Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाणी ऐकण्याची मजा आता होणार दुप्पट! या सब्सक्राइबर्सना मिळणार 4 महिन्यांसाठी Apple Music चा फ्री अ‍ॅक्सेस, जाणून घ्या सविस्तर

Tata Play युजर्सना आता गाणी ऐकताना आणखी मजा येणार आहे. कारण कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन निर्णय घेतला आहे. ज्यामुळे युजर्सना 4 महिन्यांसाठी Apple Music चा फ्री अ‍ॅक्सेस मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 07, 2025 | 12:09 PM
गाणी ऐकण्याची मजा आता होणार दुप्पट! या सब्सक्राइबर्सना मिळणार 4 महिन्यांसाठी Apple Music चा फ्री अ‍ॅक्सेस, जाणून घ्या सविस्तर

गाणी ऐकण्याची मजा आता होणार दुप्पट! या सब्सक्राइबर्सना मिळणार 4 महिन्यांसाठी Apple Music चा फ्री अ‍ॅक्सेस, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • Tata Play ने Apple Music सोबत केली पार्टनरशिप
  • या युजर्सना मिळणार Apple Music च्या सर्विसचा अ‍ॅक्सेस
  • ठरावीक कालावधीसाठी उपलब्ध असणार ऑफर

Tata Play ने त्यांचा एंटरटेनमेंट पोर्टफोलियो आणखी मजबूत करण्यासाठी Apple Music सोबत पार्टनरशिप केल्याची घोषणा केली आहे. कंपनीने केलेल्या या नवीन भागिदारीचा उद्देश त्यांच्या सब्सक्राइबर्सना आणखी जास्त फायदे देणे असा आहे. कंपनीच्या या भागिदारीचा युजर्सना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या भागिदारीनंतर कंपनी एक खास ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरअंतर्गत युजर्सना Apple Music चे 4 महिन्यांचे सब्सक्रीप्शन मोफत मिळणार आहे.

Recharge Plans Price Hike: रिचार्जसाठी तयार ठेवा जास्तीचे पैसे! Jio-Airtel-Vi चे रिचार्ज प्लॅन्स डिसेंबरपासून महागणार?

नवीन भागिदारी युजर्ससाठी ठरणार फायदेशीर

कंपनीने त्यांच्या युजर्सना Apple Music च्या सर्विसचा अ‍ॅक्सेस एका एक्सक्लूसिव प्रमोशनल ऑफर अंतर्गत देत आहे. ही ऑफर Tata Play च्या सर्व प्लॅटफॉर्म्स जसे Binge, Mobile आणि Fiber वर उपलब्ध असणार आहे. या भागिदारीद्वारे युजर्स Apple Music च्या गाण्यांचे कलेक्शन आणि क्यूरेटेड प्लेलिस्ट्सचा आनंद घेऊ शकणार आहेत. टाटा प्लेच्या वाढत्या ग्राहक वर्गाला अधिक एकात्मिक आणि वैविध्यपूर्ण मनोरंजन अनुभव देण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

Apple Music चा फ्री अ‍ॅक्सेस आता Tata Play वर उपलब्ध

Tata Play ने एका प्रेस रिलीजमध्ये सांगितलं आहे की, त्यांनी Apple Music सोबत नवीन पार्टनरशिप केली आहे. या भागिदारीअंतर्गत युजर्सना ठरावीक कालावधीसाठी Apple च्या म्यूजिक स्ट्रीमिंग सर्विसचा अ‍ॅक्सेस फ्री दिला जाणार आहे. हा कालावधी संपल्यानंतर युजर्सना ही सेवा वापरण्यासाठी 119 रुपये प्रतिमहिना खर्च करावे लागणार आहेत, जो कंपनीचा नियमित प्लॅन आहे. ही ऑफर Tata Play च्या सर्व प्लॅटफॉर्म्स जसे Tata Play Binge, Tata Play Mobile अ‍ॅप आणि Tata Play Fiber वर उपलब्ध आहे.

