपॉइंटमेंट बुक करा. टेक्नीशियन घरवर कनेक्शन सेटअप करेल.
BSNL मध्ये नेट स्पीड कमी असल्यास काय करावे?
सर्व्हिस रीसेट करा किंवा राऊटर रीस्टार्ट करा. Customer Care (1500) वर संपर्क साधा. नेटवर्क कव्हरेज तपासा.