Redmi Note 14 Series: रेडमीची नवीन सिरीज भारतात लाँच, दमदार फीचर्स मिळणार इतक्या किंमतीत
स्मार्टफोन कंपनी Redmi ची नवीन स्मार्टफोन सिरीज Redmi Note 14 आज भारतात लाँच झाली आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या कंपनीच्या ईव्हेंटमध्ये Redmi Note 14 सिरीजमधील तीन नवीन स्मार्टफोन आज भारतात लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने आज लाँच केलेल्या Redmi Note 14 सिरीजमध्ये Redmi Note 14 चा बेस व्हेरिअंट, Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro+ 5G या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. याबाबत कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.
WhatsApp Update: व्हॉट्सॲप युजर्ससाठी आनंदाची बातमी! अनरिड मॅसेज आणि टायपिंगसाठी आलं नवीन फीचर
Redmi Note 14 Pro+ 5G हा सिरीजमधील सर्वात महागडा फोन आहे. हा स्मार्टफोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. तसेच तर Redmi Note 14 Pro दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. आणि Redmi Note 14 चा बेस व्हेरिअंट तीन मॉडेलमध्ये लाँच करण्यात आला आहे. तीन्ही स्मार्टफोन्सच्या प्राईज आणि स्पेसिफिकेशन्सवर नजर टाकूया. (फोटो सौजन्य – X)
Redmi Note 14 सिरीजमधील Redmi Note 14 Pro+ 5G हा सर्वात महागडा स्मार्टफोन असणार आहे. हा स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB+256GB आणि 12GB + 512GB अशा तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Redmi Note 14 Pro+ 5G स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आहे. या स्मार्टफोनचा 8GB+256GB व्हेरिअंट 31,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. तर या स्मार्टफोनचा 12GB + 512GB व्हेरिअंट 34,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ब्लू, पर्पल आणि टाइटन ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे.
YouTube Premium: फ्रीमध्ये मिळणार यूट्यूब प्रीमियमचा आनंद, हा ब्राऊझर करणार तुम्हाला मदत
डिस्प्ले – Redmi Note 14 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा अलमाँड डिस्प्ले देण्यात आला आहे.
प्रोसेसर- रेडमीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर आहे.
कॅमरा- स्मार्टफोनमध्ये 50MP+12MP+50MP कमॅरा देण्यात आला आहे. तर 20MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी- Redmi Note 14 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये 6200mAh आहे, जी 90W चार्जिंगला सपोर्ट करते.
Redmi Note 14 Pro स्मार्टफोन 8GB+128GB आणि 8GB 256GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत 23,999 रुपये आणि 8GB 256GB व्हेरिअंटची किंमत 25,999 रुपये आहे. Redmi Note 14 Pro स्मार्टफोन पर्पल, फँटम ब्लू, मिरर व्हाइट आणि मिडनाइट ब्लॅक या चार रंगात लाँच करण्यात आला आहे.
डिस्प्ले- Redmi Note 14 Pro स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच 1.5k अलमाँड डिस्प्ले देण्यात आला आहे.
प्रोसेसर- या स्मार्टफोनमध्ये Dimensity 7300 Ultra प्रोसेसर आहे.
कॅमरा- Redmi Note 14 Pro स्मार्टफोनमध्ये 50MP+8MP+2MP कॅमेरा सपोर्ट आहे. तर सेल्फीसाठी 20MP कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी- या स्मार्टफोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W चार्जिंगला सपोर्ट करते.
Redmi Note 14 चा बेस स्मार्टफोन 6GB+128GB, 8GB+128GB आणि 8GB+256GB या तीन रंगात लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 6GB+128GB व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये आणि 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये आहे. तर Redmi Note 14 चा 8GB+256GB व्हेरिअंट 20,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.