Recharge Plans Price Hike: रिचार्जसाठी तयार ठेवा जास्तीचे पैसे! Jio-Airtel-Vi चे रिचार्ज प्लॅन्स डिसेंबरपासून महागणार?
तुम्ही जिओ, एअरटेल किंवा व्हिआय युजर आहात का? सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून असं सांगितलं जात आहे की, टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवणार आहेत. अनेक रिपोर्ट्मध्ये याबाबत दावा देखील केला जात आहे. या अपडेटमुळे आता सर्वच स्मार्टफोन युजर्सना मोठा झटका लागला आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, डिसेंबर 2025 पासून Airtel, Jio आणि Vodafone Idea म्हणजेच Vi च्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेलिकॉम कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती 10 ते 12 टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच आतापर्यंत तुम्ही ज्या ठरलेल्या किंमतीचे रिचार्ज प्लॅन खरेदी करत होतात. आता त्याच्यासाठी युजर्सना जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. याबाबत अद्याप टेलिकॉम कंपन्या एयरटेल, Jio आणि Vi ने कोणतीही घोषणा केली नाही. मात्र याबाबत सतत समोर येणाऱ्या अपडेट्समुळे युजर्सची चिंता वाढली आहे. सोशल मीडियावर देखील रिचार्ज प्लॅन्सच्या वाढत्या किंमतींबाबत अनेक दावे केले जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Some reports indicate that mobile data plan prices in India may soon increase, with telecom operators Jio, Airtel, and Vi (Vodafone Idea) expected to raise rates by approximately 10%. As a result, the 2GB/day plan with 84 days validity could soon cost around ₹949 to ₹999. pic.twitter.com/ElHRAtyJAs — Abhishek Yadav (@yabhishekhd) November 4, 2025
अलीकडचे टिप्स्टर Abhishek Yadav यांनी देखील त्यांच्या एक्स अकाऊंट एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये सांगण्यात आलं होतं की, भारतात मोबाईल डेटा प्लॅन्सच्या किंमतीत लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. रिचार्ज प्लॅनच्या किंमती पुन्हा एकदा वाढणार असल्याने युजर्सना मोठा झटका लागला आहे. पोस्टमध्ये सांगितलं आहे की, टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितलं आहे की, 84 दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या 2GB वाल्या डेटा प्लॅनची किंमत सध्या सुमारे 849-899 यांच्या दरम्यान आहे, ही किंमत वाढीनंतर 949 रुपये ते 999 रुपयांच्या दरम्यान असणार आहे.
यापूर्वी डील ट्रॅकर DealBee Deals ने देखील त्यांच्या एका पोस्टमध्ये दावा केला होता की, 1 डिसेंबर 2025 पासून टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, 199 रुपयांच्या प्लॅनची किंमत सुमारे 219 रुपयांपर्यंत वाढू शकते. याशिवाय 899 रुपयांच्या प्लॅनची किंमत देखील 999 रुपयांपर्यंत वाढू शकते.
याशिवाय, DealBee Deals ने असं देखील सांगितलं आहे की, ही सर्व माहिती सुरुवातीच्या रिपोर्ट्सवर आधारित आहे. कंपन्यांनी याबाबत अद्याप कोतणीही अधिकृत घोषणा केली नाही. जर हे अहवाल खरे ठरले तर डिसेंबरपासून मोबाईल वापरकर्त्यांना रिचार्जसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. त्यामुळे वाढत्या महागाईत युजर्सच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागू शकते. कारण आधीच कंपन्यांनी काही रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवून त्यांचे फायदे कमी केले आहेत. आता पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढल्यास कंपन्यांना युजर्सच्या नाराजीला समोरे जावू लागू शकते.
Ans: Jio चे प्रीपेड प्लॅन्स ₹149 पासून सुरू होतात, तर पोस्टपेड प्लॅन्स ₹399 पासून. यात अनलिमिटेड कॉलिंग, 5G डेटा आणि OTT सब्सक्रिप्शन मिळतात.
Ans: Airtel 5G Plus सेवा भारतातील 500+ शहरांमध्ये उपलब्ध आहे.
Ans: Vi ने काही शहरांमध्ये 5G टेस्टिंग सुरू केली आहे, पण संपूर्ण भारतात लाँच अद्याप बाकी आहे.






