प्ले स्टोअरवर आढळलं हे बनावट सरकारी अॅप, तुम्ही तर डाऊनलोड केलं नाही ना! असा ओळखा खऱ्या आणि बनावट अॅपमधील फरक
अँड्रॉईड युजर्स गुगल प्ले स्टोअरवरून अनेक अॅप्स डाऊनलोड करत असतात. अनेकांना असं वाटतं की, प्ले स्टोअरवरील सर्ल अॅप्स खरे आहेत आणि युजर्सच्या सोयीसाठी तयार करण्यात आले आहेत. पण सत्य काही वेगळचं आहे. प्ले स्टोअरवर असे अनेक बनावट अॅप्स उपलब्ध आहेत, जे युजर्सची फसवणूक करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. हे अॅप्स एखाद्या खऱ्या अॅपसारखे दिसतात. मात्र त्यामध्ये असे काही धोकादायक व्हायरस असतात जे युजर्सची फसवणूक करण्यासाठी तयार केलेले असतात. अशाच एका धोकादायक अॅपबाबात आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अलीकडेच गुगल प्ले स्टोअरवर एक बनावट अॅप आढळला आहे, हा अॅप सरकारी असल्याचा दावा केला जात होता. Call History of any number असं या अॅपचं नाव आहे. हे अॅप सब्सक्रिप्शन प्लॅन खरेदी केल्यानंतर कोणत्याही नंबरची कॉल हिस्ट्री शेअर करण्याचा दावा करते. या अॅपबाबत सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. कारण हे अॅप आतापर्यंत लाखो लोकांनी डाऊनलोड केले आहे. अनेकांनी हे अॅप डाऊनलोड करून त्याचे सबस्क्रीप्शन देखील खरेदी केली आहे. मात्र यानंतर युजर्सना कोणत्याही नंबरची कॉल हिस्ट्री शेअर करण्यात आली नाही. याशिवाय युजर्सना त्यांचे पैसे देखील परत दिले नाही. त्यामुळे आता या अॅपबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Call History of any number हे अॅप सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आले होते. आतापर्यंत लाखो लाोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे आणि प्ले स्टोअरवर या अॅपला 4.6 स्टार रेटिंग मिळाली आहे. या अॅपमध्ये तीन प्रकारचे सब्सक्रिप्शन प्लॅन ऑफर केले जात आहेत. ज्याची किंमत 274 रुपयांपसून सुरु होते. शेवटच्या प्लॅनची किंमत 462 रुपये आहे. तुम्ही देखील हे अॅप डाऊनलोड केले असेल तर त्वरीत लॉग आऊट करा.
गुगल प्ले स्टोअरवर मोठ्या संख्येने अॅप्स उपलब्ध आहेत. यामध्ये काही नकली अॅप्सचा देखील समावेश आहे. यातील काही अॅप्स खरे आहेत तर काही अॅप्स खोटे आहेत. आता युजर्स खऱ्या आणि खोट्या अॅप्स ओळख कशी करू शकतात, याबाबत आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
Google Play Store म्हणजे काय?
Google Play Store हा Android डिव्हाइसेससाठीचा अधिकृत अॅप स्टोअर आहे, जिथून वापरकर्ते अॅप्स, गेम्स, मूव्हीज, बुक्स आणि इतर डिजिटल कंटेंट डाउनलोड करू शकतात.
Google Play Store कोणी विकसित केला?
Google कंपनीने Play Store विकसित केला आहे, आणि तो Android सिस्टमचा एक महत्त्वाचा भाग आहे.
Google Play Store मोफत आहे का?
हो, Play Store मोफत आहे. मात्र काही अॅप्स आणि गेम्समध्ये पेड व्हर्जन किंवा इन-ऍप खरेदी असते.






