
Vivo Y19s 5G vs Samsung Galaxy M17 5G: एंट्री-लेवल सेगमेंटमध्ये कोण आहे राजा? कोणता स्मार्टफोन आहे दमदार? वाचा सविस्तर
विवोच्या या स्मार्टफोनमध्ये 6.74 इंचाची LCD स्क्रीन देण्यात आली आहे, जी HD+ रेजॉल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट आणि 700 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 6nm मीडियाटेक डायमेंसिटी 6300 चिप लावली आहे, ज्याला 6GB रॅमसह जोडण्यात आला आहे. हा अँड्रॉईड 15 वर बेस्ड FunTouchOS 15 वर आधारित आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनच्या रिअरमध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 0.8MP चा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या फ्रंटला 5MP लेंस आहे. फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंगच्या या फोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1,100 निट्सची पीक ब्राइटनेस ऑफर करतो. या स्मार्टफोनमध्ये Exynos 1330 प्रोसेसर आहे, ज्याला 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. या स्मार्टफोनच्या रियरमध्ये 50MP + 5MP अल्ट्रा वाइड आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरावाला ट्रिपल कॅमेरा सेटअप लावला आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनसह येतो. या स्मार्टफोनच्या फ्रंटला 13 MP लेंस देण्यात आली आहे. सॅमसंगने या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे, जी 25W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
Vivo Y19s 5G स्मार्टफोनच्या 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये आहे तर या स्मार्टफोनच्या टॉप व्हेरिअंट 6GB + 128GB ची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. सॅमसंगच्या स्मार्टफोनची किंमत 12,499 रुपयांपासून सुरु होऊन 15,499 रुपयांपर्यंत जाते.
Vivo म्हणजे कोणती कंपनी आहे?
Vivo ही चीनमधील प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी आहे, जी BBK Electronics Group चा भाग आहे (याच ग्रुपमध्ये Oppo, Realme, OnePlus याही कंपन्या आहेत).
Vivo चे मुख्यालय कुठे आहे?
Vivo चे मुख्यालय डोंगगुआन, गुआंगडोंग, चीन येथे आहे.
Vivo कोणत्या सिरीजमध्ये स्मार्टफोन्स लाँच करते?
Vivo चे प्रमुख सिरीज आहेत: V Series (कॅमेरा आणि डिझाइनसाठी प्रसिद्ध), Y Series (बजेट आणि मिड-रेंज), X Series (प्रीमियम आणि प्रोफेशनल कॅमेरा फोन), T Series (परफॉर्मन्स फोकस फोन)
Samsung कोणत्या देशाची कंपनी आहे?
Samsung ही दक्षिण कोरिया (South Korea) येथील जगप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे.
Samsung चे मुख्यालय कुठे आहे?
Samsung चे मुख्यालय सोल, दक्षिण कोरिया (Seoul, South Korea) येथे आहे.