Apple Watch झाली आणखी स्मार्ट! WhatsApp चॅटिंग करण्यासाठी iPhone ची आवश्यकता संपली, जाणून घ्या सविस्तर
जर तुम्ही WhatsApp युजर्स असाल आणि Apple चे स्मार्टवॉच वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. WhatsApp ने अखेर Apple Watch साठी त्यांचे डेडिकेटेड अॅप लाँच केले आहे. हे नवीन अॅप Apple Watch साठी लाँच करण्यात आले आहे. या नवीन अॅपमुळे आता युजर्स आयफोनशिवाय त्यांच्या स्मार्टवॉचमधून चॅटिंग करू शकणार आहेत. हे नवीन अॅप केवळ नोटिफिकेशनपुरते मर्यादित नाही. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन अॅपमध्ये अनेक फीचर्स जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आता हा अॅप वापरताना युजर्सना आणखी मजा येणार आहे.
खरं तर, युजर्स बऱ्याच काळापासून या अॅपची मागणी करत होते. आता अखेर हे अॅप लाँच करण्यात आले आहे. याशिवाय, कंपनीने सांगितलं आहे की, पर्सनल मेसेज आणि कॉल एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असणार आहे. याचा अर्थ असा आहे की, संभाषणाबाहेरील कोणीही, अगदी WhatsApp किंवा Meta देखील, तुमचे संभाषण ऐकू किंवा वाचू शकत नाही. कंपनीचं असं म्हणणं आहे की, ही केवळ सुरुवात आहे आणि भविष्यात Apple Watch यूजर्ससाठी आणखी नवीन फीचर्स रोलआऊट केले जाणार आहेत. Apple वॉचसाठी जारी केलेल्या या व्हॉट्सअॅप अॅपमध्ये कोणते फीचर्स उपलब्ध आहेत ते प्रथम जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
WhatsApp, now on Apple Watch 🤩 pic.twitter.com/CymJF1gPEU — WhatsApp (@WhatsApp) November 4, 2025
कॉल नोटिफिकेशन: आता तुम्ही Apple Watch वर कोणी तुम्हाला कॉल केला आहे, हे देखील पाहू शकणार आहेत.
फुल मेसेज व्यू: एवढेच नाही तर आता तुम्ही Apple Watch वरच मोठे मेसेज पूर्णपणे वाचू शकाल.
व्हॉईस मेसेज: या नवीन अॅपमुळे आता युजर्स त्यांच्या मनगटावरून व्हॉईस मेसेज रेकॉर्ड आणि सेंड करू शकणार आहात.
इमोजी रिअॅक्शन: मेसेजवर तुम्ही अॅपमधूनच ईमोजीने रिअॅक्ट करू शकणार आहात.
मीडिया सपोर्ट: वॉचवर साफ इमेजेज आणि स्टिकर्स देखील पाहायला मिळणार आहे.
कंपनीचं असं म्हणणं आहे की, नवीन अॅप Apple Watch Series 4 किंवा त्यापेक्षा नवीन मॉडेलवर चालणार आहे किंवा watchOS 10 किंवा त्यापेक्षा नवीन मॉडेलवर चालणार आहे. जर तुमचे वॉच तुमच्या आयफोनशी जोडलेले असेल आणि ऑटो डाउनलोड चालू असेल, तर अॅप आपोआप इंस्टॉल होईल. अन्यथा, तुम्ही ते तुमच्या आयफोनच्या वॉच अॅपवरून मॅन्युअली डाउनलोड करू शकता.
WhatsApp Business म्हणजे काय?
हे WhatsApp चे बिझनेस व्हर्जन आहे जे छोट्या आणि मोठ्या व्यवसायांना ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी उपयोगी ठरते.
WhatsApp Channels म्हणजे काय?
Channels हे एक नवीन फीचर आहे ज्याद्वारे वापरकर्ते न्यूज, अपडेट्स, किंवा पब्लिक माहिती एका दिशेने (one-way) फॉलो करू शकतात.
WhatsApp स्टेटस किती वेळासाठी दिसतो?
WhatsApp स्टेटस 24 तासांपर्यंत दिसतो आणि नंतर आपोआप डिलीट होतो.
WhatsApp Web म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे?
WhatsApp Web द्वारे तुम्ही तुमचा WhatsApp लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर वापरू शकता. यासाठी web.whatsapp.com वर जा आणि QR कोड स्कॅन करा.
WhatsApp वर एकाच अकाउंटने दोन डिव्हाइसवर लॉगिन करता येतं का?
हो, आता “Linked Devices” फीचरमुळे तुम्ही एकाच WhatsApp अकाउंटचा वापर चार डिव्हाइसपर्यंत करू शकता.






