
Moto G67 Power 5G: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने भारतात केली एंट्री, किंमत 15 हजारांहून कमी
कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? तर मोटोरोलाने लाँच केलेला G-सीरीजमधील नवीन स्मार्टफोन तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरणार आहे. हा स्मार्टफोन Moto G67 Power 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. फोनमध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये अनेक खास फीचर्स देखील देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनचे इतर डिटेल्स जाणून घेऊया.
Moto G67 Power 5G ची किंमत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी 15,999 रुपये आहे. बेस व्हेरिअंट पहिल्या सेलमध्ये 14,999 रुपयांत खरेदी केला जाणार आहे. या हँडसेटची विक्री 12 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन कंपनीची वेबसाईट आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात. हा स्मार्टफोन पँटोन पॅराशूट पर्पल, पँटोन ब्लू कुराकाओ आणि पँटोन क्लिंटरो या रंगात लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Motorola च्या या डिव्हाईसमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट देण्यात आला आहे. प्रोटेक्शनसाठी या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i आहे. डिव्हाईसमध्ये मिलिट्री-ग्रेड ड्रॉप प्रोटेक्शन देखील दिले आहे. या फोनमध्ये Qualcomm चा 4nm Snapdragon 7s Gen 2 चिपसेट आहे, जो अधिक पावरफुल आहे आणि रोजची काम अगदी सहजपणे मॅनेज करतो.
याशिवाय या स्मार्टफोनमध्ये रॅम बूस्टर फीचर देखील आहे, ज्यामुळे तुम्ही रॅम 24GB पर्यंत वाढवू शकतो. यामध्ये 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देखील देण्यात आले आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, हा स्मार्टफोन Google चा Gemini AI व्हॉईस असिस्टेंटला देखील सपोर्ट करतो. फोनमध्ये डुअल-सिम सपोर्ट आहे, जो Android 15-बेस्ड Hello UX वर चालतो.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये एक खास ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चर वाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.2 अपर्चरवाला 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस देण्यात आला आहे, जो टू-इन-वन फ्लिकर कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. डिव्हाईसमध्ये 30fps वर फुल-HD रिजॉल्यूशन वाले व्हिडीओ रेकॉर्ड करू शकते आणि डुअल कॅप्चर, टाइमलॅप्स, स्लो मोशन आणि ऑडियो जूम मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
फोनमध्ये 30W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh ची मोठी सिलिकॉन-कार्बन बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 5G, डुअल-बँड Wi-Fi, ब्लूटूथ 5.1, GPS, GLONASS, गॅलीलियो, QZSS आणि Beidou चा सपोर्ट दिला आहे.
Motorola म्हणजे कोणती कंपनी आहे?
Motorola ही एक प्रसिद्ध अमेरिकन मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे, जी आता Lenovo Group चा एक भाग आहे.
Motorola चे मुख्यालय कुठे आहे?
Motorola Mobility चे मुख्यालय शिकागो, अमेरिका (Chicago, USA) येथे आहे.
Motorola चे स्मार्टफोन कोणत्या सिरीजमध्ये येतात?
Motorola चे प्रमुख सिरीज आहेत: Moto G Series (बजेट रेंज) आणि Moto E Series (एंट्री लेव्हल) आणि Moto Edge Series (फ्लॅगशिप आणि प्रीमियम रेंज)
Motorola फोन कुठे बनवले जातात?
Motorola चे बहुतेक फोन भारत, चीन आणि ब्राझील येथे असेंबल केले जातात.