3 महिन्यांसाठी मिळणार फ्री ट्रायल

कंपनीच्या या नवीन भागिदारीअंतर्गत नवीन युजर्सना 4 महिन्यांसाठी Apple Music चे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर केले जाणार आहे, तर जुन्या एलिजिबल यूजर्सना 3 महिन्यांसाठी फ्री ट्रायल दिला जाणार आहे. ही ऑफर Tata Play च्या सर्व DTH, OTT आणि ब्रॉडबँड कस्टमर्ससाठी लागू करण्यात आली आहे. ज्यामुळे त्यांना चाचणी कालावधी दरम्यान जास्तीचे पैसे खर्च न करता Apple Music चा फ्री अ‍ॅक्सेस मिळणार आहे.

Huawei Mate 70 Air: एकच झलक, सबसे अलग! चीनमध्ये लाँच झाला Huawei चा तगडा स्मार्टफोन, 6,500mAh बॅटरी आणि इतर फीचर्सने सुसज्ज

ऑफर अ‍ॅक्टिवेट करण्यासाठी युजर्सना Tata Play अकाऊंटवरून एक प्रोमो कोड रिडीम करावा लागणार आहे. मोफत कालावधी संपल्यानंतर युजर्सना नियमित प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. या भागीदारीचा उद्देश टाटा प्लेचे ग्राहक मूल्य वाढवणे आणि टीव्ही आणि ब्रॉडबँडच्या पलीकडे संगीत स्ट्रीमिंगपर्यंत मनोरंजनाचा अनुभव वाढवणे आहे. तसेच, यावर्षीच्या सुरुवातीला Apple ने TuneIn सह भागिदारी केली होती, ज्यामुळे त्यांचे सहा क्यूरेटेड रेडियो स्टेशन्स जगभरात पोहोचवले जाऊ शकतील. यामुळे Apple ने पहिल्यांदाच त्यांच्या अ‍ॅपच्या बाहेर रेडिओ सेवा उपलब्ध करून दिली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Apple Music कोणती कंपनी आहे?

    Ans: Apple Music ही Apple कंपनीची एक म्युझिक स्ट्रीमिंग सेवा आहे, जिथे तुम्ही लाखो गाणी, पॉडकास्ट आणि रेडिओ स्टेशन ऐकू शकता.

  • Que: Apple Music वापरण्यासाठी सब्सक्रिप्शन घ्यावं लागतं का?

    Ans: होय, Apple Music वापरण्यासाठी मासिक सब्सक्रिप्शन घ्यावे लागते, पण नव्या युजर्सना काही काळासाठी फ्री ट्रायल मिळते.

  • Que: Apple Music सब्सक्रिप्शन प्लॅन्स कोणते आहेत?

    Ans: भारतात सध्या Individual, Student आणि Family असे तीन मुख्य प्लॅन्स आहेत. किंमत 59 रुपयांपासून सुरू होते

Web Title: Tech news marathi this users will get free access of apple music for 4 months know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

नवा अध्याय सुरु… महाराष्ट्र बनणार भारताचं पहिलं Starlink राज्य! खेड्यापाड्यांनाही मिळणार हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव
1

नवा अध्याय सुरु… महाराष्ट्र बनणार भारताचं पहिलं Starlink राज्य! खेड्यापाड्यांनाही मिळणार हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव

Huawei Mate 70 Air: एकच झलक, सबसे अलग! चीनमध्ये लाँच झाला Huawei चा तगडा स्मार्टफोन, 6,500mAh बॅटरी आणि इतर फीचर्सने सुसज्ज
2

Huawei Mate 70 Air: एकच झलक, सबसे अलग! चीनमध्ये लाँच झाला Huawei चा तगडा स्मार्टफोन, 6,500mAh बॅटरी आणि इतर फीचर्सने सुसज्ज

Free Fire Max: Blazing Wheels मध्ये फ्री रिवॉर्ड्सचा पाऊस! प्लेअर्सना Flame Streak स्किन मोफत जिंकण्याची संधी…
3

Free Fire Max: Blazing Wheels मध्ये फ्री रिवॉर्ड्सचा पाऊस! प्लेअर्सना Flame Streak स्किन मोफत जिंकण्याची संधी…

किमतीच्या बाबतीत Google चा ‘हा’ Smart Watch तर iPhone लाही लाजवेल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

किमतीच्या बाबतीत Google चा ‘हा’ Smart Watch तर iPhone लाही लाजवेल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.