ग्रीन लाइनमुळे हैराण झालेल्या वनप्लस युजर्ससाठी कंपनीने आणलं सोल्यूशन, मिळणार लाइफटाइम डिस्प्ले वॉरंटी
तुम्ही देखील वनप्लस युजर असाल आणि ग्रीन लाइनच्या समस्येमुळे हैराण झाला असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टेक कंपनी वनप्लसने त्यांच्या युजर्ससाठी ग्रीन लाइन सोल्यूशन आणलं आहे. याबाबत कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर आणि एक्स एकाऊंटवर माहिती दिली आहे. जे युजर्सना त्यांच्या वनप्लस फोनमधील ग्रीन लाइनच्या समस्येमुळे कंटाळले आहेत, अशा युजर्ससाठी कंपनी हे सोल्यूशन ऑफर करत आहे.
Tech Tips: पॅन कार्डसाठी ऑनलाईन अप्लाय करताना घ्या ही काळजी; नाहीतर होईल लाखोंची फसवणूक
वनप्लसने युजर्सची ग्रीन लाइन समस्या सोडवण्यासाठी ‘OnePlus Green Line Worry-Free Solution’ रोल आऊट केलं आहे. ज्या युजर्सच्या स्मार्टफोनच्या AMOLED डिस्प्लेवर ग्रीन लाईन येत आहेत, त्यांच्या प्रोब्लेमचे हे सोल्यूशन आहे. अॅडवांस्ड डिस्प्ले टेक्नोलॉजी, हाय क्वालिटी कंट्रोल आणि लाइफटाइम वॉरंटीच्या एक्सटेंडेड सर्विस पॉलिसीद्वारे वापरकर्त्यांना आश्वस्त करणे हे कंपनीच्या नवीन उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या नवीन प्रोजेक्टमध्ये कंपनी त्यांच्या युजर्सना लाइफटाइम डिस्प्ले वॉरंटी ऑफर करत आहे. (फोटो सौजन्य – X)
वनप्लस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबिन लिऊ म्हणाले की, ‘वनप्लस हा टेक इंडस्ट्रीमधील पहिला असा ब्रँड आहे ज्याने भारतीय बाजारपेठेतील डिस्प्ले संबंधित समस्या कमी करण्यासाठी आणि याबाबत तांत्रिक उपायांसह प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही केवळ AMOLED डिस्प्लेमध्ये टेक्नोलॉजी अपग्रेड्सना गती देत नाही, तर भारतातील वनप्लस युजर्सना लाइफटाम वॉरंटी देखील ऑफर करत आहोत, आणि असं करणारा वनप्लस पहिला ब्रँड आहे. आमचा हा प्रोजेक्ट आमच्या तंत्रज्ञानावरील आमचा विश्वास आणि आमच्या युजर्सबाबतील असलेली आमचे प्राधान्य दर्शवतो.
वनप्लस ग्रीन लाइन वरी-फ्री सॉल्यूशन तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करते. जेणेकरुन वापरकर्त्यांना क्वालिटीची खात्री देता येईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांच्या संभाव्य चिंता देखील दूर करण्यासाठी मदत होणार आहे.
वनप्लसने विशेषत: एनवायरमेंटल फॅक्टर्समुळे उद्भवलेल्या तांत्रिक आव्हानांना तोंड देण्यासाठी इंडस्ट्रीतील लीडर्ससोबत भागीदारी करून डिस्प्ले टेक्नोलॉजीमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. सर्वात मोठी प्रगती म्हणजे एन्हांस्ड एज बाँडिंग लेयरचे इंटीग्रेशन, जे सर्व OnePlus AMOLED डिस्प्लेमध्ये आढळणाऱ्या उत्कृष्ट PVX एज-सीलिंग सामग्रीचा वापर करते.
Drawing a line on green lines with green line worry-free solution. #NeverSettle
— OnePlus India (@OnePlus_IN) December 6, 2024
PVX हे हाय-परफॉर्मंस मटेरियल आहे जे हवामान आणि केमिकल्सविरुद्धच्या एक्सेप्शनल रेजिस्टेंससाठी लोकप्रिय आहे, ज्यामुळे ते अत्यंत परिस्थितीत ड्यूरेबिलिटी वाढवण्यासाठी आदर्श बनते.
OnePlus ची क्वालिटीशी कमिटमेंट त्याच्या उत्कृष्ट गुणवत्ता नियंत्रणाद्वारे दिसून येते. वनप्लस क्वालिटी इंजीनियरिंग लॅब सर्व फोनवर 180 पेक्षा जास्त कॉम्प्रिहेंसिव चाचण्या करते, जे रिलायबिलिटी आणि ड्यूरेबिलिटी सुनिश्चित करण्यासाठी एक्सट्रीम रियल वर्ल्डमधील परिस्थितींचे अनुकरण करते. या चाचणीमध्ये इलेक्ट्रिकल परफॉर्मंस चेक, स्ट्रक्चरल असेसमेंट्स आणि एनवायरमेंटल एजिंग इवॅलुएशन यांचा समावेश आहे. एक प्रमुख चाचणी म्हणजे ‘डबल 85’ चाचणी, जिथे डिस्प्ले 85 °C तापमान आणि 85% आर्द्रतेच्या अनेक कालावधीसाठी उघड होतो.
POCO चे हे दोन स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच! प्रिमियम डिझाईनसह मिळणार हटके फीचर्स
एक्सेप्शनल यूजर एक्सपीरिएंस देत, OnePlus ग्रीन लाइन्स इश्यूसह सर्व स्मार्टफोन्सवर लाइफटाइम वॉरंटी देणार आहे. यूजर्सना त्यांच्या नवीन किंवा जुन्या अशा दोन्ही फोन्सवर लाईफटाइम वॉरंटी ऑफर केली जाणार आहे.