YouTube Premium: फ्रीमध्ये मिळणार यूट्यूब प्रीमियमचा आनंद, हा ब्राऊझर करणार तुम्हाला मदत
व्हिडीओ स्ट्रीमइंग प्लॅटफॉर्म यूट्यूबचा जगभरात वापर केला जातो. यूट्यूबवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहू शकता. ज्यामध्ये रेसिपी, एज्युकेशन, स्पोर्ट्स, एन्टरटेन्मेंट, यांचा समावेश केला जाऊ शकतो. यूट्यूबवर तुम्हाला सर्व काही केवळ एका क्लिकवर उपलब्ध होते. पण यूट्यूबवर व्हिडीओ पाहताना खूप जाहिराती पहव्या लागतात. यामुळे व्हिडीओ पाहताना खूप वैताग येतो.
Google Pixel 9a: कधी लाँच होणार गुगलचा नवीन स्मार्टफोन? नवीन अपडेट आलं समोर
तुम्हाला जाहिरात शिवाय यूट्यूबवर व्हिडीओ पाहायचे असतील तर तूम्ही यूट्यूब प्रिमियम मेंबरशीप खरेदी करू शकता. पण प्रचंड किमतीमुळे ही मेंबरशीप खरेदी करणं प्रत्येकाला शक्य नसतं. पण आता आम्ही तुम्हाला अशा एका ब्राऊझरबद्दल सांगणार आहोत, जो तुम्हाला फ्रिमध्ये यूट्यूब प्रिमियमचा आनंद देणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
तुम्हाला यूट्यूब प्रिमियम प्रमाणे व्हिडिओ पाहायचे असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तथापि, असा एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही एक रुपयाही खर्च न करता यूट्यूब प्रिमियम प्रमाणे जाहिरातमुक्त कंटेंट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. होय, तुम्हाला यूट्यूब प्रिमियम मेंबरशीपसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही आणि विनामूल्य यूट्यूब प्रिमियमचा आनंद घेता येईल.
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर Brave Incognito Browser डाउनलोड करू शकता. हा ब्राऊझर तुम्हाला जाहिरात शिवाय यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी मदत करणार आहे. ब्रेव्ह (ब्रेव्ह प्रायव्हेट वेब ब्राउझर, व्हीपीएन) हे एआय सह ॲडब्लॉक व्हीपीएन आहे. ब्रेव्ह ब्राउझर पूर्णपणे सुरक्षित आहे. तुम्ही टेन्शन फ्री वापरू शकता. ब्रेव्ह ब्राउझर कसे कार्य करते ते आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत.
भन्नाट कॅमेरा वैशिष्ट्यासह लवकरच लाँच होणार OnePlus Ace 5 Mini, मिळणार हे खास फीचर्स
गुगल प्ले स्टोअरवर अनेक ॲड ब्लॉकर ॲप्स उपलब्ध आहेत, ज्यांना काही परवानग्या आवश्यक आहेत. हे केल्यानंतर, जाहिराती मोठ्या प्रमाणात ब्लॉक केल्या जातात. ॲडवे ॲपचा वापर जाहिराती ब्लॉक करण्यासाठी केला जाऊ शकतो. Adblock Plus हे देखील असेच एक ॲप आहे, जे तुम्हाला कोणत्याही खर्चाशिवाय जाहिरातमुक्त अनुभव देऊ शकते. Adguard ॲपही तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हे ॲप ऍक्सेस करायला खूप सोपे आहे आणि त्याचा यूजर इंटरफेसही सोपा आहे.